Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » नवीन भरती कधीपासून? कारागृह विभागात ७० टक्के पदे रिक्त! तुरुंगाधिकाऱ्यांची ६०० पदे रिक्त!! – Karagruh Police Bharti 2026
Last Updated:

नवीन भरती कधीपासून? कारागृह विभागात ७० टक्के पदे रिक्त! तुरुंगाधिकाऱ्यांची ६०० पदे रिक्त!! – Karagruh Police Bharti 2026

Maharashtra Karagruh Police Bharti 2026

कारागृह विभाग हा एक महत्वाचा विभाग असून यात अनेक पदे सध्या रिक्त असल्याचे चित्र आहे. या मुळे नवीन पदभरती प्रक्रिया त्वरित राबविणे आवश्यक आहे. राज्य सरकारने हि भारी लवकरात लवकर सुरु करावी म्हणजे रोजगार निर्मिती सोबत कारागृहातील कामकाज सुद्धा सुधारेल. सध्या राज्यातील विविध कारागृहांमध्ये हजारो सराईत गुन्हेगार आणि बंदीजन बंदिस्त असताना, कारागृह प्रशासनाचा मुख्य कणा मानल्या जाणाऱ्या ‘तुरुंगाधिकारी श्रेणी-२’ या पदाची भरती गेल्या १२ वर्षांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ७० टक्के पदे रिक्त असल्याने कारागृहांची अंतर्गत सुरक्षा सध्या केवळ शिपाई आणि हवालदारांच्या भरवशावर रामभरोसे सुरू आहे. येरवड्यासारख्या विस्तीर्ण कारागृहात ७५०० कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी ४५ पैकी केवळ ४ जेलर उपलब्ध असणे, हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे.

राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत संवेदनशील मानली जाते. यात प्रमुख कारागृहांमध्ये ‘तुरुंगाधिकारी श्रेणी-२’ची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यात मध्यवर्ती कारागृहांमध्ये येरवडा (पुणे), आर्थर रोड (मुंबई), तळोजा (नवी मुंबई), ठाणे, नाशिक रोड, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कळंबा (कोल्हापूर), तर जिल्हा कारागृहात अकोला, यवतमाळ, बुलढाणा, धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा येथे रिक्त पदे आहेत. या मोठ्या कारागृहांमध्ये अंतर्गत कैद्यांचे व्यवस्थापन, बराकींची तपासणी आणि सुरक्षा नियोजनात तुरुंगाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, मात्र तिथेच सध्या मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आहे. यासंदर्भात राज्याच्या कारागृह प्रशासनाचे एडीजी सुहास वरके यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

राज्यातील कारागृहांमध्ये एकीकडे कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा तीन ते चारपट वाढलेली असताना दुसरीकडे कैद्यांवर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या तुरुंगाधिकाऱ्यांची (श्रेणी २) संख्या मात्र कमालीची घटली आहे. राज्यात तुरुंगाधिकारी (श्रेणी १) यांची दोनशेपेक्षा जास्त आणि तुरुंगाधिकारी (श्रेणी २) यांची चारशेहून अधिक पदे रिक्त असल्याने कारागृहातील सुरक्षा धोक्यात आली आहे. २०१३ पासून खात्यांतर्गत परीक्षा न घेतल्यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढला आहे.

कारागृहात अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपाधीक्षक, तुरुंगाधिकारी-श्रेणी १, तुरुंगाधिकारी-श्रेणी २, कारागृह सुभेदार, कारागृह हवालदार आणि कारागृह शिपाई, अशी पदांची श्रेणीबद्धता आहे. अधीक्षक हे कारागृहाचे प्रमुख असतात. अतिरिक्त अधीक्षक व उपाधीक्षक हे त्यांना साह्य करतात. तुरुंगाधिकाऱ्यांकडे बरॅकची जबाबदारी दिली जाते. तुरुंगाधिकारी हे प्रत्यक्ष कैद्यांवर नजर ठेवून असतात. कारागृहातील सर्कल सांभाळण्याचे प्रत्यक्ष काम तुरुंगाधिकारी (श्रेणी २) हे करत असतात. त्यामुळे कारागृहात त्यांचे महत्त्वाचे काम असते.

तुरुंगाधिकारी श्रेणी २ हे पद २:१ प्रमाणे सरळसेवा/पदोन्नतीने भरले जाते. १० वर्षे सेवा केलेल्या कारागृह शिपायांनाही खात्यांतर्गत परीक्षा देऊन तुरुंगाधिकारी (श्रेणी २) होता येते. मात्र, २०१३ पासून खात्यांतर्गत परीक्षाच घेतलेली नाही. २३ मार्च २०२५ रोजी शासन निर्णय झाला. मात्र, त्यानंतरही परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. २००६ ते २०१३ दरम्यान खात्यांतर्गत परीक्षा घेऊन हे पद भरण्यात आले. त्यानंतर अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत धाराशिव-कळंबचे आ. कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.


Maharashtra Karagruh Police Bharti 2026

महाराष्ट्र कारागृह विभागातील मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि नागपूर या पाचही विभागांच्या उपमहानिरीक्षकांची (डीआयजी) पदे मोठ्या कालवाधीपासून रिक्त आहेत. सरकारने पदोन्नतीने ही पदे भरता न भरता वरिष्ठ कारागृह अधिक्षकांवर उपमहानिरीक्षकपदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा, दैनंदिन आणि न्यायालयीन कामकाज सांभाळून उपमहानिरीक्षकपदाची जबाबदारी सांभाळताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

कारागृह महानिरीक्षक तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक हे विभागाचे प्रमुख असतात. मध्यवर्ती कारागृह देरवडा पूर्ण त्याखालोखाल विशेष कारागृह महानिरीक्षक पद अस्तित्वात आले आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि नागपूर असे पाच विभाग आहेत. प्रत्येक विभागासाठी उपमहानिरीक्षक पद आहे. मागील काही वर्षांपासून एकेक करून पाचही विभागांचे उपमहानिरीक्षकपदावरील अधिकारी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून रिक्त झालेल्या विभागांची जबाबदारी अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे

कारागृह विभागात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागाचे उपमहानिरीक्षकपद मोठ्या काळापासून रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच सरकराकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘मटा’ला दिली.

आयपीएस अधिकारी; की पदोन्नतीने भरती ?
कारागृह विभागात वरिष्ठ अधीक्षक असणाऱ्या एकाही अधिकाऱ्यांची तीन वर्षे सेवा पूर्ण झालेली नाही, तर येत्या दोन-तीन वर्षांत काही वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांची कारागृह विभागातील बदलीला अधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे सरकार कारागृह विभागातील उपमहानिरीक्षकपदी पोलिस खात्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करणार, की वरिष्ठ अधीक्षकांना पदोन्नती देऊन रिक्त पदे भरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारागृह अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची मागणी होत आहे.


Karagruh Police Bharti 2025

Karagruh Police Bharti 2025 : Around 15000 new police constable posts have been Filled by Maharashtra Gruh Vibhag Under Police Bharti 2025. Accordingly, applications are being invited from the candidates. The application is to be done online. Online application will start from 29th October 2025. Also, the last date to apply is 30th November 2025. A candidate can apply for a post in only one unit in the entire state of Maharashtra. Can be canceled at any stage.

राज्याच्या कारागृह प्रशासनात सुमारे ५५४ नवीन पोलीस शिपाई पदांना मंजुरी मिळाली आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो . कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच पोलीस भरती २०२५ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून ग्रुपला जॉईन करावे .

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+  जागा!!

District Wise Karagruh Police Shipai Vacancy 2025

अ.क्र. घटकाचे नाव रिक्त पदे
1 कारागृह, मुंबई 176
2 कारागृह, पुणे 130
3 कारागृह, नाशिक 118
4 कारागृह, नागपूर 130
एकूण 554

राज्यात सुरु झालीये तब्बल 15000 जागांची पोलीस भरती, सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती, ऑनलाईन अर्जासाठी नवीन पोर्टल लिंक!

Karagruh Police Shipai Bharti PDF 2025

Mumbai Karagruh Police Bharti 2025

Download

Pune Karagruh Police Bharti 2025

Download

Nagpur Karagruh Police Bharti 2025

Download

Nashik Karagruh Police Bharti 2025

Download

🔔 SRPF पोलीस भरती २०२५ अंतर्गत २,३९३ पदांची भरती; अर्ज प्रक्रिया येथे बघा | SRPF Bharti 2025

🔔 policerecruitment2025.mahait.org- Apply Online Police Bharti 2025

वयोमर्यादा –

खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे

मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग: रु. 450 /-

मागास प्रवर्ग: रु. 350 /-

पोलीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स

✅ पोलीस भरती २०२५ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
✅ पोलीस भरती २०२५ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅ पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅ लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅ पोलीस भरती २०२५ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती
✅ पोलीस भरती २०२५ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज
✅ पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
✅ पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा
✅ ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच
✅ Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2025
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2025 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Karagruh Police Recruitment 2025

अर्ज सुरु होण्याची तारीख 29-10-2025 00.00 वा.
अर्ज बंद होण्याची तारीख 30-11-2025 24.00 वा.
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 30-11-2025 24.00 वा.
अर्जासाठी सूचना अधिक माहिती…
जाहिरात अधिक माहिती…
महत्वाची सूचना अधिक माहिती…

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आयपीएस अधिकारी; की पदोन्नतीने भरती ?

कारागृह विभागात वरिष्ठ अधीक्षक असणाऱ्या एकाही अधिकाऱ्यांची तीन वर्षे सेवा पूर्ण झालेली नाही, तर येत्या दोन-तीन वर्षांत काही वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांची कारागृह विभागातील बदलीला अधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे सरकार कारागृह विभागातील उपमहानिरीक्षकपदी पोलिस खात्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करणार, की वरिष्ठ अधीक्षकांना पदोन्नती देऊन रिक्त पदे भरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारागृह अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची मागणी होत आहे.

Karagruh Police Bharti 2025 online form date

अर्ज सुरु होण्याची तारीख 29-10-2025 00.00 वा

Important Note for Applicants To Apply For Karagruh Vacancy 2025

1. Applicants are requested to enter valid and functional email ID and mobile number, as they will be used for communication purpose.

2. Applicant should preserve correct user ID/email ID and password for further recruitment process.

3. The link for password reset is sent to the email ID provided by the applicant during registration. So if wrong/invalid email ID is entered during registration, password cannot be recovered.

4. Please read all instructions carefully before filling online application, changes will not be made once form is submitted.

नवीन उमेदवार नोंदणी, अर्ज करण्याचे चार सुलभ टप्पे – How To Apply For Karagruh Police Bharti 2025

  • Step1 – नोंदणी
  • Step2 – लॉग इन
  • Step3 – अर्ज करा
  • Step4 – शुल्क भरणा करा

मी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

policerecruitment2025.mahait.org या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.