दुय्यम निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा – परीक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली – MPSC Duyyam Seva Admit Card
MPSC Duyyam Seva Admit Card
राज्य उत्पादन शुल्क विभागातील ‘दुय्यम निरीक्षक, गट-क’ पदासाठी झालेली विभागीय स्पर्धा परीक्षा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील १३७दुय्यम निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एमपीएससीने घेतलेल्या या परीक्षेतील गुण विभागणीचा (मार्किंग पॅटर्न) तपशील परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर लीक झाल्याचा दावा करत काही उमेदवारांनी ‘मॅट’च्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याचा कोणताही पुरावा नसल्याने संपूर्ण परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार नाही, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली होती. अखेर प्रकरण तिसऱ्या न्यायाधीशांकडे (न्यायमूर्ती व्ही. के. जाधव औरंगाबाद खंडपीठ) वर्ग करण्यात आले. न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी याचिका फेटाळताना सांगितले की, केवळ गुण विभागणीची माहिती समोर आल्याने परीक्षेची गुणवत्ता बाधित झाल्याचे सिद्ध होत नाही. परीक्षा रद्द केल्यास प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होईल. दरम्यान, एमपीएससीने निकाल जाहीर करून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश ‘मॅट’ने दिले आहेत.
MPSC Duyyam Seva Admit Card : Admit certificates of the candidates admitted to Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2022 Paper No. 2 State Tax Inspector scheduled on Saturday, 14 October 2023 through the Maharashtra Public Service Commission in their account on the Commission’s online application system at https://mpsconline.gov.in have been made available.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षस प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष
- परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.\
- परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
- कोव्हिड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित
- परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाच्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
- प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected] व support [email protected] या ईमेल व / अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
Download MPSC STI Hall Ticket 2023
MPSC Duyyam Seva Admit Card
MPSC Duyyam Seva Admit Card : Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group B Mains Examination 2023 with reference to Paper 1 held on 1st October 2023 has been published on the Commission’s website. Candidates can download MPSC Duyyam Seva Admit Card from below link. We have given You Step By Step Procedure for Download MPSC Duyyam Seva Hall Ticket 2023
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 मधील दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित पेपर 1 संदर्भातील ठळक सूचना व प्रवेशपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ दिनांक १ ऑक्टोबर २०२३
(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
(२) उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे
कृपया काळजीपूर्वक अवलोकन करावे.
(३) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही,
(४) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतः चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
(५) परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.
(६) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
(७) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
(८) पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार उचित कारवाई करण्यात येईल.
(९) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
(१०) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन
करणे आवश्यक आहे.
(११) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमुद करावा,
(१२) परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद करण्याकरिता कोणताही अतिरिक्त
वेळ देण्यात येणार नाही.
(१३) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम कायद्यातील तरतूदीनुसारही कारवाई करण्यात येईल. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!