कारागृह विभागात तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त; नवीन पदभरती जाहिरात… | Maharashtra Prisons Department Bharti 2026
Maharashtra Prisons Clerk Normalization Process 2026
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करत कारागृह व सुधारसेवा विभागाच्या प्रशासकीय रचनेमध्ये व्यापक आणि दूरगामी सुधारणांचा मार्ग मोकळा केला आहे. संदर्भ क्रमांक ४ व ५ येथील शासन निर्णयानुसार, यापूर्वी कारागृह व सुधारसेवा विभागाच्या आस्थापनेवर एकूण ८८ संवर्ग आणि ७०६७ इतकी पदे निर्माण करण्यात आली होती. मात्र, बदलते प्रशासकीय स्वरूप आणि प्रत्यक्ष गरजांचा विचार करता, या ८८ संवर्गांपैकी जेवढे संवर्ग प्रशासकीय सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत, तेवढेच कार्यरत ठेवणे काळाची गरज बनले होते. शासनाच्या सखोल पाहणीत असे निदर्शनास आले की, विभागातील काही संवर्ग हे एकाकी (isolated) स्वरूपाचे होते, तर काही कालबाह्य ठरत होते. त्यामुळे अशा बिगर-महत्त्वाच्या व कालबाह्य झालेल्या संवर्गांना ‘मृत संवर्ग’ घोषित करून कारागृह प्रशासनाला अधिक सक्षम, गतिमान आणि सुटसुटीत बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या नवीन पुनर्रचनेमुळे विभागाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार असून प्रशासकीय कामकाजातील विनाकारण होणारा विलंब टाळण्यास मदत होणार आहे. भरती 2026 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
प्रशासकीय पारदर्शकता आणि कामाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने प्रतिनियुक्ती आणि पदनाम बदलाबाबतही महत्त्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलली आहेत. कारागृह व सुधारसेवा विभागातील काही विशिष्ट संवर्गातील पदे जर इतर संबंधित शासकीय विभागांकडून प्रतिनियुक्तीने भरली, तर प्रशासनाला अधिक अनुभवी, सक्षम आणि प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध होईल, असा स्पष्ट निष्कर्ष शासनाने काढला आहे. याव्यतिरिक्त, सध्या अस्तित्वात असलेल्या काही संवर्गांच्या पदनामांमध्ये असलेली द्विरुक्ती टाळणे, इतर शासकीय विभागांमधील पदनामांशी साधर्म्य साधणे आणि पदनामांमध्ये अधिक स्पष्टता आणणे अत्यंत गरजेचे झाले होते. त्यामुळे कामाचे स्वरूप आणि उत्तरदायित्व अधिक सुस्पष्ट व्हावे या उद्देशाने विविध पदांच्या नामांकनात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांमधील प्रशासकीय गोंधळ दूर होऊन इतर विभागांशी समन्वय साधणे अधिक सोपे होणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने भविष्यातील पदभरती प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करत हा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने कालबाह्य, एकाकी आणि विनाकारण अस्तित्वात असलेल्या संवर्ग-पदांचा आढावा घेऊन त्यांचे एकत्रिकरण (Cadre Clubbing) करण्याचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवेशी संबंधित एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी विभागामध्ये “वैद्यकीय अधिकारी, श्रेणी-२ (वेतनश्रेणी-एस-१६, पदसंख्या-२८)” आणि “वैद्यकीय अधिकारी, श्रेणी-३ (वेतनश्रेणी-एस-१५, पदसंख्या-४८)” हे दोन स्वतंत्र संवर्ग अस्तित्वात होते. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर या वेतनश्रेणीत कोणतीही पदे उपलब्ध नसल्याने, हे दोन्ही संवर्ग मृत घोषित करण्यात आले. प्रतिनियुक्तीची प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता या दोन संवर्गातील एकूण ७६ पदे “वैद्यकीय अधिकारी, श्रेणी-१ (वेतनश्रेणी-एस-२०)” या उच्च संवर्गात रूपांतरित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या फेररचनेमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मूळ पदसंख्येत कोणताही बदल न करता आरोग्य सेवेचा दर्जा अधिक उंचावण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.
एकंदरीत, कारागृह व सुधारसेवा विभागाच्या आस्थापनेवरील ८८ संवर्ग आणि ७०६७ पदांचा सर्वसमावेशक आढावा घेतल्यानंतर, शासनाने आता ६९०९ पदांचा एक सुधारित, सुस्पष्ट आणि आधुनिक आव्हानांना पेलणारा नवा आकृतिबंध अधिकृतपणे जाहीर केला आहे. या नवीन धोरणात्मक निर्णयामुळे विभागाला अत्यंत आवश्यक असलेली प्रशासकीय शिस्त आणि सुसूत्रता प्राप्त होणार आहे. याच शासन निर्णयाचा एक भाग म्हणून, कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबतचा संदर्भ क्रमांक २ येथील जुना शासन निर्णय आता अधिक्रमित (रद्द/सुधारित) करण्यात आला आहे. गृह विभागाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कारागृह विभागातील प्रशासकीय गुंतागुंत संपुष्टात आली असून, भविष्यातील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, कैद्यांचे पुनर्वसन आणि सुरक्षा व्यवस्थेचे सक्षमीकरण या मुख्य ध्येयांकडे अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करणे आता कारागृह विभागाला शक्य होणार आहे.
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
| पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Karagruh Vibhga Shipai Police Bharti
महाराष्ट्र कारागृह विभागात मागील दहा वर्षांपासून तुरुंगाधिकारी (श्रेणी २) पदांची नव्याने भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील मध्यवर्ती (सेंट्रल) आणि खुल्या कारागृहांत अधीक्षक व वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. एकीकडे कैद्यांची संख्या वाढत असल्याने आठ नवीन कारागृहे स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे कैद्यांना सांभाळणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांची पदे रिकामी पडली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पोलिस खात्याप्रमाणे कारागृह विभागात अधिकारी पदांची भरती करावी, अशी मागणी प्रशासनाकडून होऊ लागली आहे. राज्यात नऊ मध्यवर्ती, २८ जिल्हा, १९ खुली आणि प्रत्येकी एक विशेष महिला कारागृह, किशोर सुधारालय व बाल सुधारगृह अशी ६० कारागृहे आहेत. कारागृहांत कैदी ठेवण्याची क्षमता २७ हजार १८४ असताना प्रत्यक्षात ३९ हजार ६४७कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये साडेसहा हजार शिक्षाधीन आणि तीस हजार न्यायाधीन (कच्चे) कैदी वास्तव्याला आहेत. राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी-२ची तब्बल २५० पदे रिक्त आहेत. तुरुंगाधिकारी हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तुरुंगाधिकारी या पदाची पदभरती घेतली जाते. मात्र, गत दहा वर्षांपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती आहे. गृह विभागाने २०१४ पासून तुरुंगाधिकारी श्रेणी-२ या पदभरतीला मंजूरी प्रदान केली नाही. त्यामुळे तुरुंगाधिकारी पदभरतीच्या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक युवकांनी वयोमर्यादादेखील ओलांडली. राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहेत. तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याबाबत कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयाचे प्रमुख डॉ. जालिंदर सुपेकर यांना विचारणा केली असता ही पदे रिक्त आहेत; पण नेमकी किती हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.
राज्यातील कारागृहांत कैद्यांची गर्दी होऊ लागली आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी येरवडा, हिंगोली, भुसावळ आणि गोंदिया येथे नवीन कारागृहे उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. भविष्याचा विचार करून सातारा, सांगली, अंबाजोगाई (बीड) आणि नांदेड या जिल्ह्यांत नवीन कारागृहे उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात कारागृहांची संख्या ६०वरून ६८ होणार आहे. मात्र, कारागृह विभागात मागील दहा वर्षांपासून (२०१५) नव्याने तुरुंग अधिकाऱ्यांची भरती झालेली नाही. दहा वर्षांपूर्वी तुरुंग अधिकारी म्हणून भरती झालेले आज वरिष्ठ तुरुंगाधिकारी (श्रेणी १) म्हणून सेवा बजावत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रमुख मध्यवर्ती, खुल्या कारागृहांत तुरुंग अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत.
राज्यातील सर्वच कारागृहांत क्षमतेच्या दुप्पट कैदी शिक्षा भोगत असताना संबंधित कारागृह प्रशासनाला उपलब्ध मनुष्यबळात कैद्यांची आणि कारागृहाची सुरक्षा सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर कर्मचाऱ्यांची भरती प्रकिया पार पडल्याने विविध प्रमुख कारागृहांना काही प्रमाणात वाढीव मनुष्यबळ मिळाले आहे. त्यामुळे कारागृहाला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या येरवडा कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांची ३३ पदे रिक्त आहेत. मंजूर ४५ पदांपैकी केवळ १२ तुरुंग अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि ४५० कर्मचारी साडेसहा हजार कैद्यांना सांभाळत आहेत. ना जाहिरात, ना पदभरती – एमपीएससीमार्फत तुरुंगाधिकारी या पदासाठी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. मात्र, पदभरतीला गृह विभागाकडून मान्यता मिळाली नाही. गत दहा वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. ना जाहिरात, ना परीक्षा पुढे निवड कधी होणार, हे सांगणे कठीण आहे. प्रशिक्षणाचा तर प्रश्न येत नाही. त्यामुळे या पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणाईच्या स्वप्नावर विरजण येत असल्याचे चित्र आहे.
एडीजी, तीन डीआयजींची पदे रिक्त कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) हे पद रिक्त असून, तीन विशेष पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) पदांचा प्रभारी कारभार सुरू आहे.सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरहे यांच्याकडे कारागृह प्रशासनाच्या एडीजी पदाची धुरा सोपविली आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील पोलीस भरती साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
| चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
|
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?
पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
पोलीस भरती लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
| विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For Karagruh Vibhga Shipai Police Bharti |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Karagruh Vibhga Shipai Police Driver Bharti For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Karagruh Vibhga Shipai Police Bharti |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment |
|
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details |
|
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment
- Karagruh Vibhga Shipai Police Bharti, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police Bharti will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.