राज्यातील चार मनोरुग्णालयांत ४९४ पदे रिक्त !! – Manorugnalay bharti Latest Update
Manorugnalay bharti Latest Update- राज्यात मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार आणि रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी या सेवांचा महत्त्वाचा आधार असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. चार प्रादेशिक मनोरुग्णालयांतील तब्बल ४९४ पदे रिक्त असल्याने मानसिक आरोग्य सेवांवरील ताण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील या रुग्णालयांमध्ये एकूण २,१९६ पदे मंजूर असून, त्यापैकी १,७०२ पदे भरली आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मनोरुग्णांना वेळेत आणि प्रभावी उपचार देण्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये रिक्त पदांचा प्रश्न किती गंभीर आहे, हे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुणे आणि ठाणे येथील मनोरुग्णालयांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे असून, नागपूर आणि रत्नागिरीतील रुग्णालयांनाही मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. आकडेवारीनुसार, पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयात ९५४ मंजूर पदांपैकी ७७१ पदे भरली असून, १८३ पदे रिक्त आहेत. ठाणे येथे ७२३ मंजूर पदांपैकी ५४३ पदे भरली असून, १८० पदे रिक्त आहेत. नागपूरमध्ये ३७५ मंजूर पदांपैकी २९९ पदे भरली असून, ७६ पदे रिक्त आहेत. तर रत्नागिरी येथील रुग्णालयात १४४ मंजूर पदांपैकी ८९ पदे भरली असून, ५२ पदे रिक्त असल्याची नोंद सरकारी आकडेवारीत करण्यात आली आहे.

गट-डमध्ये सर्वाधिक रिक्त पदे
चारही मनोरुग्णालयांतील पदांच्या वर्गवारीनुसार, गट-अ मधील १०३ मंजूर पदांपैकी २६, गट-ब मधील २४ पैकी २०, गट-क मधील ६५५ पैकी १०३ आणि गट-ड मधील १,४१४ पैकी ३४५ पदे रिक्त आहेत.विशेष म्हणजे, गट-डमधील रिक्त पदांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण रिक्त पदांपैकी मोठा हिस्सा या संवर्गातील आहे.मानसिक आजारांवरील उपचारांसोबतच रुग्णांचे पुनर्वसन, व्यवसाय प्रशिक्षण आणि दैनंदिन जीवनात पुन्हा स्थिर होण्यासाठी मदत केली जाते. अशा परिस्थितीत मंजूर पदे पूर्ण क्षमतेने भरणे आणि रुग्णालयांतील सेवा अधिक सक्षम करणे महत्त्वाचे ठरत आहे.