‘महावितरण’च्या भरतीप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, पाच वर्षांपासून ७५७ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत! | Mahavitaran Bharti 2026
Mahavitaran Bharti 2026
महावितरणमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो तरुणांच्या पदरी पाच वर्षांनंतरही केवळ निराशाच पडली आहे. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी’ (महावितरण) च्या २०१९ मधील ‘उपकेंद्र सहाय्यक’ भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवारांना पाच वर्षांनंतरही नियुक्ती मिळालेली नाही. नियमांचे उल्लंघन करून कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्याचा आरोप प्रतीक्षाधारक उमेदवारांनी केला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन आणि ऊर्जा विभागाला दिलेले निर्देशही अद्याप प्रत्यक्षात आले नसल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. महावितरणने २०१९ मध्ये ‘उपकेंद्र सहाय्यक’ पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. २५ ऑगस्ट २०१९ रोजी परीक्षा झाल्यानंतर २८ जून २०२० रोजी दोन हजार उमेदवारांची निवड यादी आणि ९४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली. त्यानंतर महावितरणमध्ये दोन वर्षे शिकाऊ उमेदवारी केलेल्या उमेदवारांचा विचार राहून गेल्याचे निदर्शनास आल्याने २२ ऑगस्ट २०२० रोजी २९४ उमेदवारांची अतिरिक्त निवड यादी आणि ८३ उमेदवारांची अतिरिक्त प्रतीक्षा यादी जाहीर केली. मात्र, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी समांतर आरक्षणाच्या आधारे २८७उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मूत्र प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहिल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भात महावितरणचे संचालक (मानव संसाधन) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. याविषयी बोलताना विद्यार्थी म्हणाले, “आहिरातीतील अटीनुसार अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवारांकडे ‘एनसीटीव्हीटी’ प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. मात्र, हे प्रमाणपत्र नसलेल्या ३५२ उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. एसईबीरी प्रवर्गासाठी अधिसंख्य पदे निर्माण करताना दोन हजार ३०० पदांचा आधार घेण्यात आला; मात्र इतर प्रवर्गासाठी दोन हजार पदांचाच विचार केल्याचा आरोपही उमेदवारांनी नोंदविला आहे. एसईबीसीसाठी निर्माण झालेल्या अधिसंख्य पदांमधील जागा खुल्या प्रवर्गाला देण्याबाबत शासन निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.”
आश्वासनानंतरही प्रतीक्षा कायम
नागपूर येथील २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरणमध्ये सात हजार जागा रिक्त असून प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना सामावून घेऊ,’ अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सात जुलै २०२४ रोजी फडणवीस यांनी ऊर्जा सचिवांना ई-ऑफिसद्वारे तत्काळ कारवाईचे निर्देशही दिले. तसेच, नऊ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विधानसभा आश्वासन समितीच्या बैठकीत रिक्त पदे आणि वयोमर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांना सहानुभूतीपूर्वक न्याय देण्याची शिफारस केल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, अद्याप नियुक्तीबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
Mahavitaran Bharti 2026 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited is invited applications for the various vacant posts of “Chief Legal Advisor”. There are 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible applicants may send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 30th June 2026 . F or more details about Mahavitaran Recruitment 2026, Mahavitaran Bharti 2026, visit our website policebharati.co.in .
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “मुख्य कायदेशीर सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरण भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
महावितरण भरती २०२६
- पदाचे नाव – मुख्य कायदेशीर सल्लागार
- पद संख्या- 01
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज शुल्क- Rs.708/- ( Including CGST & SGST)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन-भरती), भरती कक्ष, महावितरण (MSEDCL), चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2026
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
Mahadiscom Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| मुख्य कायदेशीर सल्लागार | 01 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| मुख्य कायदेशीर सल्लागार | Degree in Law of recognized University. |
Salary Details For Mahavitaran Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| मुख्य कायदेशीर सल्लागार | Rs. 140655 – 5980 – 272215 per month during the period of contract. Allowance and deductions will be as per the Rules of the Company. |
How To Apply For Mahadiscom Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahadiscom.in/en/home/ Bharti 2026
|
|
|
📑 PDF जाहिरात
|
https://shorturl.at/Ce1FH |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://www.mahadiscom.in/en/home/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन-भरती), भरती कक्ष, महावितरण (MSEDCL), चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
30 जून 2026
अर्ज शुल्क किती आहे?
Rs.708/- ( Including CGST & SGST)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
पदसंख्या किती आहे?
01