Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » ई-केवायसीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाननी; कोणाला मिळणार लाभ? – | Ladki Bahin Yojana 2026 Update
Last Updated:

ई-केवायसीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाननी; कोणाला मिळणार लाभ? – | Ladki Bahin Yojana 2026 Update

Ladki Bahin Yojana 2026 Update

‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेच्या निकषांबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांची ई-केवायसीनंतर छाननी करण्यात आली असून, पात्र ठरणाऱ्या महिलांना यापुढेही योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, योजना सुरू करताना लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिलेची तत्काळ पडताळणी करणे शक्य नव्हते. महिलांना सुरुवातीला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी योजना सुरू करण्यात आली आणि त्यानंतर लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली. या पडताळणी प्रक्रियेत ई-केवायसीची भूमिका महत्त्वाची ठरली असून, आतापर्यंत सुमारे १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे.

Advertisement

नियमबाह्य लाभार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

‘लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर आल्याने शासनाने आता नियमबाह्य लाभार्थ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. छाननीदरम्यान काही लाभार्थी आयकर भरत असल्याचे, तर काही ठिकाणी महिलांच्या नावावर पुरुष व्यक्ती लाभ घेत असल्याचे आढळून आले. याशिवाय काही प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचारीही योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.

नियमांचा भंग करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरोधात आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र महिलांचा लाभ कायम ठेवला जाणार असून, पात्र लाभार्थींना योजनेतून वगळले जाणार नसल्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली आहे.

ladki bahin


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देम्पात आली होती. अजूही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याची मागते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थीची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी सक्तिस्थळ तयार करण्यात आले आहे.

Advertisement

या योजनेअंतर्गत सुरवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या, पग निकांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता एक कोटी यहा लाखांपर्यंत लाभार्थी राहिले आहेत. तरीपण, आम्रा योजनेच्या निकषांनुसारच ग्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपिक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जाच आहे. त्यासाठी ई-केवायसी’च्या माध्यमातून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबप्रमुखाचे आधारलिंक केले जात आहे. पुढे अडीच लाख रुपपपिक्षा जास्त वार्षिक उत्पन असलेल्या लाभार्थीचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ई-केवायसीसाठी आता दुसन्यांदा मुदतवाढ दिली जाणार आहे. त्या मुदतीत ताडक्या बहिणीना ई-केवायसी करावीच लागणार आहे.