TET 2026 पेपरची सुरक्षा नेमकी कशी भेदली? परीक्षा रद्द; का पुढे ढकलली? | Maha TET Exam 2026 Update News
Maha TET Exam 2026 Updates
Maha TET Exam 2026 Update News : The Teacher Eligibility Test (TET) 2026 was scheduled to be conducted by the Maharashtra State Council of Examination on June 28, 2026, across 1,028 centers in the state. Mindful of the irregularities associated with the NEET 2026 exam, the Council had implemented comprehensive security measures. However, in the early hours of June 27, 2026, acting on confidential information that certain individuals in Bhiwandi possessed details regarding the question paper, the Bhiwandi Police conducted a raid at the location. In light of these circumstances, the TET scheduled for June 28, 2026, is being postponed.
राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित टीईटीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील ‘नीट’ आणि ‘यूपीएससी’ परीक्षेच्या धर्तीवर अत्यंत कडक नियमावली लागू करण्यात आली होती. मात्र, प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर लावलेला विशेष ‘क्यूआर कोड’ आणि इतर सुरक्षा उपाय असतानाही प्रश्नपत्रिका फुटलीच कशी?, असा प्रश्न परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यातील उमेदवारांनी उपस्थित केला आहे. २०१३ पासून आतापर्यंत नऊवेळा ही परीक्षा घेण्यात आली आहे. गेल्यावर्षी ४ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ६ लाख १२५ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
प्रश्नपत्रिका यंत्रणेला वेळेत ट्रॅक का करता आली नाही?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी हायटेक कॉपी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा विशेष नियमावली जाहीर केली होती. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना बुरखा, स्कार्फ, टोपी किंवा चेहरा झाकणारे कोणतेही कपडे घालण्यास पूर्ण बंदी होती. बायोमेट्रिक पडताळणी आणि सीसीटीव्ही निरीक्षणासाठी उमेदवारांचे कान, नाक आणि चेहरा स्पष्ट दिसणे अनिवार्य करण्यात आले होते. पहिल्यांदाच प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर एक स्वतंत्र आणि विशेष ‘क्यूआर कोड’ छापण्यात आला होता. या कोडच्या माध्यमातून जर कोणी पेपरचा फोटो काढून तो व्हायरल केला, तर तो तत्काळ ट्रॅक केला जाईल, असा दावा परीक्षा परिषदेकडून करण्यात आला होता. मात्र, हे कडक नियम आणि क्यूआर कोडची सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रश्नपत्रिका लीक कशी झाली, यावर आता शैक्षणिक वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि.२८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज दि. २७ जून, २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दि.२८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
Maha TET Exam 2026 Updates
नीट’ परीक्षेत विद्यार्थ्यांकडून होणारा गैरप्रकार लक्षात घेता राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’ परीक्षेतील परीक्षार्थीसाठी नियमावली अधिकाधिक कडक केली आहे. यंदा ‘टीईटी’ साठी परिषदेने यापूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये दुपट्टा, बुरखा, टोपी वापरता येणार नसल्याचे सांगितले होते. परंतु, महिला परीक्षार्थीना बुरखा, हिजाब, दुपट्टा वापरण्यास परवानगी देण्याची मागणी परिषदेकडे करण्यात आली. त्यानुसार महिला परीक्षार्थीना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी, बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, सर्वच परीक्षार्थीना वर्गखोलीमध्ये बूट घालून येण्यास परवानगी नसेल, असेही स्पष्ट केले आहे. परीक्षार्थीचे पाय उघडे राहतील, अशीच पादत्राणे घालावीत, अशी स्पष्ट सूचना परिषदेने केली आहे.
Advertisement
परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थीची तपासणी/झडती (फ्रिस्किंग), ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे अशा स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. परीक्षेच्या दिवशी वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी अशा अडचणी ऐनवेळी उद्भवू शकतात. हे लक्षात घेऊन दिलेल्या वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी दिलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थीना प्रवेश दिला जाणार नाही. यासंदर्भात परिषदेची कोणेतीही जबाबदारी राहणार नाही.
परीक्षेवेळी परीक्षार्थीनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. परीक्षेवेळी ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचा वाहन परवाना यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. परीक्षेवेळी प्रवेशपत्र आणि वर दिलेल्या वैध ओळखपत्रापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल, असे परिषदेने नमूद केले आहे.
परीक्षा कक्षात काय न्यावे ?
- छायांकित प्रवेशपत्र
- काळ्या/निळ्या शाईचे बॉल पेन
- मूळ वैध ओळखपत्र व छायांकित प्रत
- पाण्याची पारदर्शक बाटली
Maha TET Exam 2026 Updates
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात येत आहेत. परीक्षा व्यवस्थापनासाठी विविध झोनची निर्मिती करण्यात आली असून गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची झोनल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर केंद्रसंचालक, सहाय्यक पर्यवेक्षक, पर्यवेक्षक तसेच आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गोपनीय साहित्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सहकार्य घेतले जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या समन्वयातून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही भावी शिक्षकांच्या गुणवत्तेची कसोटी असलेली महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. परीक्षार्थीना सुरक्षित, पारदर्शक आणि तणावमुक्त वातावरण मिळावे यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहून परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे असे आव्हान करण्यात आले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर ‘नीट’ परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्वनियोजित ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६’ (महाटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यात ही परीक्षा २८ जून रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सेवेत असलेल्या तसेच नव्याने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक केली आहे. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे २१ जून रोजी नीट परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येत असल्याने दोन्ही परीक्षांसाठी बहुतांश केंद्र समान असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध होण्याबाबत टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार टीईटी पेपर क्रमांक-एक २८ जून रोजी सकाळी ११०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे, तर पेपर क्रमांक-दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत घेतला जाईल. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना १६ ते २८ जून या कालावधीत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. अद्ययावत माहिती परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असेही ओक यांनी स्पष्ट केले. टीईटी २०२५ परीक्षेत पात्र उमेदवारांना १८ मे ते ८ जून या कालावधीत प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. काही प्रशासकीय अडचणींमुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्ययावत माहिती परिषदेच्या ‘https://mahatet.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.
Maha TET Exam Updates
शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२६ साठीचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २५ मार्च रोजी जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी पेपर एक आणि पेपर दोन यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. टीईटी परीक्षा येत्या २१ जून रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार २७मार्चपासून ऑनलाइन माध्यमातून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उर्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर आता परिषदेने आगामी परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २१ जून रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना शुक्रवार २७ मार्चपासून ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ होणार आहे. याकरिता येत्या १६ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सदरचा अर्ज हा केवळ इंग्रजी भाषेतच भरावा लागणार असून, ऑफलाइन अर्ज मात्र स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे संबंधित परीक्षार्थीना अर्ज भरताना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. या परीक्षेकरिता प्रवेशपत्र ९ ते २१ जून या कालावधीत ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा – टीईटी परीक्षा ही येत्या २१ जून रोजी दोन सत्रांत घेतली जाणार आहे. यामध्ये पेपर क्रमांक एक प्राथमिक स्तर सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर पेपर क्रमांक दोन हा दुपारी २:३० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. दरम्यान पेपर १ आणि पेपर २ दोन्ही पेपर देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एकाच अर्जात दोन्ही स्तरांचा पर्याय निवडावा, अशा सूचना परीक्षा परिषदेने केल्या आहेत.
अर्ज भरताना अशी घ्या काळजी – २१ जूनला टीईटी परीक्षेसाठी अर्ज करताना परीक्षार्थीना दहावी, बारावी, तसेच शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची माहिती मूळ प्रमाणपत्रानुसार अचूक भरावी लागणार आहे. स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र आणि स्वयं घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. यानंतर अर्ज अंतिम समजला जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रतेसाठी बंधनकारक असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ 21 जूनला घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 27 मार्च ते 16 एप्रिलदरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तसेच, परीक्षा अर्ज केवळ इंग्रजी भाषेतच भरावे लागणार आहेत, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. उमेदवार 27 मार्च ते 16 एप्रिल या कालावधीत अर्ज भरू शकतील. उमेदवारांना 9 जून ते 21 जून या कालावधीत प्रवेश अर्जाची प्रिंटआऊट उपलब्ध होईल. टीईटी पेपर क्रमांक एक 21 जून रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होईल, तर पेपर क्रमांक दोन दुपारी अडीच ते पाच या वेळेत घेतला जाईल. परीक्षाविषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दोन्ही स्तरांसाठी असा पर्याय निवडा – पेपर (प्राथमिक स्तर) व पेपर (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरांसाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा; जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल, असेदेखील स्पष्ट केले आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. सन २०२४ आणि २०२५ मधील टीईटी परीक्षा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षेदरम्यान एआय आधारित निरीक्षण प्रणाली, बायोमेट्रिक नोंदणी तसेच चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे बनावट उमेदवारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यश आले. परीक्षा प्रक्रियेतील व्यवस्थापन सुधारण्यासाठी परिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. टंकलेखन आणि लघुलेखन संस्थांसाठी ऑनलाइन नूतनीकरण प्रणाली सुरू करण्यात आली असून, लघुलेखन परीक्षा देशात प्रथमच संगणकावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देणे, क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्रे देणे तसेच हेल्थ स्टेटस अॅपद्वारे संगणक तपासणी यांसारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे, तर शिक्षण विभागाकडून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परीक्षा परिषददेखील आता दुसरी टीईटी परीक्षा घेण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या टीईटीच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. बेडसे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शिक्षकांना पुढील दोन वर्षांत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळावी या दृष्टिकोनातून टीईटी परीक्षेचे आता वर्षातून दोनदा आयोजन केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत एक प्रश्न आम्हाला रद्द करावा लागला, हे आमच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे यापुढील काळात आयोजित करण्यात येणारी टीईटी परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकांची निर्मिती करत असताना तज्ज्ञांबरोबर चर्चा करून बारकाईने नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.
गुणांमध्ये शिथिलता नाहीच!
टीईटी परीक्षेमध्ये पात्र व्हायचे असेल, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६० टक्के म्हणजेच ९० गुण, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ५५ टक्के म्हणजे ८३ गुण मिळवणे गरजेचे आहे. सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांना अध्यापनाचे कार्य, कौटुंबिक समस्या, आरोग्याचे कारण आदींचा विचार करता किमान सेवेतील शिक्षकांना तरी पात्रतेमध्ये गुणांमध्ये कपात करावी, असा प्रस्ताव विविध शिक्षक संघटना तसेच काही मंत्री आणि आमदारांनी देखील दिला आहे. परंतु त्यांना कोणतीही शिथिलता देण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. परंतु त्यांची अपेक्षा योग्य असल्याचे देखील डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.
Maha TET Exam मागील Updates
शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवर पदोन्नती मिळविण्यासाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबत शासन निर्णय (जीआर) जारी केल्याने केवळ ज्येष्ठतेच्या आधारे दिल्या जाणाऱ्या बढत्यांना थेट लगाम बसणार आहे. या निर्णयामुळे शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत गुणवत्ता आणि पात्रतेला प्राधान्य मिळणार आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी केवळ सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती दिली जात होती; मात्र या नव्या निर्णयानुसार संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीस चालना मिळेल, असा शिक्षण विभागाचा दावा आहे. राज्यात प्राथमिक शिक्षक संवर्गातून होणाऱ्या पदोन्नतींसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कोणतीही पदोन्नती देता येणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि पात्रतेवर भर देण्याच्या दृष्टीने आगामी काळात पदोन्नती प्रक्रिया अधिक कडक निकषांवर आधारित रा-हणार असल्याचे दिसत आहे. पाच वर्षे सेवा उरलेल्यांना दिलासा – सेवानिवृत्तीस पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी उरलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णच्या अटीमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.
सिव्हिल अपील क्रमांक १३८५/२०२५ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षक सेवेशी संबंधित सर्व बाबींमध्ये बंधनकारक ठरते. या निर्णयाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवरील पदोन्नतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी शासनाकडे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, या संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून अपेक्षित अभिप्राय अद्याप प्राप्त झालेला नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.
ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्यासोबतच पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व इतर अर्हता पूर्ण केल्या आहेत, असे शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत. केवळ सेवाज्येष्ठता किंवा इतर अर्हतेच्या आधारे टीईटीशिवाय पदोन्नती देता येणार नाही. हा निर्णय विधी व न्याय विभागाच्या अनौपचारिक अभिप्रायानुसार घेण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेवर याचा थेट परिणाम होणार असून, टीईटी उत्तीर्ण होण्याकडे शिक्षकांना आता अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. शालेयशिक्षणविभागाचे अवर सचिव शरद माकणे यांनी या संदर्भातील आदेश शिक्षण संचालकांना दिल्या आहेत.
परिपत्रकात नेमके काय म्हटले आहे?
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ज्या दिनांकास पारित झाला आहे, त्या दिनांकापासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहूनच पदोन्नती देण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे सध्या टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना कोणत्याही स्वरूपात पदोन्नती देता येणार नाही, असे या परिपत्रकात स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे.
Maha TET Exam Time Table 2025
| अ. क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
|---|---|---|
| 1. | ऑनलाइन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी | दि. १५/०९/२०२५ ते दि. ०३/१०/२०२५ |
| २. | प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे | दि. १०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ |
| ३ . | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-I दिनांक व वेळ | रविवार दि. २३/११/२०२५ वेळ १०.३० AM ते १३.०० PM |
| ४. | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-II दिनांक व वेळ | रविवार दि. २३/११/२०२५ वेळ १४.३० PM ते १७.०० PM |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ – परीक्षा शुल्क
| प्रकार | उमेदवारांचा वर्ग | पेपर I किंवा पेपर II | दोन्ही पेपर्स (Paper I + II) |
|---|---|---|---|
| 1 | अनुसूचित जाती (SC) | ₹700 | ₹900 |
| 2 | अनुसूचित जमाती (ST) | ₹700 | ₹900 |
| 3 | दिव्यांग उमेदवार (४०% किंवा जास्त) | ₹700 | ₹900 |
| 4 | इतर उमेदवार (VJA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, General) | ₹1000 | ₹1200 |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्नपत्रिका यंत्रणेला वेळेत ट्रॅक का करता आली नाही?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी हायटेक कॉपी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा विशेष नियमावली जाहीर केली होती. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना बुरखा, स्कार्फ, टोपी किंवा चेहरा झाकणारे कोणतेही कपडे घालण्यास पूर्ण बंदी होती. बायोमेट्रिक पडताळणी आणि सीसीटीव्ही निरीक्षणासाठी उमेदवारांचे कान, नाक आणि चेहरा स्पष्ट दिसणे अनिवार्य करण्यात आले होते. पहिल्यांदाच प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर एक स्वतंत्र आणि विशेष ‘क्यूआर कोड’ छापण्यात आला होता. या कोडच्या माध्यमातून जर कोणी पेपरचा फोटो काढून तो व्हायरल केला, तर तो तत्काळ ट्रॅक केला जाईल, असा दावा परीक्षा परिषदेकडून करण्यात आला होता. मात्र, हे कडक नियम आणि क्यूआर कोडची सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रश्नपत्रिका लीक कशी झाली, यावर आता शैक्षणिक वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अर्ज लिंक https://mahatet.in/
राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून ही परीक्षा २३ नोव्हेंबरला पार पडण्याची शक्यता आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. परीक्षा परिषदेच्या माहितीनुसार, अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. परीक्षा होण्यासाठी केवळ दोन महिने शिल्लक असल्याने तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या वेळी प्राथमिक (इयत्ता १ ते ५) व उच्च प्राथमिक (इयत्ता ६ ते ८) शिक्षक पदांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अनुतीर्ण उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या टीईटी परीक्षेला मोठ्या संख्येने उमेदवार बसण्याची अपेक्षा आहे.
या परीक्षेच्या आयोजनाबाबत परिषदेचे आयुक्त डॉ. नंदकुमार ढेबे यांनी सांगितले की, “२३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्याचा निर्धार केला असून काही दिवसांत अर्ज स्वीकृतीसह संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल. परीक्षेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.”
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उच्च प्राथमिक (इयत्ता बारावी) ची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र, टेट किंवा सीटेट उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास), अनाथ असल्यास दाखला.
योजनेच्या लाभासाठी पात्रता
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांचे वय ४० हून जास्त नसावे
- निवड झालेल्या विद्यर्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
येथे करा अर्ज :
- अधिक माहितीसाठी : https://mahatet.in/
Maha TET Helpline Number
MahaTET Helpline number is given below. Candidates can contact the given number for technical helps. For more updates keep visiting us.