खुशखबर! आरोग्य विभागात गट क, ड च्या ७,१९५ पदांची भरती प्रक्रिया मंजूर TCS,MPSC द्वारे… ! – Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – Maharashtra Arogya Vibhag (Health Department Maharashtra State) announces new Mega Recruitment For the more than 5 thousand vacancies to Fulfill the Vacancies For the Grade A, B, C, and D Posts like- “Medical Officer, Arogya Sevak/Sevika, Stuff Nurse, ANM, GNM, Lab Technician, Physician, Anesthetist, Pediatrician, Surgeon, Radiologist, Nephrologist, Dialysis Technician, Dental Hygienist, Medical Officer, Instructor for Hearing Impaired Children, JE, Medical Officer, Pediatrician, Physiotherapist, Audiologist, Cum Speech Therapist, Psychologist, Optometrist, etc”. Eligible candidates are directed to submit their application online through http://arogya.maharashtra.gov.in/ this Website. Date to start online application form will be live soon. Total 5000+ Vacant Posts have been announced by Maharashtra Arogya Vibhag (Health Department Maharashtra State) Recruitment Board, Maharashtra, in the advertisement 2026. Eligible candidates are directed to submit their application online through www.arogya.maharashtra.gov.in. Candidates are requested to read the detailed advertisement (जाहिरात PDF) carefully before applying this Arogya Vibhag Bharti 2026 – 2027 Application Process. Applicants can easily know all the latest updates of Maharashtra Health Department—Arogya Vibhag Bharti in this page. So, bookmark this page for more information about Maharashtra Health Department Bharti 2026. The PDF Advertisement will be out soon on MahaBharti.in
आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागात पदभरती प्रक्रियेबाबत खालील महत्त्वाचे अपडेट्स
वरील विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन २०२३ पदभरतीच्या अनुषंगाने गट-क व गट-ड संवर्गाची १०९४९ पदांची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यापैकी गट-क सवर्गाचे ६०४६ व गट-ड संवर्गाचे ३५१९ असे एकुण ९५६५ पदे भरुन रुग्णसेवेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. आता, विभागाच्या गट क संवर्गाचे सरळसेवेच्या कोट्यातील ४४७६ पदे रिक्त आहे व गट ड संवर्गाचे सरळसेवेच्या कोट्यातील २४६५ पदे असे एकुण ६९४१ पदे रिक्त आहेत. यास्तव शासनास विनंती करण्यात येते की, नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व सर्व कार्यक्रम प्रमुख व उपंसचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्याचेकडील गट-क व ड संवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासर्वीय कक्षाकडून विंदुनामावली प्रमाणित करून घेण्याबाबत व पदभरती प्रक्रीया टी.सी.एस.-आय.ओ.एन. (टाटा कंन्सलटंसी सर्विसेस लिमीटेड) अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेमार्फत करण्यात यावी याबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शनपर आदेंश व्हावेत, ही विनंती. या आरोग्य विभाग भरतीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी या लिंक वर उपलब्ध आहे.
१. गट ‘क’ व ‘ड’ मधील ७,१९५ पदांची भरती: आरोग्य विभागात रिक्त असलेल्या ७,१९५ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती TCS iON किंवा MPSC मार्फत राबवण्याबाबत शासनस्तरावर मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.
२. ५,२२३ नवीन पदांना मंजुरी: राज्यातील २५९ नवीन/श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी ५,२२३ नवीन पदांची निर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील विविध वैद्यकीय, तांत्रिक आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे.
३. पदभरतीची प्रक्रिया: भरती प्रक्रियेसाठी राज्य, प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तांत्रिक पदांसाठी शैक्षणिक अर्हतेवर ८०% आणि उर्वरित विषयांवर २०% गुण अशी परीक्षा पद्धती निश्चित करण्यात आली आहे.
राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील ५ हजार नव्या पदांच्या भरतीला गती देण्यात येणार असून १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १,९०० कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) पदेही लवकरच भरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरोग्य विभागाने रिक्त पदांचा तपशील मागवला आहे. या अनुषंगाने भरतीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तसेच, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, मंत्रिमंडळाने नव्या पदांना मंजुरी दिली असून या आठवड्यात भरती प्रक्रिया वेगाने राबविली जाईल. उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रलंबित निधीही आठवडाभरात वितरित ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती पूर्ण करण्यात येणार आहे. अनेक असूनही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सेवा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. नव्या भरतीमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन सेवा सुरू मदत होईल. करण्यास रुग्णालयांच्या बांधकामासाठी ५०, ७०, ७५ आणि ९० टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी देण्यात येणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी निधी वाढविण्याबाबत समिती स्थापन केली जाणार आहे.
आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून, या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल. तसेच आजच्या डॉक्टर्स दिनी १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १,९०० कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची (CHO) पदेही भरली जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ व ईएसआयसी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई सुरू असून दोन-तीन संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशाराही आबिटकर यांनी दिला. या चर्चेत विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे यांच्यासह अनेक सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026: मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच आरोग्य विभागात पदभरती करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात नवीन GR जाहीर झाला आहे. या नुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. साहजिकच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. बुधवार, दि. २४ जून रोजी सरकारने एक शासन निर्णय जारी करत ५ हजार २२३ पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पदभरती संदर्भातील कार्यवाही लवकरच सुरु होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धीत एकूण २५९ रुग्णसंस्थांसाठी शासन निर्णय हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, मुकादम, सफाईगार, शिपाई, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यासह इतरही पदांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या ज्या आरोग्य संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत, त्यात जिल्हा रुग्णालय ठाणे, जिल्हा रुग्णालय, बीड, जिल्हा रुग्णालय अकोला, सामान्य रुग्णालय- मंचर, आंबेगाव, इचलकरंजी, सामान्य रुग्णालय, इचलकरंजी, संदर्भ सेवा रुग्णालय ठाणे, नाशिक. तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपजिलहा रुग्णालय- अंजनगाव सुर्जी, चिखली जि. बुलढाणा, वरुड जि. अमरावती, सोयगाव, धानोरा जि. गडचिरोली, माजलगाव जि. बीड, आटपाटी जि. सांगली, जत जि. सांगली, देवगड जि. सिंधुदुर्ग, दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, अमळनेर जि. जळगाव, मानत जि. परभणी, अजिंठा जि. छ. संभाजी नगर या सर्व रुग्णालयांची क्षमता ३० खाटांवरुन ५० खाटांवर वाढविण्यात येत आहे. त्यामुळे येतील रिक्त जागांची भरती होईल.
यासोबतच ३० खाटांवरुन १०० खाटांच्या रुग्णालयांमध्ये उपजिल्हा रुग्णालय- अकोट जि. अकोला, मोर्शी जि. अमरावती, जामखेड जि. अहिल्यानगर, सुपा जि. पुणे, बार्शी जि. सोलापूर, घनसावंगी जि. जालना या रुग्णालयांचा समावेश आहे. स्त्री रुग्णालय हिंगोली, नाशिक येथे १०० खाटा नव्याने निर्माण करण्यात येत असल्याने त्यासाठीही वेगळी पदनिर्मिती करण्यात येत आहे. ट्रॉमा केअर युनिट चाळीसगाव, मेहकर, वडगाव मावळ, उमरेड, कुर्डूवाडी या रुग्णालयांचाही समावेश आहे.
एवढंच नाही तर आयुष रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र, राज्यस्तरिय प्रशिक्षण केंद्र, राज्यस्तरिय औषधी भांडार या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पद निर्माण करण्यात आलेले आहेत. २५९ रुग्णसंस्थांसाठी एकूण ५२२३ पदे निर्मितीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे.
राज्यात नागरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘नागरी व ग्रामीण लोककल्याण अभियान’ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे. या मोहिमेत रिक्त पदे भरण्यापासून ते महिलांसाठी विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यापर्यंतच्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिकांच्या क्षेत्रात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ३५१ ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे आणि २६ ठिकाणी ‘पॉलिक्लिनिक’ कार्यान्वित केली जातील. याशिवाय राज्य योजनेतून ३१ नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे.
या नवीन आणि विद्यमान आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने विशेष मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची एकूण ६ हजार २५८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्य योजनेंतर्गत (आपला दवाखाना) वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची एकूण ५६५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. नागरी क्षेत्रांसाठी आशा स्वयंसेविकांची १ हजार ९५ पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे लिहून घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आवश्यक औषध यादीमधील सर्व औषधे रुग्णांना विनाशुल्क पुरवून ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शासकीय रुग्णालयात घेणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्क्यांवरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्या दरवर्षी चर्चेचा आणि कधी कधी वादाचा विषय ठरतात. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला गती देत स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याशिवाय बदल्यांचे महत्त्वपूर्ण वेळापत्रकही जाहीर केले गेले आहे.
महत्त्वाचे वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे:
- अंतिम प्रस्ताव सादर करणे: १५ मे पर्यंत सर्वसाधारण बदल्यांचे अंतिम प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते.
- बदली आदेश: ३१ मे रोजी कर्मचाऱ्यांचे अंतिम बदली आदेश जारी केले जातील.
- बदली प्रक्रियेचे स्वरूप: संपूर्ण ८ परिमंडळांमधील सर्व कार्यक्रम प्रमुखांच्या बदल्या टप्प्याटप्प्याने समुपदेशनाद्वारे पार पाडल्या जातील.
- प्राधान्यक्रम: या प्रक्रियेत सेवा कालावधी, प्राधान्यक्रम, आणि दुर्गम भागातील सेवेला विशेष महत्त्व दिले जात आहे.
- मानवी बाबी: अपंग कर्मचारी, गंभीर आजारांनी ग्रस्त कर्मचारी, विधवा महिला, पती-पत्नी एकत्रीकरण आणि शैक्षणिक कारणे यांसारख्या संवेदनशील बाबींचाही यात सकारात्मक विचार केला जाईल.
- पारदर्शकता: प्रक्रिया पूर्णपणे प्रशासकीय पद्धतीने होत असून, कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप अथवा दबाव सहन केला जाणार नाही
महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची बहुप्रतिक्षित प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. यावर्षी बदल्यांची ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत व्हावी यासाठी ‘समुपदेशन’ (Counseling) पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, बदल्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे आता जाहीर करण्यात आली आहेत.
बदल्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
- ६ मे २०२६:रिक्त पदांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली.
- ८ मे २०२६: बदलीपात्र कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी जाहीर झाली.
- १० मे २०२६: नागरी सेवा मंडळासमोर (Civil Services Board) आवश्यक प्रपत्रे सादर करण्यात आली.
- १५ मे २०२६: समुपदेशनाद्वारे बदल्यांचे अंतिम प्रस्ताव पाठविण्याची मुदत.
- ३१ मे २०२६: बदलीचे अंतिम आदेश विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील
मानवीय बाबींना विशेष प्राधान्य:
या बदली धोरणात केवळ प्रशासकीय निकषच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आणि आरोग्यविषयक समस्यांचाही विचार करण्यात आला आहे. यामध्ये खालील बाबींना प्राधान्य दिले जाईल:
१. दिव्यांग कर्मचारी आणि गंभीर आजाराने ग्रस्त कर्मचारी.
२. विधवा, परित्यक्ता महिला कर्मचारी.
३. पती-पत्नी एकत्रीकरण निकष.
४. ज्या कर्मचाऱ्यांची मुले शेवटच्या शैक्षणिक वर्षात (१०वी/१२वी) आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अडचणी.
५. दुर्गम भागात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना पसंतीचा जिल्हा मिळण्याची संधी.
चार निरीक्षकांचे विशेष लक्ष:
संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘निरीक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे. बदली प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा बाह्य दबाव खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. संपूर्ण प्रक्रिया ही ‘ऑनलाइन’ आणि गुणवत्तेवर आधारित राहणार आहे.
प्रशासकीय सुधारणेवर भर:
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविली जात आहे. मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम झाल्यास ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट होईल, असा विश्वास आरोग्य संचालकांनी व्यक्त केला आहे.
बदल काय केले आहेत? (Changes made):
१. मूळ बातमीतील माहिती अधिक स्पष्ट आणि मुद्देसूद मांडली आहे.
२. तारखांच्या वेळापत्रकासाठी स्वतंत्र विभाग केला आहे जेणेकरून वाचकांना ते सहज समजेल.
३. ‘मानवीय बाबी’ आणि ‘निरीक्षकांची नियुक्ती’ या मुद्द्यांना ठळक महत्त्व दिले आहे.
४. बातमीची रचना अधिक व्यावसायिक (Professional) वृत्तपत्राच्या शैलीत केली आहे.
NHM Maharashtra Bharti 2026
महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच आरोग्य विभागात मोठी ५ हजार पदांची महाभरती सुरु होणार आहे. या मुळे उमेदवारांना विविध पदांसाठी नोकरीच्या भरपूर संधी मिळणार आहे. ‘जनतेला आरोग्यसेवा देण्यासाठी राज्यात मोठ्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. राज्यात अनेक सरकारी रुग्णालये बांधून तयार आहेत. मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने या आरोग्य सुविधा सुरू करता येत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागात पाच हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील दीड महिन्यात सुरू होईल,’ अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिली. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या मोहिमेच्या विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
या नवीन भरती मुळे आरोग्य विभागाच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. ‘महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा बांधून तयार आहेत. त्या सुरू करण्यात केवळ मनुष्यबळाचा प्रश्न आहे. पाच हजार कर्मचारी पदांच्या मान्यतेचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर पुढील आठवड्यात बैठक अपेक्षित आहे. भरतीला मंजुरी मिळाल्यानंतर महिना ते दीड महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होईल.’, असे ते म्हणाले. ‘शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शहरांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दिली आहे. आधी महापालिकांमध्ये ही सेवा विभागलेली होती. संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रम आणि इतर अभियाने राबविण्यात त्यामुळे अडचणी येत होत्या. शहरी आरोग्य आयुक्तालयाचे काम जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाच्या धर्तीवर चालेल. आयुक्तालय महापालिकांच्या आरोग्य सेवांवर बारकाईने देखरेख ठेवेल. याचबरोबर आरोग्य मोहिमांच्या अंमलबजावणीला गती देईल. या आयुक्तालयाची आस्थापना आणि इतर बाबींवर सध्या काम सुरू आहे,’ असेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.
‘सरकारी योजनांसाठी प्रयत्नशील’
‘महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना एकत्रितपणे राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजना जास्तीत जास्त रुग्णालयांमध्ये लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये योजना लागू करण्याचा आदेश देण्यात आला, परंतु, काही रुग्णालयांनी या बाबत न्यायालयात याचिका दाखल केली, धर्मादाय रुग्णालयांमध्ये योजना लागू व्हावी म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकरणांत संबंधित कंत्राटदार किंवा कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार आहोत,’ असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
बदल काय केले आहेत?
(Changes made): १. मूळ बातमीतील माहिती अधिक स्पष्ट आणि मुद्देसूद मांडली आहे. २. तारखांच्या वेळापत्रकासाठी स्वतंत्र विभाग केला आहे जेणेकरून वाचकांना ते सहज समजेल. ३. ‘मानवीय बाबी’ आणि ‘निरीक्षकांची नियुक्ती’ या मुद्द्यांना ठळक महत्त्व दिले आहे. ४. बातमीची रचना अधिक व्यावसायिक (Professional) वृत्तपत्राच्या शैलीत केली आहे.