महाराष्ट्र पोलीस भरतीची १६,५०० पदांची नवीन जाहिरात लवकरच येणार, पूर्ण माहिती!- Maharashtra Police Bharti Apply Now 2026 – 2027
Maharashtra Police Bharti 2026 – 2027 मित्रांनो, एक म्हत्वाचा अपडेट घेऊन आम्ही समोर आलो आहे, महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुण-तरुणींसाठी २०२६ मधील आगामी पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मागील भरती टप्प्यांमधील मैदानी व लेखी परीक्षांच्या प्रक्रिया आणि उमेदवारांच्या नियुक्तीची अंतिम कामे पूर्ण झाल्यानंतर, आता सर्व उमेदवारांचे लक्ष नवीन पोलीस भरती जाहिरातीकडे लागले आहे. हि नवीन जाहिरात केव्हा येणार या कडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या सर्व उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गृह विभागातील संभाव्य नियोजन आणि पदभरती प्रक्रियेच्या टप्प्यांनुसार, महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन जाहिरात वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान प्रसिद्ध होण्याची प्रबळ शक्यता आहे. आपल्याला माहीतच असेल सध्या, आधीच्या भरती प्रक्रियेतील निवड याद्या आणि कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसेच प्राप्त माहिती नुसार, राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये आणि SRPF गटांमधील रिक्त पदांचा सुधारित अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. रिक्त पदांनुसार वर्गवारी (Reservation) आणि बिंदूनामावली (Bindunamavali) तपासून गृह व वित्त विभागाची मंजुरी मिळण्यास ३ ते ४ महिन्यांचा अवधी लागतो. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना साधारणपणे ३० ते ४० दिवसांचा कालावधी मिळतो. परंतु, शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे जाहिरातीची वाट न पाहता सध्यापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल. चला तर या भरती बद्दल पूर्ण सविस्तर माहिती बघूया.
राज्य पोलीस दलामध्ये सध्या मनुष्यबळाची प्रचंड चणचण भासत असून, लवकरच राज्य शासनाकडून एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. गृह विभागातील सूत्रांनुसार, या वर्षाच्या अखेरीस सुमारे १६,५०० हून अधिक पदांसाठी नवीन पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. गेल्या काही काळापासून राज्यातील रिक्त पदांमुळे पोलीस प्रशासनावरील कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एकीकडे वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि गुन्हेगारीचे बदलते स्वरूप हाताळताना उपलब्ध कर्मचाऱ्यांची होणारी दमछाक लक्षात घेता, नवीन भरती तातडीने राबवणे ही काळाची गरज बनली आहे. या प्रलंबित भरतीमुळे पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटण्यास मदत होईलच, शिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची अहोरात्र तयारी करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींना शासकीय सेवेत रुजू होण्याची आणि राज्यसेवेची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी निघणाऱ्या या भरती जाहिरातीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या नवीन भरती मुळे उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी मिळणार आहे.
Advertisement
तसेच सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलीस यंत्रणेची प्रत्यक्ष स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी राज्याच्या गृह विभागाकडून मागविलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे की, राज्यात तब्बल १६,५०० हून अधिक पोलीस पदे सध्या रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे पोलीस दलावर, विशेषतः पोलीस ठाण्यांच्या दैनंदिन कामकाजावर अभूतपूर्व ताण आला आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) हे कोणत्याही गुन्ह्याच्या तपासातील मुख्य दुवा असतात; परंतु राज्यात सुमारे २,८७८ पीएसआय पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर तपासाचा अतिरिक्त बोझा पडत आहे. परिणामी, गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत पुराव्यांचे संकलन न होणे, न्यायालयात वेळेवर आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यास विलंब होणे आणि त्यामुळे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखासोबतच व्हीआयपी बंदोबस्त, राजकीय सभा, सण-उत्सव आणि आंदोलनांच्या वेळी मोठा पोलीस ताफा वळवावा लागत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत ‘गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर नियंत्रण कसे येणार?’ असा संतप्त सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. खास करून इतक्यात नागपूर शहरात गुन्हेगारी विश्व् आपली हातपाय पसरत आहे कारण शहराचा मोठ्या प्रमाणात विकास सुरु आहे शहरात श्रीमंतांचे प्रमाण वाढत आहे सोबतच गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे, त्या मुळे मुख्यमंत्रांना त्यांच्याच शहरात या वाढत्या गुन्हेगारीवरअंकुश कसा लावला जातो हे बघावे लागेल आणि साठी पोलीस दलाची मोठ्या प्रमाणात आवश्यक लागणार आहे.
सततच्या मनुष्यबळ तुटवड्याचा थेट आणि विपरीत परिणाम कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. पुरेशी संख्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन १२ ते १६ तास, तर अनेकदा साप्ताहिक सुट्ट्या न घेता किंवा सलग duty वर राहावे लागत आहे. या अनियंत्रित कामाच्या वेळांमुळे पोलिसांमध्ये ताणतणाव, नैराश्य, विविध आजारपण आणि कौटुंबिक समस्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. रस्त्यावरील पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती हा गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा मुख्य मार्ग असतो; मात्र मनुष्यबळ कमी असल्याने रात्रीच्या वेळी गस्त घालणे, संवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त ठेवणे किंवा गुन्ह्यांना प्रतिबंध करणे कठीण जात आहे. पोलीस दलाची ही बिघडलेली घडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी नवीन १६,५०० कर्मचाऱ्यांची भरती अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर, वर्षाच्या अखेरीस प्रस्तावित असलेल्या या Mega पोलीस भरतीची तयारी उमेदवारांनी आत्तापासूनच सुरू करणे फायदेशीर ठरेल. पोलीस भरतीची प्रक्रिया सामान्यतः खालील टप्प्यांमध्ये पार पडते:
- मैदानी चाचणी (Physical Test): यामध्ये ५० गुणांसाठी शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये धावणे, गोळाफेक यांसारख्या मैदानी प्रकारांचा समावेश असतो.
- लेखी परीक्षा (Written Exam): मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी १०० गुणांची बहुपर्यायी (MCQ) लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
- वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी: अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे आणि आरोग्य तपासणी करून अंतिम निवड केली जाते.
गृह विभागाकडून लवकरच या भरतीचे अधिकृत वेळापत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस सेवेत भरती होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी मैदानी सराव आणि लेखी परीक्षेचा अभ्यास एकाच वेळी सुरू ठेवून या आगामी संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.