Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » कोतवालांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद शासनाच्या निर्णयामुळे फटका; ‘ड’ वर्गाची पदे संपुष्टात! – Kotwal Bharti 2026
Last Updated:

कोतवालांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद शासनाच्या निर्णयामुळे फटका; ‘ड’ वर्गाची पदे संपुष्टात! – Kotwal Bharti 2026

Kotwal Bharti 2026

महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा कर्मचारी समजल्या जाणाऱ्या कोतवालाच्या पदोन्नतीची मार्गच बंद झाले आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक मोठा फटका त्यांना बसला आहे. महसूल विभागाला प्रशासनाचा कणा समजला जातो. मंत्रालय ते गावपातळीवर महसूल विभागाचे कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे गाव पातळीवरील अनेक माहिती मिळण्यास आणि योजना राबविण्यास मदत होते. शासनाने महसूल विभागाच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. यानुसार राज्यसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे कमी करण्यात आली. तर तहसीलदारांची पदे वाढवण्यात आली. काही ठिकाणी अपर जिल्हाधिकारी आणि अपर तहसीलदारांची नवी कार्यालये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अपर जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या पदात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवण्यात येईल.

साधारणतः प्रत्येक तलाठी कार्यालयात कोतवालाचे पद आहे. इतर पदांप्रमाणे ही कोतवालांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. कोतवालला शिपाई पदावर पदोन्नती देण्यात येत होती. कालांतराने त्याला इतरही पदावर पदोन्नती मिळत असे. शिपाई हे ‘ड’ वर्गातील पद आहे. आता शासनाने ‘ड’ वर्गातील पदेच न भरण्याचा निर्णय घेतला आहे. शिपाई पदाचे काम करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ‘ड’ वर्गाचे पदेच नसल्याने कोतवालांच्या पदोन्नतीचा मार्गच भरण्यात येणार बंद झाला आहे.

Advertisement

Kotwal New Salary Details

Kotwal Bharti 2024 :  राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, त्याचा लाभ १२ हजार ७९३ कोतवालांना मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासही मंजुरी देण्यात आली.

तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2024ल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा . यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement