126243696 20220702253l.jpg

Maharashtra Guardian Minister List : पालकमंत्र्यांची नावे जाहीर, वाचा- तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. गेले अनेक दिवस पालकमंत्र्यांची नेमणूक कधी होणार हा प्रश्न विचारला जात होता. अखेर आज पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

 • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर आणि सोलापूर,
 • सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर आणि गोंदिया.
 • चंद्रकांत पाटील- पुणे.
 • विजयकुमार गावित- नंदुरबार.
 • गिरीश महाजन- धुळे,लातूर, आणि नांदेड.
 • गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव.
 • दादा भुसे- नाशिक.
 • संजय राठोड- यवतमाळ आणि वाशिम.
 • सुरेश खाडे- सांगली.
 • संदिपान भुमरे -औरंगाबाद
 • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड.
 • तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद.
 • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
 • अब्दुल सत्तार- हिंगोली.
 • दीपक केसरकर -मुंबई शहर आणि कोल्हापूर.
 • अतुल सावे – जालना, बीड.
 • शंभूराज देसाई – सातारा, ठाणे.
 • मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *