Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महाज्योती तर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज करा!! | MahaJyoti Arthik Sahay Yojana
Last Updated:

महाज्योती तर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज करा!! | MahaJyoti Arthik Sahay Yojana

MahaJyoti Arthik Sahay Yojana

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे नमूद स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे लाभ देण्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक-10/07/2026 रोजी 5.00 वाजता पर्यंत आहे.

महाज्योती तर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज करा!! | MahaJyoti Arthik Sahay Yojana

Application for Competitive Training Program 2026-27

Advertisement

MahaJyoti Arthik Sahay Yojana

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत कर्मचारी निवड आयोग, बँकिंग, विमा आणि रेल्वे भरती परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांकडूना १० जुलैपर्यंत अर्जाची संधी आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदांच्या परीक्षा, विमा क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी पदांची परीक्षा तसेच रेल्वे भरती मंडळाच्या विविध परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०, ०७१२-२८७०१२१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पदवीधर विद्यार्थी पात्र
लाभार्थ्यांची निवड चाळणी परीक्षेद्वारे करणार असून, गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे ऑफलाइन व अनिवासी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाईल.

Advertisement

MahaJyoti Arthik Sahay Yojana

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या उमेदवारांना मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या टप्प्यावर आता अर्थसहाय्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या खर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या योजनेमुळे पात्र विद्यार्थ्यांना तयारीसाठी मदत मिळणार आहे.

महाज्योती’ तर्फे ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. परीक्षा तयारीसाठी क्लासेस, अभ्यास साहित्य, निवास व प्रवास खर्च करावा लागतो. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


MahaJyoti Arthik Sahay Yojana

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिले जाणारे पूर्व प्रशिक्षण ऑनलाइनऐवजी ऑफलाइन होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत संस्थेने हा निर्णय घेतला असून, यापूर्वी ऑनलाइनसाठी मागविलेले सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाज्योती’तर्फे २०२५-२६ वर्षात ‘आयबीपीएस’, ‘बँकिंग’, ‘एलआयसी’, ‘एएओ’, कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवी स्तर परीक्षा, रेल्वे भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तसेच अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत ‘महाज्योती’च्या २३ मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ऑफलाइन पद्धतीने राबविण्यास मान्यता देण्यात आली. ऑफलाइन प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.


MahaJyoti Arthik Sahay Yojana

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय वन सेवा २०२५ परीक्षेच्या व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्यासाठी दहा एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

भारतीय वन सेवा मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना दिल्ली किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. प्रवास, निवास व इतर खर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी ‘महाज्योती’कडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
२४ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. सदर परीक्षेसाठी सारथी किंवा इतर संस्थेकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असे ‘महाज्योती’ ने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.


MahaJyoti Arthik Sahay Yojana Details 2025

‘महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ मार्फत (महाज्योती) यंदापासून बँक, पीओ परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात जाऊन प्रशिक्षण घेण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगणार आहे. राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास (SBC) प्रवर्गातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता ‘महाज्योती’ मार्फत सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात होते.

दुसरीकडे, २०२५-२६साठी ‘महाज्योती’ मार्फत कर्मचारी निवड आयोग, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES), ‘इन्स्टिट्युशन ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन’च्या (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर आणि भारतीय जीवन बीमा निगम (LIS) यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुकांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत.


महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जातो. भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा 2024 (जाहिरात नं. 414/2023 दि.08/04/2025 रोजी MPSC ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे) उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेच्या लाभासाठी पात्रता:
1. विद्याथों महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
3. विद्यार्थी हा ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा
-2024 (दि.08/04/2025 रोजी MPSC ने जाहीर केलेल्या निकालानुसार) उत्तीर्ण झालेला असत्वा, ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरिता इतर संस्था/सारथी, पुणे यांचेकडून अर्थसहाय्य मिळत असल्यास अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही,

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रेः
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
2. जातीचा प्रमाणपत्र (Caste Certificate)
3. वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
4. “महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा-2024 चा प्रवेश पत्र
5. “महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा-2024 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करुन देण्यात यावे.)

अर्ज कसा करावा :
1. महाज्यांती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For CIVIL ENGINEERING SERVICES, POREST SERVICES, AGRICULTURE SERVICES Mains 2024” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कैन करुन अपलोड करावे

अटी व शर्ती :
1. अर्ज करण्याचा अंतिम दि.10/05/2025 आहे.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रह करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील,
4. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या टण्यावर विद्याथ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास तो/ती विद्याथी कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.
5. विद्याथ्यांचे बैंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
6. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call
बर पुढील क्रमांकावर संपर्क करावा

हेल्पलाईन : 0712-2870120/21.
E-mail id: mahajyotingp@@gmail.com


MahaJyoti Arthik Sahay Yojana : महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा 2023 (जाहिरात नं. 125/2023 दि.17/12/2024 रोजी MPSC ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीकरीता एकरकमी अर्थसहाय्य योजनेकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

योजनेच्या लाभासाठी पात्रताः – Eligibility For MahaJyoti Arthik Sahay Yojana

1. विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. . विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा

3 2023 (दि.17/12/2024 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार) उत्तीर्ण झालेला असावा. ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरिता इतर संस्था/सारथी, पुणे यांचेकडून अर्थसहाय्य मिळत असल्यास अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रेः List Of Documents Required For MahaJyoti Arthik Sahay Yojana

1. आधार कार्ड

2. जात प्रमाणपत्र

3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

4. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा-2023 प्रवेश पत्र

5. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा -2023 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करून देण्यात यावा.)

अर्ज कसा करावा – How To Apply For MahaJyoti MPSC Arthik Sahay Yojana

1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (Food And Drugs Administration) Personality/Interview Test-2023″ यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. अटी व शर्ती : 1. अर्ज करण्याचा अंतिम दि.31/12/2024 आहे. 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. कोणत्याही माध्यमातुन व अंतिम निवड प्रक्रियेच्या टण्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास तो/ती विद्यार्थी कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.

5. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

6. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 0712-2870120/21. E-mail Id: [email protected]

महाज्योती मार्फत “महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा – 2023 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना” मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

How to Apply?

For MahaJyoti MPSC Arthik Sahay Yojana

📝 अर्ज करा