महापारेषणच्या नावाने बनावट भरती जाहिरात व्हायरल; उमेदवारांनो, सावधान! | Mahapareshan Bharti
Mahapareshan Bharti
Mahapareshan Bharti :महापारेषणमध्ये नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना! महापारेषणच्या नावाने समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली १० विविध पदांच्या भरतीची जाहिरात बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने या जाहिरातीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, कंपनीने अशी जाहिरात प्रसिद्ध केलेली नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे उमेदवारांनी या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, तसेच भरतीसंदर्भातील कोणतीही माहिती किंवा सूचना मिळाल्यास ती महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पडताळून पाहावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नोकरीच्या आमिषाने बनावट जाहिराती प्रसारित करून उमेदवारांची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढत असताना, आता महापारेषणच्या नावाचाही गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नावाने विविध पदे, जाहिरात क्रमांक आणि रिक्त जागांची माहिती देणारी बनावट संक्षिप्त भरती जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. ही बाब कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने ९ ऑक्टोबर रोजी जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून उमेदवार, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अशा जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे.
महापारेषणच्या भरतीसंबंधी
जाहिराती व अधिसूचना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच अधिकृ तरीत्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे भरतीविषयक कोणत्याही माहितीची खातरजमा Wwww. mahatransco.in या संकेतस्थळावर करावी.