Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी – Mahsul Vibhag Bharti Latest Update
Last Updated:

महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी – Mahsul Vibhag Bharti Latest Update

Mahsul Vibhag Bharti Latest Update – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतिबंध आणि सेवाप्रवेश नियम (रिक्रूटमेंट रुल्स. आरआर) लागू करण्यासाठी सोमवारी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे तब्बल ५० वर्षांनंतर महसूल विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी माध्यमांना दिली. दिल्लीतील आंदोलन जनतेची दिशाभूल नीट पेपरफुटीवरून दिल्लीत सुरू आंदोलन हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि तरुणांना भडकवण्यासाठी होत आहे. पेपरफुटीत सरकारचा दोष नव्हता. व्यवस्थेतील त्रुटी ओळखून सरकारने त्वरित कारवाई केली. जंतर-मंतर येथील आंदोलनात दगडफेकीच्या हेतूने दगड आणल्याची माहिती असून, सरकारला बदनाम करणाऱ्या समाजकंटकांची चौकशी सुरू आहे. राहुल गांधी यांच्या टीकेवर ते म्हणाले की, देशातील १४० कोटी जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान केले आहे. विरोधकांनी टीका करताना तथ्यांचा विचार करावा, केवळ अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

Mahsul Vibhag Bharti Latest Update

SRA तक्रारींची होणार चौकशी एसआरएतील अधिकारी आणि एफएसआय तक्रारीच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आल्यास त्यांची चौकशी केली जाईल. नगरविकास विभागाशी संबंधित तक्रारींची चौकशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, तर महसूल विभागाशी संबंधित बाबींची चौकशी स्वतः आपण करणार आहोत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये १९७७ नंतर प्रथमच बदल केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाने नवीन आकृतिबंध आणि भरती नियम (आरआर)ला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. महसूल अधिकाऱ्यांच्या नियुक्ती व पदोन्नतीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे विभागातील अधिकाऱ्यांना सुलभता मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement