सध्या 7,231 पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत भरतीची जाहिरात प्रक्रिया सुरू झाली आहे तसेच भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या ऐवजी प्रथम मैदानी परीक्षा होणार आहे.
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मुंबईतील वीस मैदानी पोलीस भरती प्रक्रिया करता तयार ठेवण्यास सांगितले आहेत व तसेच सर्व भरती प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या यंत्रणा निग्रणीखाली तयार ठेवण्यास सांगितले आहे.
कुठल्याही परिस्थितीत भरती प्रक्रिया ही पारदर्शी व कोणत्याही तक्रार विना पार पडली पाहिजे असे सूचना महासंचालक कार्यालयाला देण्यात आलेले आहेत.
तसेच मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व इच्छुक उमेदवार यांना भरती प्रक्रियेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.