Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » राज्यातील नगरपरिषदांमध्ये नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार, निर्देश जारी! – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026
Last Updated:

राज्यातील नगरपरिषदांमध्ये नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार, निर्देश जारी! – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026

Maharashtra Nagar Parishad Bharti 2026 | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026 @mahadma.maharahtra.gov

Based on the information obtained under the Right to Information (RTI) Act, official details regarding the vacant positions to be filled through direct recruitment have been made available under Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026. The Maharashtra Public Service Commission (MPSC) will be officially conducting the recruitment process to fill these vacant seats across various cadres. The recruitment drive specifically targets Group C vacancies within the Maharashtra Municipal Council departments. These include positions in the Maharashtra Municipal Council Audit and Accounts Service, the Maharashtra Municipal Council Tax Assessment and Administrative Service, the Maharashtra Municipal Council Sanitary Inspector Service, and the Maharashtra Municipal Council Engineering Service for the Civil branch. All of these mentioned Group C posts will be processed and filled through the MPSC for Nagar Parishad Bharti 2026.

सध्या महाराष्ट्र सरकार द्वारे विविध विभागातील रिक्त पदे भरणे सुरु आहे. या अंतर्गत विविध विभागात पदभरती प्रक्रिया सुरु आहे. यातच आता राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेत त्यांच्या सेवाप्रवेश नियमात संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अन्वये सुधारणा करण्याचा सर्वसमावेशक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत त्यांनी नगरपरिषद व नगरपंचायतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांचे शासकीय कर्मचारी म्हणून समायोजन व्हावे, यादृष्टीने आवश्यक नियमांमध्ये योग्य सुधारर्णाचे आदेश दिले. तसेच राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सुमारे ६,५०० मंजूर पदांपैकी सध्या केवळ ३,६०० पदे कार्यरत असून उर्वरित रिक्त पदे तातडीने भरण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणासह इतर अनेक विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाही सामान्य प्रशासन विभागाचे (GAD) बदली धोरण लागू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये पूर्वीप्रमाणे गट ‘क’ व गट ‘ड’ पदांवर शैक्षणिक पात्रतेच्या आधारे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पूर्ववत सुरू करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. नागरी स्थानिक संस्थांमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आय डब्लू बी पी (IWBP) पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर करून सुलभ सेवा प्रदान होणार आहे. आता या भरतीची नवीन जाहिराती लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. पुढील अपडेट साठी या लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, म्हणजे सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील.

माहितीच्या अधिकार अंतर्गत प्रचीती नुसार खालील सरळसेवेने भरल्या जाणान्या रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. १) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा गट क २) महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क ३) महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट क ४) महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट क बरील रिक्त पदांची माहिती तसेब वरील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहे

RTI Vacancies Details

नगरपरिषद राज्यस्तरीय जे MPSC कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती. स्थापत्य अभियंता 476 विद्युत अभियंता 50 संगणक अभियंता 63 पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता 92 लेखापाल व लेखापरीक्षक 177 करनेर धरण प्रशासकीय अधिकारी 783 अग्निशामक सेवा 413 स्वच्छता निरीक्षक 303 एकूण 2357 पदे रिक्त आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Nagar Parishad Bharti 2026 Update

जिल्हानिहाय नगरपरिषद, नगरपंचायतीचे रिक्त पदे – जिल्हानिहाय आकडेवारीत उस्मानाबाद (४४९), नांदेड (२२३), बीड (१५७), जळगाव (१२४), यवतमाळ (१४९), चंद्रपूर (८४), अमरावती (१००), अकोला (७५), वाशिम (४९), बुलढाणा (११४), धुळे (२९), अहमदनगर (१३२), नाशिक (८३), नंदूरबार (१२४), औरंगाबाद (९१), परभणी (७६), जालना (७१), पालाघर (५१), रत्नागिरी (३५), ठाणे (३६), रायगड (४९), सिंधूदुर्ग (२९), कोल्हापूर (४३), सोलापूर (९५), सांगली (९९), सातारा (१२१), पूणे (५४), नागपूर (१२९), वर्धा (८२), भंडारा (४३), गोंदिया (३९), गडचिरोली (६३), हिंगोली (५१), लातूर (७०), असे लक्षणीय रिक्त पदे असल्याचे दिसून येत आहे.


Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026 Latest Update News- महाराष्ट्रातील नगर परिषद, राज्यातील नगर नगरपंचायतीमधील गट क आणि गट डच्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असतानाही रखडली आहे. त्यामुळे टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत संबंधित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी राज्यातील नगरपालिकांच्या सहआयुक्तांना दिले आहेत. विभागीय गोसावी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सामान्य प्रशासनाच्या शासननिर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून, जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टी.सी.एस. आय.ओ.एन. -(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरांवर दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी, असे नमूद केले आहे. सरळ सेवेद्वारे गट क व गट डच्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, सरळसेवा पदभरतीबाबत रूपरेषा, वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सोमवारी याबाबत आढावा बैठक होणार आहे.

आयुक्त तथा संचालक खालील नमूद संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. राज्य स्तरीय संवर्गातील २०२३ मधील १७८२ पदांच्या जाहिराती नुसार
संचालनालयाने महाराष्ट्र नगरपरिषद संवर्गीय पदांची भरती केली आहे नगरपरिषद भरती 2026 गट क & ड या परीक्षेसाठी समिती स्थापन झाली असून या संदर्भातील नवीन परिपत्रक जाहीर झाले आहे. तसेच हि भरती प्रक्रिया TCS व IBPS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीची नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे.

कर निर्धारण श्रेणी अ – 180 जागा
कर निर्धारण श्रेणी ब – 720 जागा
कर निर्धारण श्रेणी क – 1172 जागा

Nagar Parishad Bharti 2025 Vacanct Post Details

महाराष्ट्र शासनामार्फत १५० (६ मे, २०२५ ते २ ऑक्टोंबर, २०२५) दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे.शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील एकूण ७५००० पदे सरळसेवेने भरणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र.५४/का-१३अ दि.४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित म ार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे. अनेक दिवसापासून सुशिक्षित बेरोजगारसाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जाणारी युवा रोजगार परिषद या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कलमूर्गे यांचा सततचा पाठपुरावा चालू होता. अखेर दीड ते दोन वर्षा नंतर मुहूर्त लागले आहे. त्या नुसतं हि जाहिराती लवकरच येत्या काही दिवसात जाहीर होऊ शकते. ता बद्दलची पूर्ण जाहिरात आम्ही policebharati.co.in वर प्रकाशित करूच.

वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि/२०२२/आपूका. दिनांक ३१/१०/२०२२ नुसार पदभरतीसाठी शिथिलता लागू करणेत आली असून सरळसेवा पदभरती प्रक्रिया दिनांक १५.०८.२०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहे, असे नमूद केले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्रक्र. १३६/का-१३अ दि.२१ नॉव्होबर, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्दे शनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेसाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी.एस. आयओ. एन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेस लिमि टेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी, असे नमूद करणेत आले आहे.

संदर्भीय पत्र क्र.४ अन्वये सरळसेवेद्वारे गट-क व गट-ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळसेवा पदभरतीबाबत रुपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरुन दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविणेबाबत सूचना / मार्गदर्शन करणेत आले आहे. परंतू आपल्या कार्यालयाकडून सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करणेत आलेला नाही वा जाहिरात प्रसिध्द करणेत आलेले नाही, असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगरपरिषदा / नगरपंचायती मधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणे बाबत सरळसेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन, उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांचेसमवेत सामंजस्य करार तात्काळ करून, कार्यक्रम रूपरेषा /वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिध्द करावी, असे आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचालनालय मनोज रानडे यांनी परिपत्रका द्वारे सांगितले आहेत.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Educational Qualification For Mahadma Maharashtra Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

विद्युत अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

संगणक अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

लेखापाल/ लेखापरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक

ii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी i. मान्यताप्राप्त पदवीधारक

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

अग्निशमन अधिकारी 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक

ii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण

iii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

स्वच्छता निरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक

ii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक


Maharashtra Nagar Parishad Bharti – The recruitment process is going on for various posts under the Municipal Council Administration Directorate of the State Government. However, even though 553 posts of Sanitation Inspector Group ‘C’ category have been approved under Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026, these posts are not included in the recruitment. Online applications are invited for this recruitment exam. However, there is displeasure among the competitive examinees as the post of sanitation inspector has been excluded from this. 553 posts have been sanctioned under Maharashtra Municipal Council Sanitation Inspector Group ‘C’. Out of that 136 posts have been filled including municipal council or municipal panchayat employees under Maharashtra Nagar Parishad Bharti  . Even though the remaining 417 posts are vacant, there is no mention of Group ‘C’ post under Maharashtra Municipal Council Sanitary Inspector Service in the recruitment. Therefore, there is a demand that the government should immediately take notice of this and include these posts through Maharashtra Nagar Parishad Recruitment .

Maharashtra Nagar Palika Recruitment : Maharashtra Directorate of Municipal Corporation ( DMA Maharashtra Bharti 2026 ) has released Maharashtra Nagar Palika Bharti Notification for various posts such as Accountant/ Auditor, Tax Assessment & Administrative Officer, Fire Officer and Sanitation Inspector. The Maharashtra Nagar Palika Recruitment Online Application began on 13th July and the last date to Apply is 20th August . The applications can be submitted on the official website @mahadma.maharashtra.gov.in. For the Maharashtra Nagar Palika Bharti, a total of 1782 vacancies have been announced for the aforementioned posts. The direct link to apply, important dates, vacancy details, and others are given below.

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्वच्छता निरीक्षक गट ‘क’ श्रेणीची ५५३ पदे मंजूर असतानाही पदभरतीमध्ये या पदांचा समावेश नाही.‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’ मधील विविध संवर्गातील १७८२ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या पदभरतीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. मात्र, यामधून स्वच्छता निरीक्षकाचे पद वगळण्यात आल्याने स्पर्धा परीक्षार्थींमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक गट ‘क’ अंतर्गत ५५३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील १३६ पदे ही नगरपरिषद किंवा नगरपंचायत कर्मचारीचा समावेश करून भरण्यात आली आहेत. उर्वरित ४१७ पदे रिक्त असतानाही पदभरतीमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा अंतर्गत गट ‘क’चे एकही पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन या पदांचा समावेश करावा अशी मागणी होत आहे.

नगरपरिषद संचालनाच्या विविध पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना ‘एमएससीआयटी’चे प्रमाणपत्र मागितले जात आहे. मात्र, २००३ पासून ‘एमएससीआयटी’ची अट काढून घेण्यात आली आहे. यामुळे अनेकांना अर्ज करण्यात अडचण येत आहे. अनेक महत्त्वाच्या परीक्षांसाठी आता ‘एमएससीआयटी’ची अट नसताना केवळ संगणक ज्ञानाचे कारण सांगून उमेदवारांना पदभरतीपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे.

Maharashtra Nagar Parishad Recruitment Age Limit- [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • Open Category: 21 to 38 Years.
  • Reserve Category: 21 to 43 Years.

Division Wise Nagar Parishad Vacancy 2026

How To Apply For Nagar Parishad Bharti Maharashtra 2026

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

This advertisement is old new advertisements will be coming soon.

????निवड प्रक्रिया आणि सिल्याबस
येथे क्लिक करा
???? Full PDF जाहिरात
https://shorturl.at/clBS7ge
????ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/gjW5dsD (लिंक सुरु)
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadma.maharashtra.gov.in