कृषी विभागात राज्यात ८,९५३ पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया लवकरच! । Krushi Vibhag Bharti 2026
Krushi Vibhag Bharti 2026
सरकार व शेतकरी यांच्यातील मुख्य दुवा असलेल्या कृषी विभागाला सध्या तीव्र मनुष्यबळ टंचाईचे ग्रहण लागले आहे. राज्यात कृषी विभागातील विविध संवर्गातील तब्बल ८,९५३ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला असून, एकाच कर्मचाऱ्याला २ ते ३ ठिकाणचा अतिरिक्त प्रभार सांभाळावा लागत असल्याने मूळ विस्तार कार्य कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या अधिकृत आस्थापना अहवालानुसार, राज्यात एकूण ३९,५१७ मंजूर पदांपैकी ३०,५६४ पदे भरलेली असून, तब्बल २२.६५ टक्के म्हणजेच ८,९५३ पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका निर्णय प्रक्रिया राबविणाऱ्या वर्ग ‘ब’ (राजपत्रित) अधिकाऱ्यांना बसला आहे. या वर्गात तब्बल ३१.३७ टक्के जागा रिकाम्या आहेत. दुसरीकडे, गाव पातळीवर थेट शेतकऱ्यांशी जोडलेला दुवा म्हणजे कृषी सहायक आणि तंत्रज्ञ होय. या वर्ग ‘क’ (क्लास थ्री) संवर्गात सर्वाधिक म्हणजेच ५,०१६ पदे रिक्त आहेत. परिणामी, प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करणे कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे.
अतिरिक्त कामांचा ताण
विभागाचे मूळ काम कृषी तंत्रज्ञान प्रसार व विस्तार करणे हे होते. कर्मचाऱ्यांना केवळ ऑनलाइन डेटा एंट्री आणि प्रशासकीय कामांतच जुंपले जात आहे.
पीक विमा पडताळणी, ई-केवायसी,
विविध योजनांचे ऑनलाइन अर्ज मंजुरी, पीक नुकसानभरपाईचे पंचनामे आणि विविध शासकीय योजनांच्या बँक खाते जोडणीसारख्या अकृषिक कामांमुळे कृषी सहायक हैराण झाले आहेत. वरिष्ठ पातळीवरही तालुका आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने ‘प्रभारी’राज सुरू आहे.
एप्रिल महिना तोंडावर आलेला असून, बदल्यांचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यासाठी इच्छुकांकडून मंत्रालय स्तरापर्यंत गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे तत्काळ आकृतिबंध बदल्यांपूर्वी मंजूर व्हावा, अशी अपेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बोलून दाखविली जात आहे. कृषी संचालकांची पदे किती वाढणार, मृदसंधारणचे कृषी संचालकपद कमी होणार का? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. शिवाय उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे (एसडीओ) अस्तित्व संपुष्टात येऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचे बळकटीकरण होणार का? यावर चर्चा होत आहे. राज्यात
कृषी संचालकांची एकूण मंजूर पदसंख्या पाच आहे. त्यामध्ये निविष्ठा व गुणनियंत्रण, विस्तार व प्रशिक्षण, प्रक्रिया व नियोजन, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, फलोत्पादन संचालनालयाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी परिषदेमधील संचालकपद, सीड सर्टिफिकेशन अकोला आणि बनामती, नागपूर यांचा समावेश आहे. आकृतिबंध अंतिम होण्यापूर्वी प्रस्तावित असलेले कृषी अभियांत्रिकी संचालकपद कार्यरत झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम आणि पेरण्यांपूर्वीच आकृतिबंध अंतिम व्हावा आणि नंतरच बदल्यांचे सत्र सुरू व्हावे, अशीही मागणी होत आहे.
कृषी कर्मचाऱ्यांचा असा आहे लेखाजोखा:
कृषी विभागाच्या मंजूर आस्थापनांवरील पदसंख्या:
२७,५०२
सद्यः स्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या:
१८,७६४
शेतकरी निगडित विभाग असूनही रिक्त पदसंख्या:
८,७३८ (३२%)
Krushi Vibhag Bharti 2026
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
कृषी सेवेची तयारी करणारे विद्यार्थी अस्वस्थ मे २०२५ मध्ये ८७ पदांचे मागणी पत्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यासाठी वित्त विभागाच्या उपसमितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पदांची जाहिरात २०२५ मध्ये प्रसिद्ध होऊन भरती होणे अपेक्षित होते. २०२६ मधील भरतीसाठी ४८४ पर्दाच्या मागणीसाठीही वित्त विभागाच्या उपसमितीकडे मागणी पत्र सादर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या पदांना मान्यता मिळाली नाही, तर २०२६ ची कृषी सेवेच्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. त्यामुळे कृषी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कृषी विभागाचे धोरण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याची जबाबदारी असलेल्या ‘क’ गटातील कृषी सहाय्यकांची १४३१ पदे, आरेखकांची ८८ टक्के रिक्त आहेत. अनुरेखक हा कृषी विभागाचा डेटा गोळा करणारा आणि नोंदी ठेवणारा तांत्रिक सहाय्यक कर्मचारी असतो. तो शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात राहून कृषी योजनांची माहिती प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा महत्त्वाच्या अनुरेखकांची तब्बल ९८ टक्के पदे भरल्या गेली नाहीत. सहाय्यक ग्रंथपालाची खुर्ची धूळ खात पडली आहे. लघुलेखक (उच्चश्रेणी) ३९ टक्के, लघुलेखक (निम्नश्रेणी) ७० टक्के तर वाहनचालकांच्या ७८ टक्के जागा भरल्याच गेल्या नाही. चतुर्थ श्रेणी असलेल्या ‘ड’ गटात तर प्रचंड रिकाम्या जागा आहेत. कृषी विभागाला शिपाई, टिलर ऑपरेटर, स्वच्छक-क्लिनर, माळी-रोपमळा मदतनीस, प्रयोगशाळा सहाय्यक आणि अन्य पदे रिक्तच आहेत.
राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाज गतीला तब्बल ६ हजार ३८३ रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. कृषी विद्यापीठांच्या वतीने राज्यातील कृषी क्षेत्राला गती देण्याचे काम केले जाते. या विद्यापीठांसोबत कृषी क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्यही जुळले आहे. पण कृषी विद्यापीठांच्या आकृतिबंधालाच मंजुरी न मिळाल्याने नोकरभरती रखडली आहे. नव्या आकृतिबंधाला मंजुरी देण्याबाबत प्रशासकीय अनास्थाही एक प्रमुख कारण आहे. यातून विद्यापीठाच्या दर्जात्मक कामकाजालाच हात घातला जात आहे, पण याबाबत नाखंतना खेद, अशी परिस्थिती समोर येत आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील रिक्त जागांची टक्केवारी पाहता, ती तब्बल ५७.४८ टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणजेच विद्यापीठांतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त रिक्त जागा आहेत. याचा विद्यापीठांच्या कामकाजावर काय विपरित परिणाम होतो, याची संबंधितांनी गंभीरतेने अशी मागणी आता विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांकडून केली जात आहे.
विद्यापीठनिहाय रिक्त पदांची माहिती घेतली असता, टक्के म्हणजेच विद्यापीठातील १ हजार ८९० पदे रिक्त आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ५५.१० टक्के
नोकरभरतीची प्रक्रियाच थांबली
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधाला शिफारस न केल्याने सर्व नोकरभरतीची प्रक्रियाच थांबली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उच्च संवर्गातील पदांची भरती करणाऱ्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाचे अध्यक्षपद मागील तब्बल ५ महिन्यांपासून रिक्त आहे. आकृतिबंध रखडण्यासह जोडीला महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने विद्यापीठांच्या कामकाजाच्या गतीवरच विपरित परिणाम व्हायला लागला आहे.
Krushi Vibhag Bharti : Krushi Vibhag Maharashtra has been recently published new recruitment notification of vacant Posts. The name of this recruitment is “Apprentice”. There are 05 vacant post available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned e-mail address before the last date.The last date for submitting application is 01st September 2025 . F or more details about Krushi Vibhag Bharti , visit our website policebharati.co.in .
कृषी विभाग महाराष्ट्र अंतर्गत “अप्रेंटिस” पदांची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२५ आहे.
- पदाचे नाव – अप्रेंटिस
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 28 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ सप्टेंबर २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/
Krushi Vibhag Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| अप्रेंटिस | 05 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Krushi Vibhag Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अप्रेंटिस |
|
Salary Details For Krushi Vibhag Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| अप्रेंटिस | 25000/- |
How To Apply For Krushi Vibhag Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For krishi.maharashtra.gov.in Bharti 2026
|
|
|
📑
PDF जाहिरात
|
https://shorturl.at/S4a5P |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://krishi.maharashtra.gov.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
अप्रेंटिस
अर्ज पद्धती काय आहे?
ऑनलाईन (ई-मेल)
पदसंख्या किती आहे?
05 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
०१ सप्टेंबर २०२५
वयोमर्यादा किती आहे?
28 वर्षे