Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » अग्निवीरांना मिळणार कायमस्वरूपी नोकरी, ४ वर्षानंतरही सेवा कायम, तिन्ही सैन्यदलाचा प्रस्ताव! | Maharashtra Agniveer Bharti 2026
Last Updated:

अग्निवीरांना मिळणार कायमस्वरूपी नोकरी, ४ वर्षानंतरही सेवा कायम, तिन्ही सैन्यदलाचा प्रस्ताव! | Maharashtra Agniveer Bharti 2026

Maharashtra Agniveer Bharti 2026

Maharashtra Agniveer Bharti 2026 : अग्निवीर योजनेतून भरती झालेल्या जवानांनी ४ वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर नियमित सैन्य दलात काम करण्याचा त्यांचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत कायम ठेवण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्याच्या नियमांनुसार ४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांपैकी केवळ २५ टक्क्यांनाच नियमित सेवेत कायम ठेवता येते. परंतु ही मर्यादा वाढवण्याचा आता गांभीर्याने विचार केला जात आहे. रिपोर्टनुसार, नौदलाने अग्निवीरांपैकी जास्तीत जास्त ७५ टक्के जवानांना कायम सेवेत ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. लष्कर आणि हवाई दलाने ही मर्यादा सध्याच्या २५ टक्क्यांवरून अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आणि सध्याच्या नियमांनुसार तिन्ही दलांमध्ये २५ टक्के जवान कायम ठेवण्याची मर्यादा कायम आहे.

सुरुवातीच्या बॅचचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होणार
अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या पहिल्या अग्नीवीरांनी २०२३ च्या सुरुवातीला प्रशिक्षण सुरू केले. या सुरुवातीच्या बॅचचा ४ वर्षांचा कार्यकाळ आता या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. सध्याच्या प्रणालीनुसार सर्व अग्निवीरांना प्रथम सेवेतून सेवानिवृत्त केले जाईल आणि त्यानंतर जे अग्निवीर स्वेच्छेने सैन्यात राहणे पसंत करतील, त्यांपैकी ठराविक संख्येच्या अग्निवीरांना गुणवत्तेच्या आधारावर नियमित सैनिक म्हणून पुन्हा सेवेत घेतले जाईल. गेल्या चार वर्षांत अग्निवीरांनी आधुनिक शस्त्रे, नवीन तंत्रज्ञान आणि विविध लष्करी कारवायांमध्ये मोठा अनुभव मिळवला आहे. अशा प्रशिक्षित आणि अनुभवी सैनिकांना मोठ्या संख्येने सैन्यात ठेवणे हे राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी क्षमतेसाठी फायदेशीर ठरेल असा सशस्त्र दलांचा विश्वास आहे. म्हणूनच सैनिकांना सैन्यात कायम ठेवण्याचे प्रमाण वाढवण्याची मागणी होत आहे.


मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे (एमएलआयआरसी) २७ जूनपासून ३ जुलैपर्यंत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेंटरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही भरती होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात व आंध्र प्रदेशातील उमेदवारांना भरतीत सहभागी होता येणार आहे. २८ व २९ जून रोजी महाराष्ट्रातील, तर १ जुलै रोजी कर्नाटकातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. पहिल्या दिवशी २७ जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे.

२८ जून रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी भरती होईल. यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांना सहभागी होता येईल. तर २९ रोजी नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.

१ जुलै मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २ जुलै रोजी ट्रेडस्मन पदासाठी भरती होईल. ३ जुलै रोजी ऑफिस असिस्टंट (क्लर्क), स्टोअरकिपर टेक्निकल या पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना संधी देण्यात येईल. सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा इन्फंट्रीतर्फे करण्यात आले आहे.

वयोमर्यादा अन् शैक्षणिक पात्रता
अग्निवीर जीडी, ट्रेडस्मन व क्लर्क पदासाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सोल्जर जीडी पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण तसेच ट्रेडस्मन पदासाठी दहावी व आठवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. खेळाडूंना राज्य तसेच राष्ट्रीयस्तरावरील विजेते प्रमाणपत्र आणावे लागणार आहे.


Maharashtra Agniveer Bharti 2026

Maharashtra Agniveer Bharti 2026 : अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर भरती प्रक्रियेकरिता अविवाहित पुरुष उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत १ एप्रिल २०२६ अशी असून, सामाईक प्रवेश परीक्षा जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. पुणे भरती कार्यालय (मुख्यालय) कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांनी १ एप्रिल २०२६ पूर्वी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..


Maharashtra Agniveer Bharti 2026

Maharashtra Agniveer Bharti 2026 : मुख्यालय भरती क्षेत्र, पुणे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्यातील सहा जिल्ह्यांतील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर निवड झालेल्या उमेदवारांसाठी सैन्य अग्निवीर भरती रॅली १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम, मुंब्रा, ठाणे येथे आयोजित केली जात आहे.

या भरती रॅलीमध्ये सुमारे ३ हजार १६० निवड झालेले उमेदवार सहभागी होण्याची शक्यता आहे. रॅलीमध्ये १.६ किलोमीटर धावणे, शारीरिक योग्यता चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल.
वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे येथे लष्करी डॉक्टरांची एक विशेष टीम देखील तैनात केली जाईल. उमेदवारांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन लष्कराच्या वतीने करण्यात आले आहे.


Maharashtra Agniveer Bharti 2024

Maharashtra Agniveer Bharti 2024 : या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

अग्निवीर अंतर्गत जीडी, ट्रेड्समन व क्लार्क पदासाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जी.डी. (जनरल ड्युटी) पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लार्क पदासाठी बारावी उत्तीर्ण तसेच ट्रेड्समन पदासाठी दहावी व आठवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
२७ जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे. २८ रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जनरल ड्युटी पदासाठी भरती होईल. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांना संधी देण्यात येईल.

२९ रोजी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.
१ जुलै मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २ जुलै रोजी ट्रेड्समन पदासाठी भरती होईल. ३ जुलै रोजी ऑफीस असिस्टंट (क्लार्क), स्टोअरकिपर टेक्निकल या पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना संधी देण्यात येईल. ८ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Indian Army Agniveer Recruitment 2024 Indian Army Agniveer Exam Date 2024
Indian Army Agniveer Admit Card 2024 Indian Army Agniveer Result 2024
Indian Army Agniveer Eligibility 2024 Indian Army Agniveer Syllabus and Exam Pattern 2024