Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » मुंबई मेट्रोचा फसव्या पदभरती जाहिरातींपासून सावध राहा!! | MMRCL Bharti 2026
Last Updated:

मुंबई मेट्रोचा फसव्या पदभरती जाहिरातींपासून सावध राहा!! | MMRCL Bharti 2026

MMRCL Bharti 2026

मित्रांनो, सध्या अनेक फसव्या जाहिरातीचा सोधम मीडियावर धुमाकूळ आहे, त्यात आता MMRCL च्या जाहिरातीची सुद्धा भर पडली. ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या (एमएमआरसी) नावाने सध्या सोशल मीडिया आणि विविध इंटरनेट माध्यमांवर नोकरीच्या खोट्या जाहिराती पसरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमएमआरसीचा बनावट लोगो, खोटी कागदपत्रे आणि बनावट ई-मेल आयडीचा वापर करून या फसव्या पदभरती जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. तरुण उमेदवारांना नोकरीचे मोठे आमिष दाखवून त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करण्याचा हा प्रयत्न असून, नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये आणि पूर्णपणे सतर्क राहावे, असे जाहीर आवाहन एमएमआरसी प्रशासनाने केले आहे.

एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अपप्रवृत्तीच्या व्यक्ती आणि टोळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, ई-मेल आणि इतर मेसेजिंग ॲप्सचा वापर करून बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत आहेत. एमएमआरसीच्या अधिकृत नावाचा गैरवापर करून बनावट भरती जाहिराती, खोट्या नोकरीच्या ऑफर्स आणि अगदी बनावट नियुक्तीपत्रे देखील उमेदवारांना पाठवली जात आहेत. अनेक वेळा या प्रक्रियेत नोंदणी शुल्क किंवा प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असल्याचेही समोर आले आहे. हा सर्व प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून तरुणांची फसवणूक करण्यासाठीच हे जाळे विणले गेले आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत एमएमआरसीने अधिकृत पत्रक काढून परिस्थिती स्पष्ट केली आहे. एमएमआरसीने आपल्या निवेदनात ठामपणे म्हटले आहे की, सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे सध्या बाजारात किंवा इंटरनेटवर फिरत असलेल्या भरतीच्या जाहिराती, नोकरीच्या ऑफर्स किंवा इतर कोणतेही संदेश पूर्णपणे बनावट आणि खोटे असून त्यांचा एमएमआरसी प्रशासनाशी दूरवरचाही कोणताही संबंध नाही.

तसेच, एमएमआरसीने हे देखील स्पष्ट केले आहे की, कॉर्पोरेशन कोणत्याही थर्ड पार्टीमार्फत किंवा खासगी संस्थांमार्फत आपली भरती प्रक्रिया राबवत नाही. एमएमआरसीची स्वतःची एक स्वतंत्र आणि पारदर्शक निवड पद्धत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एमएमआरसी कोणत्याही उमेदवाराकडून नोकरी देण्याच्या नावाखाली किंवा भरती प्रक्रियेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क अथवा पैसे स्वीकारत नाही. त्यामुळे कोणी पैशांची मागणी करत असल्यास तो फसवणुकीचाच भाग आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.


MMRCL Bharti 2026 : MMRCL ( Mumbai Metro Rail Corporation Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies for Mumbai Maha Metro . The applications are invited for the “General Manager, Deputy General Manager, Assistant General Manager, Manager, Deputy Engineer, Assistant Manager, Systems Analyst, Draftsman, Jr. Engineer, Assistant”. There are 24 vacancy available. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submitting application is 26th of June 2026 . For more details about MMRCL Recruitment 2026, MMRCL Bharti 2026, visit our website policebharati.co.in .

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे “महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उप अभियंता, सहाय्यक व्यवस्थापक, प्रणाली विश्लेषक, आराखडाकार, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक” पदाच्या 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२६

  • पदाचे नाव महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उप अभियंता, सहाय्यक व्यवस्थापक, प्रणाली विश्लेषक, आराखडाकार, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक
  • पदसंख्या 24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 35-53 वर्षे (पदानुसार)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2026
  • अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com

MMRCL Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
महाव्यवस्थापक 03
उप महाव्यवस्थापक 03
सहाय्यक महाव्यवस्थापक 07
व्यवस्थापक 01
उप अभियंता 01
सहाय्यक व्यवस्थापक 03
प्रणाली विश्लेषक 01
आराखडाकार 02
कनिष्ठ अभियंता 02
सहाय्यक 01

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For MMRCL Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक Graduate in Commerce from a recognised university and Chartered Accountant or Cost Accountant. / Full time B. Tech (Mechanical/Electrical Engineering)/ B.E.
(Mechanical/Electrical Engineering) from Govt. recognized university.
उप महाव्यवस्थापक Full time B.Tech /B.E. in Civil Engineering and M.E / M. Tech (Structure) from a
Govt. recognized Institute / University.
सहाय्यक महाव्यवस्थापक Graduate in Commerce from a recognised university and Chartered Accountant or Cost Accountant/Full time degree in Electrical Engineering from recognized & reputed university/Full time Post- Graduate Degree in Civil Engineering or Architecture or Planning or its equivalent from recognized and reputed university
व्यवस्थापक Graduate in Commerce from recognized university and Chartered Account / Cost Accountant
उप अभियंता Full time Degree in Electrical Engineering from recognized institute / university /college
सहाय्यक व्यवस्थापक Full time B.E (IT or Computer Science Engineering) or MCA or equivalent degree with minimum 60% marks from recognized College / University/Full time Bachelor’s Degree in Architecture.
प्रणाली विश्लेषक Full-time B.E. in Computer Science or Electronics or Electronics and
Telecommunication or B. Sc (IT)
आराखडाकार Full time Degree / Diploma in Civil Engineering from recognized and reputed university
कनिष्ठ अभियंता Full time B.E. / B. Tech or Diploma in Electronics & Telecommunication
Engineering discipline from a Govt. recognized Institute / University
सहाय्यक
  • Full-time B.E (IT or Computer Science Engineering/ Electronics and
    Telecommunication/) or Full-time Bachelor’s degree i.e. B.Sc.
    (IT/Computer)/BCA or equivalent from recognized College/University OR
  • Diploma in Computer Science/Application or equivalent from recognized University/College.

Salary Details For MMRCL Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
महाव्यवस्थापक Rs.1,20,000-2,80,000 (E8)
उप महाव्यवस्थापक Rs. 80,000 – 2,20,000/- (E5)
सहाय्यक महाव्यवस्थापक Rs. 70,000 – 2,00,000/- (E4)
व्यवस्थापक Rs. 60,000 – 1,80,000/- (E3)
उप अभियंता Rs. 50,000 – 1, 60,000/- (E2)
सहाय्यक व्यवस्थापक Rs. 50,000 – 1,60,000/- (E2)
प्रणाली विश्लेषक Rs.40,320 – 77,540/- (W7)
आराखडाकार Rs. 35,280 – 67,920/- (W6)
कनिष्ठ अभियंता Rs. 35,280 – 67,920/- (W6)
सहाय्यक Rs. 34,020 – 64,310/- (W5)

How To Apply For Mumbai Metro Rail Corporation Limited Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 जून 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/Br1Gp
👉ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/NB8lr
✅ अधिकृत वेबसाईट https://mmrcl.com/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदसंख्या किती आहे?

24 जागा

पदाचे नाव काय आहे?

महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उप अभियंता, सहाय्यक व्यवस्थापक, प्रणाली विश्लेषक, आराखडाकार, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक

नोकरी ठिकाण कुठे आहे?

मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

26 जून 2026