Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » राज्यात नर्सिंगच्या २,०५० नव्या जागा, तसेच परिचारिकेच्या ८ हजार पदांची भरती होणार! – Nurse bharti 2026
Last Updated:

राज्यात नर्सिंगच्या २,०५० नव्या जागा, तसेच परिचारिकेच्या ८ हजार पदांची भरती होणार! – Nurse bharti 2026

मित्रांनो, एक महत्वाची बातमी  आपल्यासाठी,

राज्यात प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून बी. एस्सी नर्सिंग (परिचर्या पदवी) अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये २ हजार ५० नव्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यामध्ये १० नवीन महाविद्यालये सुरू करण्याबरोबरच पाच महाविद्यालयांमधील जागांमध्ये वाढ आणि आठ जीएनएम महाविद्यालयांचे रुपांतर परिचर्या पदवी महाविद्यालय करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या राज्यात २ लाख १७ हजार ६४० नोंदणीकृत परिचारिका कार्यरत असल्या, तरी वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांमधील आरोग्यसेवांच्या वाढत्या गरजांमुळे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने त्रिस्तरीय नियोजन केले आहे. त्यानुसार, राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेची १० नवीन परिचर्या पदवी महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून, यातून १ हजार जागा निर्माण होतील. तसेच, सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जीएनएम) देणाऱ्या आठ महाविद्यालयांचे १०० विद्यार्थी क्षमतेच्या पदवी महाविद्यालयांमध्ये रुपांतर करून ८०० जागा वाढवल्या जातील. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या ५ सरकारी नर्सिंग महाविद्यालयांची क्षमता ५० वरून १०० केल्याने आणखी २५० जागांची भर पडणार आहे. सध्या राज्यामध्ये परिचर्या पदवी अभ्यासक्रमाच्या १६ हजार ५३० जागा असून, राज्यात वाढणाऱ्या नव्या पदवी महाविद्यालयांमुळे जागांची संख्या १८ हजार ५८० इतकी होणार आहे.

या जिल्ह्यात जागावाढ
मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे व नांदेड येथील पदवी महाविद्यालयांची विद्यार्थी क्षमता ५० वरून १०० विद्यार्थी इतकी होणार आहे. तसेच, मुंबईतील जी. टी. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर व सांगली येथील जीएनएम पदविका परिचर्या महाविद्यालयांचे रुपांतर पदवी महाविद्यालयात होणार आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी १०० जागा असणार आहेत.

राज्य शासन एकीकडे नवनवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू करण्याचे निर्णय घेत असताना, दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या रिक्त पदांकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभरात परिचारिका संवर्गातील तब्बल ८ हजार पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असून, कार्यरत परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत आहे. महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वाधिक ५ हजार पदे रिक्त आहेत. याशिवाय आरोग्य विभागातील २५ हजार २७४ मंजूर पदांपैकी ३ हजार ४१० पदे अद्याप भरलेली नाहीत. परिणामी, अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा देताना परिचारिकांना दुप्पट जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. परिसेविका रंजना नागरे यांनी सांगितले की, “लेबर रूममधील ओटीतील काम परिचारिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक असते. सलग उभे राहून बाळाला रिसीव्ह करणे, ठसे घेणे आणि सर्व डॉक्युमेंटेशन पूर्ण करावे लागते. मात्र प्रत्येक परिचारिका पूर्ण ताकदीने आणि समर्पणाने हे काम करत असते.”

तर एनआयसीयू विभागातील नर्सिंग ऑफिसर प्रमिला गुडेकर यांनी सांगितले की, “प्री-टर्म बाळे आईपासून दूर असल्याने त्यांचे संगोपन आम्हालाच करावे लागते. बाळांना त्रास होऊ नये म्हणून शांत वातावरणात आम्ही त्यांचा आईच्या मायेने सांभाळ करतो.” राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. अन्यथा सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील ताण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांची १७ महाविद्यालये व २७७ खासगी अशा एकूण २९४ नर्सिंग महाविद्यालयांमध्ये १६ हजार ५३० जागा उपलब्ध होत्या. तिसऱ्या फेरीअखेरीस शासकीय १ हजार १८० जागांपैकी १ हजार १७४ जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून केवळ ६ जागा रिक्त आहेत. मात्र, २७७ खासगी १५ हजार ३५० पैकी केवळ ९ हजार ७८३ जागांवर ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश पूर्ण झाल्याचे सीईटीने स्पष्ट केले. खासगी ५ हजार ५६७ जागा रिक्तच आहेत.


सध्या स्टाफ नर्सच्या हजारो पदांसाठी नवीन भरती जाहिराती प्रकाशित  करण्यात आली आहे. सध्या सरकारी रुग्णालयात नर्सचे नर्सचे हजारो पदे रिक्त आहे, या अनुषंगाने सरकार द्वारे नवीन भरती प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. या भरतीचे शॉर्ट नोटिफिकेश आज प्रकाशित झाले आहे. पूर्ण जाहिराती १ -२ दिवसात प्रकाशित होईलच. या भरतीसाठी आरोग्य विभागाने नवीन शॉर्ट नोटीस म्हणजेच लघु जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिराती नुसार , नर्स या पदासाठी तब्ब्ल ११३८९ पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार btsc.bihar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली आणि २३ मे २०२५ पर्यंत आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि अनुभवाच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा आणि अनुभवासाठी वेगवेगळे गुण आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. लेखी परीक्षा संगणक आधारित असेल.

तसेच लक्षात ठेवा, या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे BSc Nursing चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) डिप्लोमा किंवा समतुल्य नर्सिंग चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि हो अजून एक महत्वाचे, उमेदवाराची राज्य नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी अनिवार्य आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही. त्या मुले आपण फ्रेश असाल तरी सुद्धा खुशाल अर्ज करू शकता!  आत बघू या वयोमर्यादे बद्दल माहिती, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३७ वर्षे असावे. वयाची गणना ०१.०८.२०२४ च्या आधारे केली जाईल. अर्ज शुल्काबद्दल सांगायचे झाले तर, सामान्य श्रेणी/मागासवर्ग, अत्यंत मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (बिहार राज्यातील रहिवासी) यांना १५० रुपये भरावे लागतील. यासोबतच, राखीव/अनारक्षित श्रेणीतील (बिहार राज्यातील रहिवासी) महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५० रुपये आणि राज्याबाहेरील उमेदवारांसाठी ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.