Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ – गुणपत्रक आणि गुणांची फेर-बेरीज यांबाबतची घोषणा !! – MPSC Civil Services Main Exam Update
Last Updated:

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ – गुणपत्रक आणि गुणांची फेर-बेरीज यांबाबतची घोषणा !! – MPSC Civil Services Main Exam Update

MPSC Civil Services Main Exam Update

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालानंतर उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२५ च्या लेखी परीक्षेचा निकाल २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांना आता त्यांच्या परीक्षेतील गुण उमेदवारांच्या खात्यातील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ पर्यायामध्ये पाहता येणार आहेत. दरम्यान, आपल्या गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MPSC Civil Services Main Exam Update


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२५ आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २९ मार्च ते २६ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार होती. परंतु, काही उमेदवारांनी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी संबंधित परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयोगाकडे विनंती केली होती. उमेदवारांच्या विनंतीचा विचार करून आयोगाने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार संबंधित परीक्षा आता ५ एप्रिल ते २ मेदरम्यान होणार आहे. पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

Advertisement

असे आहे सुधारित वेळापत्रक:
५ एप्रिल : भाषा (पेपर एक) आणि भाषा (पेपर दोन)
१८ एप्रिल : निबंध (पेपर तीन)
१९ एप्रिल : सामान्य अध्ययन-१
(पेपर चार) व सामान्य अध्ययन- २ (पेपर पाच)
२६ एप्रिल : सामान्य अध्ययन-३ (पेपर सहा) व सामान्य अध्ययन-४ (पेपर सात)
२ मे : वैकल्पिक विषय (पेपर आठ), वैकल्पिक विषय (पेपर नऊ)