दि. २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द, परिपत्रक जाहिर!| Maha TET Admit Card Download
Mahatet.in Admit Card 2026
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ आयोजित करण्यात येणार होती. NEET २०२६ परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी परिषदेने सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या.
मात्र, दि. २७ जून २०२६ रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी काही संशयित व्यक्तींवर कारवाई करत धाड टाकली. प्राथमिक तपासादरम्यान संबंधितांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळतेजुळते प्रश्न आढळून आले. यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली असता, सदर बाब गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर दि. २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव न देता पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात घेण्यात यावी, हा परीक्षा परिषदेचा ठाम आग्रह असून या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भातील पुढील सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा येत्या २८ जून २०२६ रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महाटेट सोलापूर जिल्ह्याचे परीक्षा संनियंत्रक तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांनी उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कडक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. ऐनवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रांवर ओळख उमेदवारांची तपासणी, पडताळणी आणि हजेरी नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ऐनवेळी उद्भवणाऱ्या वाहतूक समस्या, आंदोलन किंवा अतिवृष्टी यांसारख्या बाबी लक्षात घेऊन उमेदवारांनी वेळेपूर्वीच केंद्रावर पोहोचावे. विहीत वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत (झेरॉक्स) सोबत असणे आवश्यक आहे.
बूट-पायमोज्यांना केंद्रात असणार बंदी
परीक्षा खोलीमध्ये कोणत्याही प्रकारच्या बुटांना परवानगी असणार नाही. उमेदवारांनी चप्पल, स्लीपर किंवा सँडल यांसारखी उघडी पादत्राणे परिधान करावीत. महिला उमेदवारांना बुरखा, दुपट्टा किंवा ओढणी परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र, लाईव्ह सीसीटीव्हीमध्ये उमेदवारांचे चेहरे स्पष्ट दिसण्यासाठी परीक्षा कालावधीत वर्गात मानेच्या वर, कानावर किंवा डोक्यावर कोणतेही आवरण ठेवता येणार नाही.
उमेदवारांना मिळणार उत्तरपत्रिकेची तिसरी प्रत
उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेचा संच कोड अचूक नोंदवावा. गोल गिरवण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करावा. व्हाईटनर, ब्लेड किंवा खोडरबरचा वापर केलेल्या उत्तरांना गुण दिले जाणार नाहीत. परीक्षा संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समवेक्षकांकडे जमा करून ओएमआरची तिसरी प्रत उमेदवारांनी स्वतःकडे जपून ठेवावी.
Maha TET Admit Card Download : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६’ (टीईटी) येत्या २८ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून, खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. परीक्षार्थीनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी परिषदेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले मूळ प्रवेशपत्र आणि आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ ओळखपत्र तसेच त्याची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महिला उमेदवारांच्या बुरखा, हिजाब आणि दुपट्टा वापराबाबत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे अधिकृत पत्र प्रसिद्ध करून परीक्षा केंद्रांवर चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. परिषदेकडे महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब व दुपट्टा वापरण्यास परवानगी द्यावी, अशा मागण्यांचे ई-मेल परीक्षा प करण्य खुलासा, होणार प्राप्त झाले होते. त्यानंतर परीक्षेतील सुरक्षा, ओळख पडताळणी आणि पारदर्शकता लक्षात घेऊन हा खुलासा करण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रांमधील सर्व वर्गखोल्यांमध्ये परिषदेच्या म्हणण्यानुसार, TET दरम्यान ‘Live CCTV’द्वारे देखरेख ठेवली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आला जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा चेहरा, तोंड, कान आणि मानेवरील भाग स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी ही अट घालण्यात आली असून चेहरा झाकणारे कोणतेही आवरण स्वीकारले जाणार नाही. परिषदेने मुंबई उच्च न्यायालयाच्या २०२४ मधील एका निर्णयाचाही संदर्भ दिला आहे तसेच यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, गेट, क्लॅट, एमपीएससीसह विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्येही चेहरा झाकणाऱ्या वस्तूंवर निर्बंध असल्याचे नमूद केले आहे. अलीकडेच घेण्यात आलेल्या काही परीक्षांमध्ये उमेदवारांनी दुपट्टा किंवा बुरख्यामध्ये मोबाईल लपवून आणल्याच्या घटना निदर्शनास आल्याचे परिषदेने म्हटले आहे.
दरम्यान, महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब, दुपट्टा किंवा इतर पोशाख परिधान करण्यास बंदी नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षा सुरू असताना वर्गखोलीत बसलेल्या उमेदवारांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे स्पष्ट दिसला पाहिजे. त्यामुळे डोक्यावर, कानांवर किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आवरण ठेवता येणार नसल्याचे परिषदेने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Admit Card Download Link
शिक्षक पात्रता परीक्षा दि. 28 जून, 2026 उमेदवारांसाठी सूचना
शिक्षक पात्रता परीक्षा दि. 28 जून, 2026 उमेदवारांसाठी सूचना
Mahatet.in Admit Card 2026
Maha TET Admit Card Download : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६’ (टीईटी) येत्या २८ जून रोजी राज्यातील ३७ जिल्हा मुख्यालयांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून, खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. या परीक्षेसाठी सेवेत असलेले शिक्षक आणि नियमित उमेदवार मिळून चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थीनी नोंदणी केली असून, त्यापैकी दोन लाख २६ हजार २६३ शिक्षकांचा समावेश आहे.
पेपर एक आणि पेपर दोनसाठी मिळून एकूण सहा लाख १२५ अर्ज प्राप्त झाले आहेत,’ अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे आणि आयुक्त महेश चोथे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एक हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. पेपर एकसाठी ७०१ केंद्रे; तर पेपर दोनसाठी एक हजार २८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी वर्गखोल्या, प्रवेशद्वार, लॉबी आणि केंद्र संचालक कक्ष अशा विविध ठिकाणी एकूण १८ हजार ७१७सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी एक लाख ९० हजार ६६९ पुरुष, दोन लाख ३७ हजार ४४८ महिला आणि पाच तृतीयपंथी अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
कोल्हापुरातील ‘२३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या ‘टीईटी’ दरम्यान मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल झ गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २२ परीक्षार्थीचा निकाल रद्द करण्यात आली आहे,’ असे चोथे म्हणाले.
Admit Card Download Link
Mahatet.in Admit Card 2026
Maha TET Admit Card Download : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी महाटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) २८ जून रोजी जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून, खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. जिल्ह्यातील ३१ हजार ६५५ जणांनी महाटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा परीक्षा नियोजन व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (२८ जून) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यात आली आहे. त्यात बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि सिंधी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात कमी असल्याने संबंधित उमेदवारांसाठी विशिष्ट जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. टीईटी परीक्षेसाठी उमेदवार त्यांच्या पसंतीच्या माध्यमाची निवड करतात. मात्र, मराठी, इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत अन्य माध्यमांतील उमेदवारांची संख्या कमी असल्याने या उमेदवारांसाठी माध्यमानुसार परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यंदा परीक्षेसाठी उच्चांकी ६ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
Admit Card Download Link
असे आहे परीक्षेचे नियोजन
पेपर क्रमांक १ (प्राथमिक) या पेपरसाठी १३ हजार ४९१ परीक्षार्थीची नोंदणी झाली असून, ३४ केंद्रांवर ही परीक्षा होईल. यासाठी ८ झोनल अधिकारी, ३४ सहायक परीरक्षक, ३४ केंद्र संचालक, ५७९ वर्गखोल्या, ११६ पर्यवेक्षक (प्रत्येकी ५ ब्लॉकसाठी एक), ५७९ समावेषक, ६८ लिपिक आणि १३६ शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेपर क्रमांक २ (उच्च प्राथमिक) साठी १८ हजार १६४ परीक्षार्थी असून, ५३ केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. यासाठी १३ झोनल अधिकारी, ५३ सहायक परिरक्षक, ५३ केंद्र संचालक, ७७० वर्गखोल्या, १५४ पर्यवेक्षक, ७७० समावेषक, १०६ लिपिक आणि २१२ शिपायांची नेमणूक करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बंगाली माध्यमाच्या ११६ उमेदवारांना ठाणे आणि चंद्रपूर येथे परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. कन्नड माध्यमातील सर्वाधिक ८०१ उमेदवारांसाठी ठाणे, सोलापूर आणि सांगली येथे परीक्षा देण्याची सुविधा मिळणार आहे. तेलुगू माध्यमातील उमेदवारांची संख्या ४४ असून त्यांच्यासाठी पुणे आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र असेल. गुजराती माध्यमासाठी नोंदणी केलेल्या १५० उमेदवारांसाठी ठाणे आणि नंदुरबार येथे, तर केवळ ९ उमेदवार असलेल्या सिंधी माध्यमासाठी पुणे येथे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १३ हजार ४९१ शिक्षकांनी पेपर क्रमांक १ साठी, तर १८ हजार १६४ शिक्षकांनी पेपर क्रमांक २ साठी नोंदणी केली आहे. नगर शहरात दोन्ही पेपरसाठी एकूण ५३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळिक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील. उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता शिवाजी औटी, उपशिक्षणाधिकारी संजयकुमार सरवदे, विस्तार अधिकारी मनीषा कुलट, भिवसेन पवार व महिला हवालदार भावना ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
विक्रमी उच्चांकी अर्जसंख्या पाहताच, शिक्षण विभागाने देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने, परीक्षेची काठिण्यपातळीत वाढ केली आहे. या मुळे परीक्षेत यशाचा मार्ग अधिकच खडतर होणार आहे. शिक्षक (Teacher) पात्रता परीक्षा ही 21 जून रोजी होत आहे. या परीक्षेतील काठिण्य पातळी हाच परीक्षेचा टर्निंग पाईंट आहे. पूर्वी परीक्षा ही थेट माहितीवर आधारित प्रश्न असायचे. पण गेल्या काही परीक्षांमध्ये प्रश्नांचा कल हा, उपाययोजनात्मक आला होता.शिक्षक पात्रता परीक्षा केवळ पुस्तकीज्ञान किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांच्या सरावावर, या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता कठीण होणार आहे. प्रश्नांच्या स्वरूपात झालेले सूक्ष्म बदल उमेदवारांच्या पात्रतेचे गणित बिघडवू शकतात. येत्या 21 जूनला होणाऱ्या या परीक्षेला उमेदवार कोणत्यापद्धतीने समोरे जातात, परीक्षेच्या काठिण्य पातळीवर काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष लागलं आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा ही 2013 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी विक्रमी सहा लाख 29 हजार आले होते. त्यावेळी परीक्षेचा निकाल हा 4.93 टक्के निकाल लागला होता. त्यानंतर 2015 ला निकालात घसरण झाली. 2018-2021 मध्ये झालेल्या परीक्षेंचा निकाल तीन ते चार टक्के लागला. आता 2026 होत असलेल्या परीक्षेचा निकाल 3 ते 5 टक्के लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्वाचा अपडेट समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या २१ जूनला शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेला विक्रमी नोंदणी झाली आहे. राज्यभरातून तब्बल सहा लाख उमेदवार संबंधित परीक्षा देणार आहेत. परीक्षा परिषदेने २५ मार्चला टीईटीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर २७ मार्च ते मुदतवाढीसह २४ एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. आता अर्जाची अंतिम प्रक्रिया सुरू आहे. टीईटी परीक्षेचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ९ ते २१ जूनदरम्यान प्रवेश अर्जाची मुद्रित प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे. २१ जून रोजी सकाळी १०:३० ते १:०० या वेळेत पेपर क्रमांक १ होणार आहे. तर दुपारी २:३० ते ५:०० या वेळेत पेपर क्रमांक २ घेतला जाणार आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ जून रोजी घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) सहा लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत जूनमधील परीक्षेसाठीची नोंदणी सुमारे सव्वा लाखांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य परीक्षा परिषदेने २५ मार्च रोजी ‘टीईटी’ ची अधिसूचना आणि वेळापत्रक जाहीर केल्यानंतर या परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली. या नोंदणीसाठी २४ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, विनाअनुदानित कायम शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांबरोबरच सेवेतील शिक्षकांनाही ‘टीईटी’ द्यावी लागत आहे. परीक्षा परिषदेने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या टीईटी परीक्षेसाठी दोन्ही पेपर मिळून ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यात परीक्षादिलेल्या ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवारांपैकी ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. ‘टीईटी’चा आतापर्यंतचा हासर्वाधिक म्हणजे ११ टक्के निकाल ठरला. जूनमध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या नोंदणीबाबत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमारबेडसे म्हणाले, ‘जूनमध्ये होणाऱ्या ‘टीईटी’ साठीच्या नोंदणीत वाढ झाली आहे. सुमारे ६ लाख २ हजार उमेदवारांनी आतापर्यंत नोंदणी केलीअसून येत्या दोन दिवसांत आकडेवारी अंतिम करण्यात येईल.’
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तर, शिक्षण विभागाकडून
सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.