Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » बीएससी नर्सिंग प्रवेशाला सुरुवात; २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा !! | Maharashtra Nursing Admission 2026
Last Updated:

बीएससी नर्सिंग प्रवेशाला सुरुवात; २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा !! | Maharashtra Nursing Admission 2026

Maharashtra Nursing Admission 2026

Maharashtra Nursing Admission 2026 : बीएससी नर्सिंगमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून, प्रवेश प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी १५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बीएससी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्याची मुदत लक्षात घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ऑनलाइन नोंदणी २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान करता येणार असून, शुल्क भरण्याची अंतिम मुदत ३ सप्टेंबर आहे. ६ सप्टेंबरला कागदपत्र पडताळणी पूर्ण करून नोंदणीकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यादीबाबत पुराव्यासह तक्रारी ८ सप्टेंबरपर्यंत करता येणार असून, अंतिम यादी ११ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. त्यानंतर १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन प्राधान्यक्रम नोंदविता येणार असून, पहिल्या फेरीतील जागावाटप १५ सप्टेंबरला जाहीर केले जाणार आहे.

Advertisement

Maharashtra Nursing Admission 2026