महासेक्युरिटी वेळापत्रक नोंदणी साठी उमेदवारांची यादी जाहीर, येथे डाउनलोड करा PDF – Maha Security MSF Result
Maha Security MSF Result – List of male candidates called for registration for recruitment of male security guards from 25.11.2025 to 05.12.2025 among the male candidates on the waiting list for Police Constable Recruitment for the year 2022-2023 & Male Security Guard (Contractual) Recruitment Registration Process 2025 Candidates Notice Dated 20.11.2025 Results are published. Candiadtes can check the result from following given Link.
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ च्या पोलीस भरती मधील लेखी व मैदानी परिक्षेत पात्र उमेदवार यांची यादी महामंडळात पुरुष सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदाच्या भरती नोंदणी प्रक्रियेसाठी राज्य पोलीस दलाच्या संबंधीत विभागांकडून मागविण्यात आली आहे. त्यानुसार परिपुर्ण यादी पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पोलीस आयुक्त- पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, पोलीस अधिक्षक- सिंधुदुर्ग व पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रामीण) या जिल्हा विभागातून प्राप्त झाली आहे. त्या उमेदवारांची भरती प्रक्रिया हि दि.१३.१०.२०२६ ते दि.१७.१०.२०२६ पर्यंत ५ दिवस आयोजित करण्यात आली असून उमेदवारांनी भरतीसाठी हजर होण्याचा दिनांक व वेळ निहाय यादी महामंडळानी दिलेल्या https://www.mahasecurity.gov.in/recruitment संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. महामंडळामार्फत उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दिलेल्या दिनांक व वेळ निहाय यादी प्रमाणे महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ, मुंबई येथे हजर रहावे. त्यासाठी संदेश दिलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ज्या दिवशी ज्या उमेदवार यांची नावे दिलेली आहेत. त्याच दिवशी हजर राहावे. कारण त्याच उमेदवार यांची नावे सॉफ्टवेअर मध्ये दिसणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. कळविलेल्या दिवशी गैरहजर राहील्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही व भरती नोंदणी प्रक्रिया माहे ऑक्टोबर-२०२६ करीता विचार केला जाणार नाही.
Advertisement
उमेदवारांची यादी आणि वेळापत्रक जाहीर PDF लिंक
पुरुष सुरक्षा रक्षक (कंत्राटी) भरती नोंदणी प्रक्रिया-२०२५ उमेदवारांसाठी सुचना
१. उमेदवारांची दिनांक निहाय यादी महामंडळानी दिलेल्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
२. उमेदवारांनी दिनांक निहाय यादी प्रमाणे सकाळी ०९.३० वा. महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ, मुंबई येथे हजर रहावे. (दुपारी २.०० वा. नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.)
३. भरती नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर रहावे लागेल. तसेच भरती नोंदणी प्रक्रिया केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही.
४. उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना भरती नोंदणी प्रक्रियेसाठी केंद्रावर आणू नये. फक्त उमेदवारांनाच भरती नोंदणी प्रक्रियेसाठी प्रवेश दिला जाईल.
५. उमेदवारास दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थितीत (इतर तातडीचे काम) भरती नोंदणी प्रक्रियेस हजर राहणे शक्य नसल्यास त्या कारणानुसार ते प्रसिध्द केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात. परंतु दि.०५.११.२०२५ रोजी शेवटचा दिवस असून त्या दिवशीही गैरहजर राहील्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. व भरती नोंदणी प्रक्रिया-२०२५ करीता विचार केला जाणार नाही.
६. उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी. निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांक व वेळेस हजर रहावे. त्यापुर्वी कोणीही भरती नोंदणीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये. सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तेथे प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे. किंवा वेबसाईटवर प्रसिध्द यादीत ज्यांचे नावे आहे, त्यांनीच सदर ठिकाणी हजर रहावे व इतरांना प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
| Date | Title | Info |
|---|---|---|
| 20-11-2025 |
List of male candidates called for registration for recruitment of male security guards from 25.11.2025 to 05.12.2025 among the male candidates on the waiting list for Police Constable Recruitment for the year 2022-2023.
|
|
| 20-11-2025 |
Male Security Guard (Contractual) Recruitment Registration Process 2025 Candidates Notice Dated 20.11.2025
|