Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » इंडो जर्मन टूल रूम आणि अमृततर्फे तरूणांना व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण!! – Maharashtra Academy for Research, Advancement and Training
Last Updated:

इंडो जर्मन टूल रूम आणि अमृततर्फे तरूणांना व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण!! – Maharashtra Academy for Research, Advancement and Training

Maharashtra Academy for Research, Advancement and Training (AMRUT)

इंडो जर्मन टूल रूम आणि अमृत चा विशेष उपक्रमः खुल्या वर्गातील तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण व्यवसायासाठी विशेष सहाय्य खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘अमृत’ म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि इंडो-जर्मन टूल रूम (भारत सरकारची संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना अत्याधुनिक तांत्रिक कौशल्ये दिली जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नामांकित कंपन्यांद्वारे नोकरी, तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्यही मिळणार आहे.

इंडो जर्मन टूल रूम, संभाजीनगर ही भारत सरकारची संस्था असून त्याच्या महाराष्ट्रामध्ये इतरत्र चार शाखा आहेत. मुख्य शाखा संभाजीनगर येथे असून त्या ठिकाणी प्रशिक्षण सोबत राहण्याची सोय देखील उपलब्ध आहे. संभाजीनगर येथील शाखेमध्ये अतिशय दर्जेदार व उत्कृष्ट दर्जाचे मशिनरी आणि इतर उपकरणे उपलब्ध असून अत्यंत अचूकतेने काम करण्यासाठी अत्याधुनिक आणि उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण दिल्या जाते. या उत्कृष्ट दर्जाच्या प्रशिक्षणाचा लाभ अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना मिळण्यासाठी ‘अमृत’ ने इंडो जर्मन टूल रूम यांच्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे. व सुमारे ४५ विविध कोर्सेस साठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अमृतच्या या उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतीना निःशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) अमृत, पुणे मार्फत केला जाईल. निवासी प्रशिक्षणाची सोय फक्त आय.जी.टी. आर. छत्रपती संभाजीनगर येथेच उपलब्ध असून संस्थेच्या पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूज उपकेंद्रात अनिवासी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली असून, रोजगारक्षम कौशल्यांवर यात भर दिला जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतीना आधुनिक काळातील कौशल्ये शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. कौशल्यांअभावी कोणीही रोजगारापासून वंचित राहू नये आणि युवकाची रोजगारक्षमता वाढावी, यासाठीच ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. पात्रता व अटी या प्रशिक्षणासाठी पात्रता अट म्हणजे उमेदवार खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील असावा. त्याची आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित अभ्यासक्रमासाठी निश्चित केल्याप्रमाणे असेल. वयोमर्यादा व इतर अटी छऊ संस्थेच्या नियमानुसार लागू राहतील. आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक राहील.

अर्ज कुठे करायचा?
खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वयोगट १८ ते ४० मधील इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी अमृत संस्थेच संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा व अर्जात नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी, यासंदर्भात इतर आवश्यक माहितीसाठी अमृत संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. निवड प्रक्रिया-प्राप्त झालेल्या अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करण्यात येईल. निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आय.जी.टी. आर. व अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?
या अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण अत्याधुनिक अभ्यासक्रम आहेतः सीएनसी मशीन ऑपरेटर, मशिनिंगतंत्रज्ञान, उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक देखभाल कौशल्ये, संगणक आधारित तांत्रिक प्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे इतर कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र शासकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘अमृत’ संस्थेचे असल्याने खाजगी आणि निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करताना याला प्राधान्य मिळू शकते. तसेच, स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी किंवा कर्ज मंजुरीसाठी हे कौशल्य प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

योजना विशेषतः खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षीत गटातील युवक-युवतींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रशिक्षण घेऊ न शकलेल्या तरुणांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या उमेदवारांनी सदर सुवर्णसंधीचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्यावा असे आवाहन ‘अमृत’ तर्फ करण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर नोकरी, व्यव्सायासाठी साहाय्य-प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्टो रोजगाराच्या संधी मार्फल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्वयंरोजगार किंवा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. संपर्क क्र. ७३९१०६५४७४ अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


Maharashtra Academy for Research, Advancement and Training (AMRUT)

महाराष्ट्र संशोधन, उन्नतीवप्रशिक्षणप्रबोधिनी (अमृत) तर्फ राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना सन २०२६-२७मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.

अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे. सन २०२६-२७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्याव या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारानी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरिल संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा. योजने अंतर्गत पात्र उमेदवाराना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रुपये ५० हजार इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
तसेच मुलाखत फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखत पूर्वतयारीसाठी रुपये २५ हजार इतके अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अमृतच्या https://mahaamrut.org.in/ याअधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबतची सर्व माहिती, सूचना व अद्यतने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत अडचण अथवा शका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी ७३९१०६५४७६ /८२३७६५७१७८ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अमृत कार्यालयाचे व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


AMRUT Training Update

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) तर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून उमेदवारांना नागरिक उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार असून, कृषी, सर्वेक्षण, छायाचित्रण, चित्रफितनिर्मिती, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शेतीमध्ये फवारणी व तपासणी अशा विविध क्षेत्रांत रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या दिशा खुल्या होतील.

प्रशिक्षणामध्ये मध्यम वर्ग ड्रोन प्रशिक्षण, लघु वर्ग ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षक प्रशिक्षण, कृषी क्षेत्रातील ड्रोन वापर, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनातील ड्रोन वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल आणि सेवा प्रशिक्षण तसेच छायाचित्रण व चलचित्र निर्मिती प्रशिक्षण अशा एकूण आठ प्रकारचे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. प्रत्येक तुकडीत १५ विद्यार्थ्यांचा समावेश असेल. हे प्रशिक्षण रायगड पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि परभणी या केंद्रांवर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्राथमिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील अशा समाजांना दिला जाणारआहे, ज्यांना कोणत्याही शासकीय महामंडळ किंवा संस्थेकडून समकक्ष योजना मिळत नाही. यामध्ये ब्राह्मण, मारवाडी, माहेश्वरी, गुजराती, सिंधी, राजपूत, कोमटी, पटेल, बंगाली, ठाकूर, पाटीदार आदी समाजांचा समावेश आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावेत, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असावी.

अर्जदारांनी ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, फिटनेस दाखला तसेच शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (शाळा सोडल्याचे दाखला किंवा प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. अर्जाची छापील प्रत सर्व कागदपत्रांसह स्वाक्षरीसह अमृतसंस्थेच्या अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, बीड येथील जिल्हा कार्यालयात सादर करावी.

तसेच या संदर्भात अमृत संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मो. : ९११२२२८७५९ उपव्यवस्थापक मंगेश भागुराम ढेबे मो. ८१४९५५२१४३ तसेच अमृतमित्र अश्विन अभय वाड, मो. : ९०११५४३६४५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


AMRUT Logo & Tagline Composition Competition

AMRUT Logo & Tagline Composition Competition : Under the auspices of Maharashtra Research, Upliftment and Training Academy (AMRUT), logo and slogan design competition has been organized for AMRUT. All residents of India and all registered public / private entities in Maharashtra will be eligible for this competition. Communication is to be reported online via e-mail. The deadline to submit applications is January 15, 2022. Further details are as follows:-

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतातील सर्व रहिवासी आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक/ खासगी संस्था या स्पर्धेकरिता पात्र असतील. सहभाव ऑनलाईन इ-मेल पद्धतीने नोंदवायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • स्पर्धेचे नाव – AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य रचना स्पर्धा
  • पात्रता – भारतातील सर्व रहिवासी आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक/ खासगी संस्था
  • इ-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022
  • किवर्ड – महाराष्ट्र संशोधन, प्रशिक्षण, उन्नती, नवकल्पना, कौशल्ये
  • वयोमर्यादा – 12 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील
  • बक्षीस – रक्कम रु. 1,00,101

AMRUT Logo & Tagline Composition Competition

Background for LOGO Design Consideration:

Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (AMRUT) came into existence on 1st October, 2021 to ensure educational and financial growth of the economically weaker sections (EWS) from the general category.

AMRUT will help the open category youth attain growth in areas such as industry and business through pursuit of higher education and targeted industry specific skill development, innovation, including startup.

Logo & Rationale:

The logo should be reflective of the key characteristics & objectives of AMRUT.

Rationale: A maximum of 100 words in English/Marathi to describe the concept, theme and symbolic elements.

Terms and Conditions

1. Last date for submission of entries is 15th January, 2022.

2. Each participant can submit single entry only. If any participant/s will submit multiple entries, the last entry submitted by that participant/s will be considered.

Eligibility:

  • Only Indian Nationals are eligible for this Competition.
  • Age Limit: 12 years and above.
  • Individual person, Individual group of peoples, groups, experts, professionals, private organizations etc. are eligible.
  • Any competitor can submit maximum one entry. The prize will be given to the author of the competition entry in case of group.

या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – https://bit.ly/3EpNLUJ

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वयोमर्यादा किती आहे?

12 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील

अर्ज कुठे करायचा?

खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वयोगट १८ ते ४० मधील इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी अमृत संस्थेच संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा व अर्जात नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी, यासंदर्भात इतर आवश्यक माहितीसाठी अमृत संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. निवड प्रक्रिया-प्राप्त झालेल्या अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करण्यात येईल. निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आय.जी.टी. आर. व अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत?

या अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण अत्याधुनिक अभ्यासक्रम आहेतः सीएनसी मशीन ऑपरेटर, मशिनिंगतंत्रज्ञान, उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक देखभाल कौशल्ये, संगणक आधारित तांत्रिक प्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे इतर कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र शासकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘अमृत’ संस्थेचे असल्याने खाजगी आणि निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करताना याला प्राधान्य मिळू शकते. तसेच, स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी किंवा कर्ज मंजुरीसाठी हे कौशल्य प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त ठरू शकते.