Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » TAIT-2025 वर मोठा खुलासा! ६४ उमेदवारांच्या दुबार परीक्षेबाबत विभागाचे स्पष्टीकरण!! | Maha TAIT Exam 2026
Last Updated:

TAIT-2025 वर मोठा खुलासा! ६४ उमेदवारांच्या दुबार परीक्षेबाबत विभागाचे स्पष्टीकरण!! | Maha TAIT Exam 2026

Maharashtra TAIT Exam 2026

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2025 संदर्भात सध्या सोशल मीडिया आणि काही प्रसारमाध्यमांमध्ये ६४ उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्याची आणि त्यापैकी काही उमेदवारांची पवित्र पोर्टलमार्फत निवड झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. या चर्चेला उधाण आल्यानंतर आता विभागाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले असून, परीक्षेतील उमेदवारांच्या सहभागाबाबत आणि पवित्र पोर्टलवरील निवडीसंदर्भातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

TAIT-2025 परीक्षेतील ६४ उमेदवारांबाबत व्हायरल होत असलेल्या यादीमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाला आता विभागाच्या पडताळणीतून पूर्णविराम मिळाला आहे. यादीतील उमेदवारांच्या नावांमध्ये साधर्म्य आढळत असले, तरी ते सर्व उमेदवार एकच असल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागाने आधार क्रमांक, जन्मतारीख, आईचे नाव, ई-मेल आणि मोबाईल क्रमांक आदी तपशीलांच्या आधारे केलेल्या पडताळणीत संबंधित उमेदवार वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले आहे.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर TAIT-2025 परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी दुबार परीक्षा दिली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात आली असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ नावातील साधर्म्यावरून उमेदवारांबाबत निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे विभागाच्या स्पष्टीकरणातून समोर आले आहे.

TAIT-2025 परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी अपूर्ण अर्ज, चुकीचा अर्ज किंवा अन्य कारणांमुळे एकापेक्षा अधिक अर्ज भरले होते. मात्र, अशा उमेदवारांना केवळ एका ठिकाणीच परीक्षा देण्याची परवानगी होती. उर्वरित प्रवेशपत्रे जमा करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना संबंधित प्रवेशपत्रावरच देण्यात आल्या होत्या.त्यामुळे एकापेक्षा अधिक अर्ज केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना दुबार परीक्षा देता येणार नव्हती, असे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक अर्ज आणि एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा देणे या दोन्ही बाबी वेगळ्या असून, केवळ अनेक अर्ज असल्याच्या आधारावर उमेदवारांनी दुबार परीक्षा दिल्याचा निष्कर्ष काढता येणार नसल्याचे विभागाच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.

tait exam update


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ (टीएआयटी) चा निकाल लागून १ वर्ष होत आहे. राज्यभरात २ लाख ११ हजार विद्यार्थ्यांनी TAIT उत्तीर्ण केली आहे. टीएआयटी उत्तीर्ण होऊन वर्षभराचा कालावधी होत असतानाही सरकारने शिक्षक भरतीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे टीएआयटी उत्तीर्ण विद्यार्थी नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असून, सरकारने शिक्षक भरती लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक एकता मंचतर्फे पत्रपरिषदेतून करण्यात आली. पत्रपरिषदेला मंचचे अध्यक्ष लशिष चव्हाण, उपाध्यक्ष अनिल बोरकर, रुद्र समर्थ आदी उपस्थित होते.

Advertisement

TAIT 2026 Updates

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन २७/०५/२०२५ पासून करण्यात येत आहे.

1. परीक्षेच्या रिपोर्ट टाइम च्या एक तास आधी केंद्रावर उपस्थित रहा 2.आधार कार्ड ओरिजिनल आणि एक झेरॉक्स सोबत घ्या 3.विवाहित मुलींनी लग्नाचे गॅझेट सोबत घ्या 4.दिव्यांग उमेदवारांनी दिसाबिलिटी प्रमाणपत्र एक झेरॉक्स टाईम वाढ कालावधी संदर्भात असलेलं सिविल कडून घेतलेलं पत्र झेरॉक्स आणि लेखणी घेतला असेल तर प्रपत्र क्रमांक झेरॉक्स लेखनिकचे आधार कार्ड हे सर्व साहित्य सोबत घ्या 5.परीक्षेचा कालावधी 120 मिनिट आणि 200 प्रश्न असल्याकारणामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे 6.बॉलपेन सोबत घ्या

TAIT 2025 परीक्षेसाठी इतर परीक्षा देणाऱ्या उमेद्वारांनी माहिती सादर केलेल्या उमेदवारांची संख्या (परीक्षेनिहाय):

  • D.El.Ed. : 452 उमेदवार
  • B.Ed. : 1317 उमेदवार
  • M.Ed. : 105 उमेदवार
  • MPSC : 1626 उमेदवार
  • इतर (Other) : 2391

उमेदवार एकूण उमेदवार : 5891

Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025 – नवीन अभ्यासक्रम जाहीर
Maha TAIT टेस्ट सीरीज २०२५, सर्व महत्वाचे प्रश्न, लगेच सोडवून पहा- MAHA TAIT Test Series 2025

प्रवेशपत्र डाउनलोड करा


ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः Maha TAIT Application 2026 Process – MAHA TAIT Exam 2026how to apply

How to Apply For MahaTAIT stepwise instructions are given below. Go through all details carefully & submit your Application.

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
    • (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी
      X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 200X300 pixels
      फाईल साईज 20 kb50kb –
    • (ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 140X60 pixels
      फाईल साईज 10kb 20kb
    • (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.
      आकारमान 240X240 pixels in 200 DPI
      फाईल साईज 20 kb 50kb
    • (ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 800×400 pixels in 200 DPI
      फाईल साईज 50kb-100kb –
    • स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना
  • “I,_ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
    सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतः च्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)

परीक्षेचे शुल्क : Maha TAIT Exam 2026Application Fees

१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
२. मागासवर्गीय / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे. ४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

जिल्हा / परीक्षा केंद्र निवडः TAIT Exam Distrcit Selection

अर्ज सादर करतांना ३ (तीन) जिल्हा / परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा / परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा / परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा / परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.

To Apply For Maha TAIT Exam 2026

  • To Apply For Maha TAIT you have to click on the below Link Or you can apply on msce pune Website
  • A new Page will open, You have to register first on TAIT Exam
  • After successful registration, you can proceed further by filling out an Online TAIT Application form
  • Pay application fees as given
  • Take a printout of the Application form for future use
  • Apply before the end date

www.mscepune.in TAIT Application Form – Highlights 2026

Details : Maha TAIT Application 2026
Article Category Application form
Name of the authority Maharashtra State Council of Examination
Exam name Teacher Aptitude and Intelligence Test
Exam date To be notified
Mode of submission Online mode
State Maharashtra
official website www.mscepune.in