Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ आणि २०२२-२३ मधील लेखी व मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट जाहीर !! । Maha Security Result
Last Updated:

महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ आणि २०२२-२३ मधील लेखी व मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट जाहीर !! । Maha Security Result

Maha Security Result

महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ आणि २०२२-२३ मधील लेखी व मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात महिला सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून, प्रलंबित पडताळणी असलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया आता तीन दिवसांत पार पडणार आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२१ तसेच २०२२-२३ मधील लेखी आणि मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी महिला सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदाच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या उद्देशाने राज्य पोलीस दलाच्या संबंधित विभागांकडून मागविण्यात आली होती. त्यानुसार, २०२१ मधील भरती प्रक्रियेत निकष पडताळणीसाठी शिल्लक असलेल्या महिला उमेदवारांची, तसेच २०२२-२३ मधील भरती प्रक्रियेत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील निकष पडताळणीसाठी शिल्लक असलेल्या महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.संबंधित उमेदवारांनी भरतीसाठी कोणत्या दिवशी आणि किती वाजता उपस्थित राहायचे, याची दिनांक व वेळेनुसार यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या भरती संकेतस्थळाला भेट द्यावी.

महिला उमेदवार यांच्या नावासमोर दिलेल्या दिनांक व वेळ निहाय यादी


Maha Security Result : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदासाठी  प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

कालावधी =  45 दिवसाचा

दिनांक = 08.06.2026 रोजी

वेळ  =  8.00 वाजता

Advertisement

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.1 पुणे

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.2 पुणे

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.7 दौंड

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.3 जालना

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.8 गोरेगाव मुंबई

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.10 सोलापूर

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.11 बाळेगाव मुंबई

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.9 अमरावती

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र = SRPF गट क्र. 15 गोंदिया

प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र = SRPF गट क्र. 19, कुसडगाव ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर


Maha Security Result

Maha Security Result : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या http://pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चारित्र्य पडताळणी पूर्ण करून त्यासंबंधीचा अहवाल अथवा प्रमाणपत्र महामंडळाच्या नावे सीलबंद स्वरूपात सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणीअभावी संबंधित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करता येणार नसल्याने हे प्रमाणपत्र शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..


Maha Security Result : महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पुर्ण करुन प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवाराना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते. परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली / धोरण नुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न इ गाल्यास त्यांना पुढील ०२ प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते. तरी ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवर कमी करण्यात येतात. त्यानुसार महामंडळामार्फत आयोजीत भरती क्र. २० मधील पुरुष उमेदवाराना प्रशिक्षण सत्र क्र. ६५, ६६ व ६७ मध्ये प्रशिक्षणाची संधी देऊन ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या ६६२ उमेदवारांची नावे तसेच प्रशिक्षण सत्र क्र. ६७ मध्ये विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची अंतिम संधी देऊन ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेले ११७ उमेदवारांची नावे अशी एकुण ७७९ (६६२+११७) उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवरुन कमी करण्यात आलेली असुन त्यांची यादी लिंक वर दिली आहे.

यादी डाउनलोड करा


मागील अपडेट्स

महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पुर्ण करुन प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवाराना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते. परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली / धोरण नुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील ०२ प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते. तरी ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादौवर कमी करण्यात येतात. त्यानुसार महामंडळामार्फत आयोजीत भरती क्र. २० मधील ११५१ पुरुष उमेदवाराना प्रशिक्षण सत्र क्र. ६४, ६५ व ६६ मध्ये प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती. परंतु प्रशिक्षण सत्र क्र. ६६ मध्ये प्रशिक्षणासाठी अतिरीक्त उमेदवार हजर झाल्यामुळे उर्वरीत उमेदवारांना परत करण्यात आले होते. त्यामुळे सदर ११५१ उमेदवारा पैकी इच्छुक उमेदवाराना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी देण्याचे प्रस्तावीत होते. त्यानुसार प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारा कडुन Google Form व्दारे प्रशिक्षणासाठी इच्छुक असल्याबाबत विनंती अर्ज मागविण्यात आले होते. परंतु खालील नमुद ९८३ उमेदवारानी महामंडळास प्रशिक्षणास इच्छुक असल्याबाबत कळविलेले नसल्यामुळे सदर उमेदवारांची नावे मा. अपर पोलीस महासंचालक तथा सह व्यवस्थापकीय संचालक, मरासुम, मुंबई यांच्या मान्यतेनुसार महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवरुन कायमस्वरूपी कमी करण्यात येत असुन त्यांच्या नावाची यादी खालील प्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

बाद झालेल्या उमेदवारांची यादी पहा (१७ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित)


ऑनलाईन फॉर्म भरलेल्यापैकी भरती नोंदणीसाठी एकूण २,४३७ उमेदवार प्रत्यक्ष हजर झाले आहेत. त्यांची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर त्यापैकी २.३५५ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पात्र (Selected) ठरवण्यात आले आहे. तसेच एकूण १६४ उमेदवारांची कागदपत्रे अपुर्ण असल्यामुळे त्यांना प्रतिक्षाधीन यादीत ठेवण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर ३६६ उमेदवारांनी फॉर्म भरला आहे परंतु भरती नोंदणीसाठी हजर झाले नाही. अशा एकूण ५३० उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महामंडळाचे मुख्य कार्यालय ३२, वा मजला जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई येथे दिनांक १०/०१/२०२५ रोजीपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत भरती विभागाकडे परिपुर्ण कागदपत्रे अपडेट करुन सादर करावी .

Maha Security Result Notice

How To Check Maha Security Application Status Online

महामंडळाचे भरती नोंदणी प्रक्रिये मध्ये ऑनलाईन फॉर्म भरलेले २,८८५ उमेदवार त्यांच्या नोंदणीबाबतची स्थिती (Status)  https://mssc.co.in/application/index.php या लिंकवर क्लीक करुन उमेदवार आपला आवेदन क्रमांक (Application Number) किंवा मोबाईल क्रमांक (Mobile Number) टाकून स्वतःचे स्थिती (Status) तपासू शकतात. उमेदवारांनी आपला स्वतःचे स्थिती (Status) तपासणी केल्यानंतर त्यांना त्यावर कोणताही आक्षेप असल्यास दिनांक ०१/०१/२०२५ रोजीपर्यंत अर्ज करु शकता .

उमेदवारांनी अपूर्ण असलेली मूळ कागदपत्रे सादर केल्यानंतर HRMS लिंकवर अपलोड करण्याबाबत त्यांना प्राधिकृत करण्यात येईल, त्यांनी त्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म अपलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून मुख्य कार्यालयात दिनांक १०/०१/२०२५ रोजीपर्यंत सादर केल्यानंतर त्यांना भरती नोंदणीत पात्र करण्यात येईल. संबंधीत उमदेवार दिलेल्या कालावधीत हजर न झाल्यास ते इच्छूक नाही आहे, असे समजून त्यांची नावे यादीतून वगळण्यात येतील, त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी संगणक स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी

Download Maha Security Bharti Waiting List 2024