Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालकांची पदे भरणार, नवीन पदभरती प्रक्रिया – Granthpal Bharti Maharashtra 2026
Last Updated:

ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालकांची पदे भरणार, नवीन पदभरती प्रक्रिया – Granthpal Bharti Maharashtra 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Granthpal Bharti Maharashtra 2026

यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव रेड्डी, संचालक डॉ. देवळाणकर यांचे अ.भा. राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने या पदभरतीमध्ये स्पष्ट उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणून दिले. उच्च शिक्षण राष्ट्रीय सचिव प्रा. प्रदीप खेडकर यांनी आभार व्यक्त केले आहेत नॅक मूल्यांकन व इतर मूल्यांकन समितीच्या दृष्टीने महाविद्यालयात कायमस्वरूपी ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिली आहेत. राज्यातील २००१ पूर्वीच्या विनाआनुदानीत ७८ महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी २० वर्षापासून या महाविद्यालयातील कर्मचारी संघर्ष करीत आहेत. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र देऊन राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील आतापर्यंत रिक्त ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती तातडीने करावी व २००१ पूर्वीच्या विनाआनुदानीत महाविद्यालयांना अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.

Advertisement

प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक ही पदे महाविद्यालयातील प्राचार्य खालोखाल अत्यंत महत्वाची आहेत. महाविद्यालयात ही एकाकी पदे असून, पदे रिक्त आहे. याची उच्च शिक्षण मंत्र्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. या पदांची भरती प्राचार्य पदाच्या भरतीप्रमाणे करावी. ज्या महाविद्यालयामध्ये पद रिक्त होईल, त्या महाविद्यालयाला पदभरतीसाठी तातडीने विना अट परवानगी द्यावी.