Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC 258 कृषीसेवा उमेदवारांच्या नियुक्तीला वेग नवीन अपडेट जाहीर! | Maharashtra Agriculture Services Result 2026
Last Updated:

MPSC 258 कृषीसेवा उमेदवारांच्या नियुक्तीला वेग नवीन अपडेट जाहीर! | Maharashtra Agriculture Services Result 2026

Maharashtra Agriculture Services Result 2026

Maharashtra Agriculture Services Result : महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024 मधून निवड झालेल्या 258 शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न आता वेगाने मार्गी लागणार आहे. नियुक्तीच्या मागणीसाठी उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत पुढील आठ दिवसांत वैद्यकीय तपासणी आणि पोलीस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘दैनिक प्रभात’ला दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2024 मध्ये कृषी विभागातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी अधिकारी-कनिष्ठ या पदांसाठी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून 258 उमेदवारांची निवड झाली असून, त्यांची शिफारस यादी 19 जून 2026 रोजी कृषी विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर विभागीय कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, 21 जुलै 2026 रोजी सर्व 258 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणीही पूर्ण झाली आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advertisement

निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती प्रलंबित राहिल्याने उमेदवारांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने कृषिमंत्री भरणे यांची मंत्रालयात भेट घेऊन नियुक्तीबाबत निवेदन दिले. मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकर मार्गी लागणे आवश्यक असल्याचे भरणे यांनी सांगितले. निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी संबंधित विभागाने वेळेत पाठपुरावा करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आणि पोलीस पडताळणी पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. नियुक्ती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. उमेदवारांनी काळजी करू नये. त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सकारात्मक पद्धतीने लवकरात लवकर सोडविण्यासाठी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 258 उमेदवारांना या निर्देशामुळे दिलासा मिळाला असून, आता वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

MPSC 258 कृषीसेवा उमेदवारांच्या नियुक्तीला वेग नवीन अपडेट जाहीर! | Maharashtra Agriculture Services Result 2026

जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४ – अंतिम शिफारस यादी

जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४ – गुणवत्ता यादी


Previous Post:

Maharashtra Agriculture Services Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या अंतिम निवड यादीस पुन्हा विलंब होत असल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्य परीक्षा, मुलाखती तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होऊनही अंतिम निवड यादी अद्याप प्रसिद्ध न झाल्याने हजारो उमेदवारांचे भविष्य अनिश्चिततेत अडकले आहे.

Advertisement

भरती प्रक्रियेतील हे आहेत प्रमुख टप्पे

  • जाहीरात प्रसिद्ध : २६ सप्टेंबर २०२४
  • पूर्व परीक्षा : १ डिसेंबर २०२४
  • पूर्व परीक्षा निकाल : ८ एप्रिल २०२५
  • मुख्य परीक्षा : १८ मे २०२५
  • मुख्य परीक्षा निकाल २४ डिसेंबर २०२५
  • मुलाखती : २३ जाने. ते १० फेब्रुवारी २०२६

महाराष्ट्र कृषी सेवा भरती प्रक्रियेची सुरुवात सप्टेंबर २०२४ मध्ये झाली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखती तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी हे सर्व टप्पे पूर्ण झाले. मात्र मुलाखत प्रक्रिया पूर्ण होऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया जवळपास दोन वर्षांपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निकालाबाबत आयोगाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक उमेदवारांनी इतर नोकरीच्या संधी तसेच पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर मर्यादा आणून या भरती प्रक्रियेची प्रतीक्षा केली आहे. एका उमेदवाराने सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अंतिम यादी प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे, असे मत व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.

उमेदवारांच्या प्रमुख मागण्या

  • महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ ची अंतिम निवड यादी तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
  • अंतिम निकालास होणाऱ्या विलंबामागील कारणे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात यावीत.
  • उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी विभागाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत सुमारे २५८ वर्ग-१ व वर्ग-२ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या
  • असल्याचे सांगितले जात आहे. या नियुक्त्या वेळेत झाल्यास कृषी विभागाच्या कामकाजाला गती मिळू शकते.
  • कृषी विभागातील रिक्त पदांमुळे विविध प्रशासकीय कामांवर परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आयोगाने या प्रक्रियेला आणखी विलंब न लावता अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Maharashtra Agriculture Services Result : The Maharashtra Public Service Commission announced the General Merit List within just an hour after the completion of the Maharashtra Agricultural Services Main Exam Interview Program 2024 today on 24 Dec 2025. Check your result from followign given PDF file

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

MPSC Krushi Seva Result 2026

Maharashtra Agriculture Services Main Examination 2024 -General Merit List