खुशखबर!! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती! | Krida Shikshak Bharti
Maharashtra Sport Teacher Bharti 2026
या वर्षीच्या शिक्षक भरतीत शालेय शिक्षण विभागाने खूप मोठे बदल केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीची अट नसणार आहे. ‘टीईटी’चे गुण, व्यावसायिक व शैक्षणिक अर्हतेच्या गुणांवरून त्यांच्या गुणवत्ता यादीनुसार निवडी होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी उमेदवारांना १०० शाळांचा प्राधान्यक्रम निवडता येणार असून, ही प्रक्रिया जुलैअखेर सुरू होईल. दुसरीकडे, खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी १०० गुणांमधून सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांचीच निवड होईल. संबंधित संस्थेला मुलाखतीतून उमेदवारास १० गुण देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच पवित्र पोर्टलवरील उमेदवारांच्या कागदपत्रांवरून (शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता) व ‘टीईटी’त मिळालेल्या एकूण गुणांंवरून ९० गुण दिले जाणार आहेत. उमेदवारास ‘टीईटी’तून ७५ गुण, व्यावसायिक अर्हतेसाठी ८ व शैक्षणिक अर्हतेनुसार ७ गुण मिळतील. त्यातून सर्वाधिक गुण मिळालेला उमेदवार त्या संस्थेत शिक्षक म्हणून निवडला जाईल. खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ५० शाळा तथा संस्थांचा प्राधान्यक्रम भरता येणार आहे. खासगी अनुदानित शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर पुढील १५-२० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. १५ ऑगस्टपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन आहे. या शिक्षक भरतीद्वारे राज्यात अंदाजे १५ ते १८ हजार शिक्षकांची भरती होईल.
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांच्या प्रत्येक केंद्रास एक कला किंवा क्रीडा शिक्षक मिळणार आहे. या पदांसाठी मंजुरी मिळाली आहे, पण त्या पदांची पात्रता अजून निश्चित झालेली नाही. बीएड की डीएड पात्रता असलेला शिक्षक घ्यायचा, त्यांना ‘टीईटी’ बंधनकारक राहणार का, यावर अभ्यास सुरू आहे. पुढील शिक्षक भरतीत ही पदे भरली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Maharashtra Krida Shikshak Bharti – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा केवळ कागदावरच गाजावाजा करणाऱ्या राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीअभावी शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास केवळ नावालाच उरला आहे. परिणामी, हजारो विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. राज्य सरकारच्या या अनास्थेविरोधात आता क्रीडा शिक्षकांनी आंदोलनाचा इशारा देत आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांची रखडलेली भरती तात्काळ आणि वेगाने करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने येत्या बुधवारपासून (ता. ८) मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शारीरिक शिक्षण विषयातून विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक बौद्धिक विकासासह सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असणारा विषय आहे. शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून ऑलिंपिक पदकाचा पाया रचला जात आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये या विषयाच्या अध्यापनाचे काम करणारे शारीरिक शिक्षण शिक्षकांचा प्रश्न भेडसावत आहे. राज्यात गेल्या वीस वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीला राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने हजारो बी.पी.एड आणि एम.पी.एड पदवीधर बेरोजगार आहेत. या दीर्घकालीन अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने अखेर आंदोलन करण्यात येत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष संदिप मनोरे आणि सचिव तायाप्पा शेंडगे यांनी दिली.
क्रीडा शिक्षकांच्या प्रमुख मागण्या :
– क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली आणि सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करावी.
– जानेवारी २०२६च्या शासन निर्णयानुसार चार हजार ८६० क्रीडा शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या टप्प्यात भरावीत.
– रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
– विविध शाळांमधील शारीरिक शिक्षण शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
राज्यातील केंद्र शाळांच्या स्तरावर क्रीडाशिक्षक पदाला शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार क्रीडाशिक्षकांची ४ हजार ८६० पदे मंजूर करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक संवर्गातील २ लाख ३६ हजार २२८ पदे पायाभूत पदे (प्राथमिक) निश्चित करण्यात आली आहेत. राज्यातील समूहसाधन केंद्रांची (केंद्र शाळा) २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासननिर्णयानुसार पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत ४ हजार ८६० समूहसाधन केंद्र अस्तित्वात आहेत. १५ मार्च २०२४ च्या शासननिर्णयाद्वारे संचमान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रस्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे क्रीडाशिक्षक संवर्गातील पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) हा ४ हजार ८६० पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे, तर ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासननिर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) हा ४ हजार ८६० पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मयदित दोन संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत, असे शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हानिहाय क्रीडाशिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
एखाद्या वर्षाच्या संचमान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे मंजूर पदांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यांतील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार शिक्षण आयुक्तांना असेल. मात्र, संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत पदांच्या मयदितच तात्पुरत्या पदांचे समायोजन करता येईल. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा), केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) या दोन्ही संवर्गांची बिंदूनामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वाधिक क्रीडाशिक्षक पुणे जिल्ह्यात:
जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या विशेष शिक्षक (क्रीडा) या पदाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक
३०६
शिक्षक पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला
२५१
, अहिल्यानगर जिल्ह्याला
२४६
, नाशिक जिल्ह्याला
२४४
, रायगड जिल्ह्याला
२२८
, सातारा जिल्ह्याला
२२३
शिक्षक मिळणार आहेत, तर सर्वांत कमी भंडारा जिल्ह्याला
६०
, हिंगोली जिल्ह्याला
६८
, वाशिम जिल्ह्याला
७१
, धाराशिव जिल्ह्याला
८०
शिक्षक मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे
Maharashtra Sport Teacher Bharti 2025
क्रीडा शिक्षकांसाठी खुशखबर,महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेत देशात दुसरे स्थान मिळवूनही, राज्यातील क्रीडा शिक्षक आजही रोजंदारीवर काम करण्याची वेळ आलेली आहे. पात्र खेळाडू घडवणाऱ्या या शिक्षकांच्या रिक्त जागा भरती न झाल्याने संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा शिक्षकांच्या पदभरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. “२५१ विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक नेमण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कोणत्याही अनुदानित शाळेत क्रीडा शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने अनेक प्रशिक्षित आणि पात्र उमेदवारांचे वय वाढत चालले आहे. बी.पी.एड आणि एम.पी.एड सारखी पदवी घेतलेले अनेक खेळाडू शासन भरती न झाल्यामुळे खासगी शाळांमध्ये केवळ मामुली मानधनावर काम करण्यास मजबूर आहेत.
क्रीडा शिक्षकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच क्रीडामंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावेळी मंत्री कोकाटे म्हणाले की, क्रीडा शिक्षक हा खेळाडू तयार करण्याचा कणा आहे आणि सरकारला त्यांच्या योगदानाचा मान आहे. वित्त विभागाशी चर्चा करून रिक्त पदांच्या भरतीला लवकर अंतिम स्वरूप देण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमध्ये उत्तुंग कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज अधोरेखित होत असताना, राज्यातील क्रीडा शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न आता लवकर मार्गी लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिक्षण व्यवस्थेमध्ये इतर विषयांच्या बरोबर शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून या विषयामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. त्यामुळे राज्यात शारीरिक शिक्षकांची पदे पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. मालेगाव व नाशिक येथील दादा भुसे यांच्या निवासस्थानी शिक्षकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी शारीरिक शिक्षण शिक्षकांचे मार्गदर्शक अमोल जोशी, स्वप्निल करपे, कुणाल शिंदे, एस. एम. इनामदार यांनी ना. भुसे यांना निवेदन देऊन शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.