Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » ‘तासिका’ शिक्षकांनसाठी आनंदाची बातमी,दुप्पट मानधन मिळणार! – Kantrati Shikshak Salary Details
Last Updated:

‘तासिका’ शिक्षकांनसाठी आनंदाची बातमी,दुप्पट मानधन मिळणार! – Kantrati Shikshak Salary Details

Kantrati Shikshak Salary Details Latest Update – अशासकीय अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये घड्याळी तासिका (सीएचबी) तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. सुधारित दरानुसार माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना प्रतितास १२० रुपयांऐवजी २५० रुपये, तर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील शिक्षकांना १५० रुपयांऐवजी ३०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय १ मे २०२५ पासून लागू केला असला, तरी वाढत्या महागाईत वाढीव मानधन पुरेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ झाल्याने कमी मानधनात काम करणाऱ्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.

Kantrati Shikshak Salary Details

शिक्षकांच्या अडचणी अन् मागण्या काय?
तुटपुंजे उत्पन्न, अनियमित व उशिरा मिळणारे मानधन, अतिरिक्त विना-शैक्षणिक कामे, मर्यादित तासिका या अडचणी असून किमान मासिक वेतन निश्चिती करावी, पात्र आणि अर्हताप्राप्त तासिका शिक्षकांना विनाअट पूर्णवेळ नियमित सामावून घ्यावे, पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे समान काम समान वेतन मिळावे, अशा विविध मागण्या आहेत. अशासकीय अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये घड्याळी तासिका (सीएचबी) तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना समान काम समान वेतन मिळावे, त्यांच्यावरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा, पूर्णवेळ कार्यरत शिक्षकांच्या वेतनाच्या ५० टक्के तरी वेतन मिळाले पाहिजे, तसेच हे वेतन वेळेवर मिळावे, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. यासाठी मागणी करणार आहोत.

Advertisement

तासिका तत्त्वावर अध्यापन म्हणजे काय?
कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळेत एखाद्या विशिष्ट विषयासाठी पूर्णवेळ शिक्षकाची गरज किंवा नियमित कार्यभार उपलब्ध नसतो, तेव्हा पूर्णवेळ नेमणूक न करता ठरावीक तासांसाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची नेमणूक केली जाते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)