Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर! राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ३७२३ पदांची भरती लवकरच; सुधारित आकृतिबंधाला मंजुरी!! – Krushi Vidyapeeth Bharti 2026
Last Updated:

खुशखबर! राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ३७२३ पदांची भरती लवकरच; सुधारित आकृतिबंधाला मंजुरी!! – Krushi Vidyapeeth Bharti 2026

Maharashtra Krushi Vidyapeeth Bharti 2026

महाराष्ट्रातील उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी लवकरच मिळणार आहे. सध्या विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु करणे सुरु आहे. यात आता कृषी विभागाची भर पडणार आहे. कृषी विद्यापीठांमध्ये ७० टक्के पदे रिक्त असून, जेमतेम ३० टक्के मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे. त्यामुळे शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यावर परिणाम झाला आहे. छत्तीसगड, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करून पदवीधरांची शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

या निर्णयामुळे राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी., डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला., डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १,२१७, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ५८९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ८९० आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ९१५ नियमित पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. गट क आणि गट ड संवर्गातील पदांबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे.

Advertisement

चारही कृषी विद्यापीठ स्तरावरील यापूर्वीची मंजूर पदसंख्या १२ हजार १४२ इतकी होती. ती आता ११ हजार ३४६ पदांपर्यंत खाली येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच ७९६ पदे नव्या आकृतिबंधात कमी केल्याची शक्यता कृषी विद्यापीठांतील वरिष्ठ सूत्रांकडून वर्तवली. ज्यामध्ये प्रामुख्याने ‘ड’ वर्गातील अनावश्यक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यावर भर दिल्याचे सांगितले. फोटो फिल्मसाठी अंधार कोठडी सहायक, तवेलावाला असे कालबाह्य झालेली पदे कमी करण्याचा समावेश असल्याचे समजते.

आकृतिबंधात प्राधान्य कशासाठी?
राज्यातील कृषी विद्यापीठांना केंद्राच्या आयसीएआर संस्थेकडून ५० टक्के निधी मिळतो. त्यामुळेच त्यांच्या नियमानुसार आकृतिबंध केल्याने येणाऱ्या अडचणी कमी होऊन कामे सुरळीत होण्यावर भर दिला आहे.
कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर (फार्म मॅनेजमेंट) विविध पिकांचे बीजोत्पादन वाढून कृषी विस्ताराचे कार्यवाढीसाठी अधिक पदे देण्यावर कल आहे. शिवाय, संशोधन केंद्रावर अधिक शास्त्रज्ज्ञ व आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांस प्राधान्य दिले आहे.
कृषी संशोधनात काळानुरूप कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वाढणार असल्यानेही त्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

खुशखबर! राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ३७२३ पदांची भरती लवकरच; सुधारित आकृतिबंधाला मंजुरी!! – Krushi Vidyapeeth Bharti 2026


Maharashtra Krushi Vidyapeeth Bharti 2026

Maharashtra Krushi Vidyapeeth Recruitment 2026 – There is a significant backlog of vacancies in all four agricultural universities in the state. As this is adversely affecting agricultural education and research, Agriculture Minister Dattatray Bharne announced in the Legislative Council on Friday (March 12) that the recruitment process will be completed by March 2026 under any circumstances. Bharne was responding to a calling attention motion raised by Legislative Council member Satish Chavan on this issue. Mr. Bharne stated that there were many technical difficulties in the recruitment process at the agricultural universities, with approval from the finance department being a major hurdle. Now, Minister of State for Finance Ashish Jaiswal has announced that permission from the finance department for the expenditure related to the recruitment will be received within the next twenty days. This will simplify the further process. After the finance department’s approval, the organizational structure will be immediately sanctioned. Following this, a secretary-level meeting will be held to implement the recruitment process. The vacant positions will be filled by March 2026.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये 11 हजार 350 रिक्त पदांचा आकृतीबंद शिल्लक असून ही सर्व पदे पुढील अधिवेशनापूर्वी भरली जातील, असे ठोस आश्वासन कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत पदांचा मोठा अनुशेष आहे. कृषी शिक्षणासह संशोधनावर याचा विपरीत परिणाम होत असल्याने मार्च २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पदभरती केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता. १२) विधान परिषदेत केली. दत्तात्रय भरणे विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याविषयी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. भरणे म्हणाले, की कृषी विद्यापीठांमधील भरतीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामध्ये वित्त विभागाची मंजुरी ही मोठी अडचण आहे. आता वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पदभरतीसंदर्भातील खर्चाच्या तरतुदीसाठी वित्त विभागाकडून येत्या वीस दिवसांत परवानगी मिळणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया सोपी होईल. वित्त विभागाच्या परवानगीनंतर आकृतिबंधाला तत्काळ मान्यता दिली जाईल. त्यानंतर सचिवस्तरीय बैठक घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाईल. मार्च २०२६ पर्यंत रिक्त पदांचा भरणा केला जाईल.

Advertisement

कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रिया ही शास्त्रज्ञ सेवा मंडळाच्या माध्यमातून राबवली जाते. या मंडळाचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. भरती प्रक्रियेत हा अडसर भासू नये, याकरिता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षांकडे या पदाचा प्रभार तत्काळ प्रभावाने देण्यात येत असल्याची घोषणा भरणे यांनी केली. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचे मात्र अधिकार कुलगुरूंकडे आहेत. नगरपालिका आचारसंहितेचे कारण देत अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पदभरतीस नकार दिला, असा आरोप सदस्य अमोल मिटकरी यांनी केला. यावर माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे उत्तर श्री. भरणे यांनी दिले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आकृतिबंधात प्राधान्य कशासाठी?

राज्यातील कृषी विद्यापीठांना केंद्राच्या आयसीएआर संस्थेकडून ५० टक्के निधी मिळतो. त्यामुळेच त्यांच्या नियमानुसार आकृतिबंध केल्याने येणाऱ्या अडचणी कमी होऊन कामे सुरळीत होण्यावर भर दिला आहे. कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर (फार्म मॅनेजमेंट) विविध पिकांचे बीजोत्पादन वाढून कृषी विस्ताराचे कार्यवाढीसाठी अधिक पदे देण्यावर कल आहे. शिवाय, संशोधन केंद्रावर अधिक शास्त्रज्ज्ञ व आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांस प्राधान्य दिले आहे. कृषी संशोधनात काळानुरूप कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वाढणार असल्यानेही त्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.