Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » ‘सेट’ परीक्षेचे नवीन महत्वाचे शुद्धिपत्रक जाहीर, ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता २५ ऑक्टोबरला | SET Exam Admit Card 2026 Download Link
Last Updated:

‘सेट’ परीक्षेचे नवीन महत्वाचे शुद्धिपत्रक जाहीर, ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता २५ ऑक्टोबरला | SET Exam Admit Card 2026 Download Link

SET Exam Admit Card 2026 Download Link : महाराष्ट्र SET परीक्षा २०२६ संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) २०२६ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार होती. मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. सेट परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम व Exam Pattern PDF येथे डाउनलोड करा

Maharashtra SET Exam Previous Year Paper With Answer PDF @ setexam.unipune.ac.in

MH SET Exam Date 2026 बदलण्याचे कारण

४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक अलीकडे प्राप्त झाले आहे. त्यामुळे परीक्षार्थींना विविध परीक्षांच्या तारखांमध्ये नियोजन करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. याशिवाय, २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवास करताना तसेच परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचताना व्यावहारिक अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा सर्वंकष विचार करण्यात आला.

Advertisement

SET 2026 परीक्षा आता २५ ऑक्टोबरला

परीक्षार्थींचे हित आणि परीक्षा आयोजनातील सोय लक्षात घेऊन २७ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेली ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) आता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या बदलाची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

तपशील माहिती
परीक्षेचे नाव ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) २०२६
पूर्वीची परीक्षा तारीख २७ सप्टेंबर २०२६
सुधारित परीक्षा तारीख २५ ऑक्टोबर २०२६
परीक्षेची स्थिती परीक्षा तारीख बदलण्यात आली
महत्त्वाचे कारण इतर स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक व अनंत चतुर्दशीमुळे प्रवासाच्या अडचणी

MH SET Admit Card 2026 कधी मिळणार?

MH SET Admit Card 2026 बाबत अधिकृत प्रवेशपत्र डाउनलोड तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत SET पोर्टलवरून ते ऑनलाइन डाउनलोड करता येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यावरील परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षा तारीख, वेळ, रिपोर्टिंग वेळ, उमेदवाराचा रोल नंबर आणि इतर सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासोबत आवश्यक ओळखपत्र घेऊन जाणे महत्त्वाचे आहे.

MH SET Admit Card 2026 Download कसे करावे?

  1. महाराष्ट्र SET ची अधिकृत वेबसाइट उघडा.
  2. SET 2026 Admit Card / Hall Ticket लिंकवर क्लिक करा.
  3. आपला Application Number, Login ID किंवा आवश्यक माहिती भरा.
  4. Submit केल्यानंतर तुमचे Admit Card स्क्रीनवर दिसेल.
  5. Admit Card डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  6. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या सूचनांचे पालन करा.
Advertisement

ही सुधारित परीक्षा तारीख सर्व संबंधित परीक्षार्थी, परीक्षा संपर्क प्रमुख तसेच परीक्षा आयोजनाशी संबंधित सर्व यंत्रणांना लागू आहे. त्यामुळे उमेदवारांनी २७ सप्टेंबर २०२६ ऐवजी २५ ऑक्टोबर २०२६ ही सुधारित परीक्षा तारीख लक्षात ठेवावी. SET परीक्षा २०२६ संदर्भातील पुढील सूचना, Admit Card Download लिंक आणि इतर महत्त्वाच्या अपडेटसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे भेट देत राहावे.

महत्त्वाचे: Admit Card ची अधिकृत डाउनलोड लिंक उपलब्ध झाल्यानंतर या पेजवर अपडेट केली जाईल. MahaBharti.in वर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, भरती, निकाल, प्रवेशपत्र आणि शैक्षणिक अपडेट्स मिळवत रहा.

MH SET Admit Card 2026 Download


SET Exam Admit Card – The Maharashtra State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor in Maharashtra and Goa is being conducted on 15th June 2025, for which one lakh 19 thousand 813 candidates have applied. Admit card has been made available to all these candidates in their ‘Login’.  Exam Date – SET Exam 15th June 2025

With the approval of the Pune University Grants Commission, State Level Eligibility Test (SET) is organized by the SET Department of Savitribai Phule Pune University on behalf of the State Government.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे. दि. १५ जून, २०२५ रोजी ४० व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता १८ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले आहे. सदर परीक्षेसंदर्भात समाज माध्यमांवर काही बनावट बातम्या/व्हिडीओ पसरवले जात आहेत, त्यात काहीही तथ्य नसल्याने अशा बातम्या / व्हिडीओवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेऊ नये. त्यास अनुसरून सेट परीक्षा विभागाने खोटी बातमी समाज माध्यमांव्दारे पसरविणा-या व्यक्तीवर सायबर पोलिस स्टेशन पुणे, अर्ज नंबर ८६९/२०२५ व्दारे दिनांक ११.०६.२०२५ रोजी रात्री ९.०० वाजता तकार अर्ज दाखल केलेला आहे. त्यासाठी १ लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केला असून, उमेवारांना त्यांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भरतीचे  संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा तसेच विषयनिहाय मागील वर्षीची प्रश्नपत्रिका या लिंकने डाउनलोड करा

Download your Admit Card either by Login or by Application Number or Student Name.