अंतिम निवडीनंतरही नियुक्ती नाही; कृषी सेवा उमेदवारांचा आंदोलनाचा इशारा !! – Krushi Sevak Bharti 2026
Krushi Sevak Bharti 2026
K rushi Sevak Bharti 2026 Latest Update – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या कृषी सेवा भरतीला अखेर वेग येण्याची चिन्हे दिसू लागली असून, अंतिम निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मात्र अद्याप प्रतीक्षेतच आहे. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ची जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परीक्षा, निकाल, अंतिम निवड आणि शिफारस प्रक्रिया पूर्ण होऊनही निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी असून, नियुक्ती प्रक्रिया तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कृषी विभागातील आकृतिबंध व त्यासंबंधी फेरबदलाच्या प्रशासकीय प्रक्रियेमुळे नियुक्त्या रखडल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. मात्र, आकृतिबंधातील बदल हा विभागाच्या अंतर्गत प्रशासकीय बाबीचा विषय असून, त्याचा परिणाम अंतिम निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीवर होऊ नये, अशी भूमिका उमेदवारांनी घेतली आहे.
वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर अंतिम निवडीत स्थान मिळवूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांचा संयम आता सुटू लागला आहे. अनेक वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करून उमेदवारांनी कृषी सेवा मुख्य परीक्षा दिली. विविध टप्पे यशस्वीरीत्या पार करत त्यांनी अंतिम निवडीत स्थान मिळवले असून, संबंधित उमेदवारांची शिफारसही विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र निवड आणि शिफारस प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती न झाल्याने उमेदवारांना अनिश्चित काळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विभागाला शिफारसपत्र प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यांत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या कालमर्यादेकडे उमेदवारांचे लक्ष लागले असून, उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नियुक्ती आदेश जारी करण्याची मागणी जोर धरत आहे.
मागील भरतींमध्येही विलंब
निवडीनंतरही नियुक्तीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांचा प्रश्न आता केवळ एका भरतीपुरता राहिलेला नसून, तो प्रशासकीय प्रक्रियेतील सातत्याने जाणवणाऱ्या विलंबाचा मुद्दा बनला आहे. मागील तीन-चार कृषी सेवा भरतींमध्येही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती व रुजू प्रक्रियेला विलंब झाल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे कृषी सेवा २०२४च्या उमेदवारांप्रमाणेच यापूर्वीच्या भरतीतील उमेदवारांनाही दीर्घ प्रतीक्षेला सामोरे जावे लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या विलंबामुळे उमेदवारांच्या करिअरचे नियोजन, आर्थिक स्थैर्य तसेच वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
Krushi Sevak Bharti 2026 Latest Update – The wait is finally over for thousands of government job aspirants in Maharashtra. In a massive development for rural employment, the state government has officially cleared the path for the Krushi Sevak Bharti 2026 and Agricultural Assistant Recruitment. Agriculture Minister Dattatray Bharne has directed top officials to fast-track the hiring process to fill long-standing vacancies within the state’s Agriculture Department, with a primary focus on strengthening services in tribal and rural belts.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
राज्यातील पेसा क्षेत्रांमध्ये कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून कृषी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पेसा अंतर्गत कृषी सेवक पदभरती, रिक्त जागा भरणे तसेच मानधन तत्वावरील कृषी सेवकांच्या नियमिती करणा संदर्भात ही बैठक पार पडली. बैठकीला आमदार नारायण तोडसाम, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि सर्व विभागीय माध्यमातून उपस्थित होते. कृषी संचालक ऑनलाइन कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, राज्यातील १३ पेसायुक्त जिल्ह्यांमधील कृषी सहाय्यक व कृषी सेवक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदूनामावलीची प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात यावी. शासनाच्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या निर्णयानुसार पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मानधन तत्वावर कार्यरत कृषी सेवकांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव आणि प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागासवर्गीय कक्ष, समाजकल्याण विभाग आणि सर्व विभागीय आयुक्तांनी पेसा अंतर्गत बिंदूनामावलीची तपासणी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करत पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचे कृषिमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी आमदार राजू तोडसाम यांनीही पेसाअंतर्गत कृषी सेवक पदभरती, रिक्त जागा भरणे आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या नियमिती करणासाठी शासनाने जलद गतीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र कृषी सेवक सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न 2026, पुढील पदभरतीस उपयुक्त माहिती- Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2025
तसेच कृषी सेवक पदाचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन आपण या लिंक वरून डाउनलोड करू शकता आणि कृषी सेवक भरतीचे सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.
मानधन तत्वावर कार्यरत कृषी सेवकांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव आणि प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागासवर्गीय कक्ष, समाजकल्याण विभाग आणि सर्व विभागीय आयुक्तांनी पेसा अंतर्गत बिंदूनामावलीची तपासणी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करत पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचे कृषिमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी आमदार राजू तोडसाम यांनीही पेसाअंतर्गत कृषी सेवक पदभरती, रिक्त जागा भरणे आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या नियमिती करणासाठी शासनाने जलद गतीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
Eligibility Criteria
Based on standard state norms for agricultural recruitments, aspiring candidates should prepare with the following benchmarks in mind:
Educational Qualification: Candidates must hold a Diploma in Agriculture from a recognized institute or a Bachelor’s Degree in Agriculture (B.Sc. Agri) / equivalent specialized streams.
Age Limit: Generally ranges between 18 to 40 years, with official relaxations applicable for reserved categories and backward classes.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
Candidates must hold a Diploma in Agriculture from a recognized institute or a Bachelor’s Degree in Agriculture (B.Sc. Agri) / equivalent specialized streams.
वयोमर्यादा किती आहे?
Generally ranges between 18 to 40 years, with official relaxations applicable for reserved categories and backward classes.