Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » कृषी विभागात तब्बल 11 हजार 587 ‘शेतकरी मित्रां’ची होणार नेमणूक; 30% जागा महिलांसाठी राखीव! – Krushi Mitra Bharti 2026
Last Updated:

कृषी विभागात तब्बल 11 हजार 587 ‘शेतकरी मित्रां’ची होणार नेमणूक; 30% जागा महिलांसाठी राखीव! – Krushi Mitra Bharti 2026

Krushi Mitra Bharti 2026 – With a view to further strengthening the state’s Agriculture Department, a significant decision has been taken to appoint a ‘Shetkari Mitra’ (Farmer’s Friend) to assist every Assistant Agriculture Officer. Against this backdrop, Agriculture Minister Dattatray Bharne has given clear indications that priority will be accorded to agriculture graduates during the ensuing recruitment process. On Monday, Anand Chonde Patil—President of the ‘Agricos’ association—met with the Agriculture Minister at the Agriculture Commissionerate and submitted a demand to give precedence to agriculture graduates in the recruitment of ‘Shetkari Mitras.’ There is a proposal to appoint one ‘Shetkari Mitra’ alongside every Assistant Agriculture Officer in the state, under which approximately 11,587 posts are slated to be filled under Krushi Mitra Bharti 2026.

महाराष्ट्र कृषी विभागाकडून 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार आहे. यातील 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जाणून घ्या महत्त्वाची माहिती. कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमधील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी विभागांतर्गत ‘आत्मा’ योजनेद्वारे आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्यभरात 11,587 शेतकरी मित्रांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात तब्बल 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार असून, अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्र होण्यासाठी वय 25 ते 60 वर्षे असणे आवश्यक आहे. संबंधित गावातील रहिवासी असणे, किमान 12 वी उत्तीर्ण असणे आणि कोणताही गुन्हा दाखल नसणे आवश्यक आहे. शेतीतील कौशल्य, उत्तम संवाद कौशल्य आणि स्वयंप्रेरित सेवाभावी वृत्ती असलेल्या व्यक्तींना या कामासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पदवीधर, पदविकाधारक आणि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारही या प्रक्रियेत पात्र ठरू शकतात.

Advertisement

Krushi Mitra Bharti 2026

गावपातळीवर कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यकांना मदत करण्यासाठी प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदामागे एका शेतकरी मित्राची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकरी मित्रांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असणार असून, त्यांना दरमहा 1,500 रुपये मानधन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती, तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती देणे, तसेच कृषी विभागाशी समन्वय साधणे अशी महत्त्वाची कामे त्यांना करावी लागणार आहेत.

शेतकरी मित्र निवड प्रक्रियेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी 30 टक्के जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्त सूरज मांडरे यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून निर्धारित निकषांचे पालन करून निवड केली जाणार आहे. शेतकरी मित्रांना दररोज 2 तास कृषी विभागाशी संबंधित काम करावे लागणार आहे. कृषी मोबाइल अॅपवर आवश्यक माहिती भरणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापनाशी संपर्क ठेवणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.

सातारा, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, पाटण, फलटण आणि माण तालुक्यात प्रत्येकी 48 शेतकरी मित्रांची निवड होणार आहे. वाईमध्ये 36, तर जावळी, खंडाळा आणि महाबळेश्वरमध्ये प्रत्येकी 24 शेतकरी मित्र निवडले जाणार आहेत. अशा प्रकारे सातारा जिल्ह्यात एकूण 444 शेतकरी मित्रांची निवड केली जाणार आहे. अर्जातील दुरुस्ती करण्यासाठी 23 ते 24 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेतकरी मित्र निवड प्रक्रिया आणि संबंधित निकषांची माहिती तपासून अर्जातील आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.


राज्यभर सुरू असलेल्या कथित बोगस ‘कृषिमित्र’ भरतीप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश कृषी आयुक्तालयाने सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना (JDA) दिले आहेत. राज्यभर सुरू असलेल्या कथित बोगस ‘कृषिमित्र’ भरतीप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश कृषी आयुक्तालयाने सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना (JDA) दिले आहेत. बनावट भरतीमागील रॅकेटचा बनावट कृषी निविष्ठांच्या वितरणाशीही संबंध असल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ‘महात्मा फुले कृषी विकास केंद्र’ या नावाने कथित बनावट संस्था स्थापन केली गेली. तिने ‘कृषिमित्र’ पदाच्या ३०,५०० जागा भरणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली. यातून दरमहा २० हजार रुपये वेतनाचे आमिष दाखवून उमेदवारांकडून लाखो रुपये उकळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच धर्तीवर ग्रामआयक्यू नामक संस्थेनेही जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातींपैकी एका जाहिरातीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे छायाचित्र वापरण्यात आल्याने प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर कृषी आयुक्तालयाने सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

Advertisement

वाशीममध्ये पाळेमुळे – या निर्देशानंतर वाशीम येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित कारवाईचा अहवाल आयुक्तालयाकडे पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तपासादरम्यान बोगस कृषिमित्र भरतीचे रॅकेट चालविणारी टोळी बनावट खतांच्या व्यवहारातही सहभागी असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दत्ता पांडुरंग जाधव आणि गजानन पांडुरंग जाधव यांच्याविरोधात वाशीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दत्ता जाधव हा ‘महात्मा फुले कृषी विकास केंद्र’चा संचालक असल्याचे पोलिस तपासात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी वाशिम येथील लीला पाठशाळेत कथित कृषिमित्र परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांना ‘क्रॉप बूस्टर (पोटॅशिअम ह्युमेट ६५ टक्के डब्ल्यू.डब्ल्यू.) २५० ग्रॅम’ या नावाचे उत्पादन देण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधितांकडे या उत्पादनाच्या निर्मिती किंवा विक्रीचा वैध परवाना नव्हता. उमेदवारांच्या माध्यमातून हे उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी गुन्ह्यात नोंदविला आहे. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३(२)(अ), ३(२)(ब) आणि ७, तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक संजय चौधरी करत आहेत.

कृषी विभागात तब्बल 11 हजार 587 ‘शेतकरी मित्रां’ची होणार नेमणूक; 30% जागा महिलांसाठी राखीव! – Krushi Mitra Bharti 2026

राज्यातील कृषी विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भरती प्रक्रियेत कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. राज्यातील कृषी विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भरती प्रक्रियेत कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ॲग्रीकॉस संघटनेच्या वतीने अध्यक्ष आनंद चोंदे पाटील यांनी कृषिमंत्री यांची कृषी आयुक्तालयात भेट घेत शेतकरी मित्र भरतीमध्ये कृषी पदवीधरांना अग्रक्रम देण्याची मागणी सोमवारी केली. राज्यातील प्रत्येक सहायक कृषी अधिकाऱ्यासोबत एक शेतकरी मित्र नेमण्याचा प्रस्ताव असून, त्याअंतर्गत सुमारे ११,५८७ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत केली जाणार आहे. संबंधित पदांसाठी सुमारे १८ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, कृषी पदवीधरांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात कृषी पदवीधर बेरोजगार असून त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हावा, यासाठी ही मागणी करण्यात आली होती. कृषिमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत कृषी पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. ‘‘राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या कृषी पदवीधरांना न्याय देण्यासाठी शेतकरी मित्र भरतीत त्यांना प्राधान्य मिळणे अत्यावश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार तांत्रिक मार्गदर्शन मिळेल आणि कृषी क्षेत्र अधिक बळकट होईल,’’ असे ॲग्रीकॉस संघटनेचे अध्यक्ष आनंद चोंदे पाटील यांनी सांगितले.