माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026: उत्तरतालिका (Answer Key) प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याची संधी | Kamgar Ayukta Result PDF
Kamgar Ayukta Result PDF
Kamgar Ayukta Result PDF : मित्रांनो अखेर महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळ गट-क सरळसेवा परीक्षा 2026 ची उत्तरतालिका (Answer Key) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी 29 जुलै आणि 30 जुलै 2026 रोजी आयोजित ऑनलाइन परीक्षेला हजेरी लावली होती, ते आता अधिकृत उत्तरतालिका पाहून आपल्या उत्तरांची पडताळणी करू शकतात. कामगार आयुक्तालय उत्तरतालिकेमुळे उमेदवारांना संभाव्य गुणांचा अंदाज घेणे सोपे होणार आहे. तसेच, कामगार आयुक्तालय उत्तरतालिकेमधील कोणत्याही प्रश्न किंवा उत्तराबाबत आक्षेप असल्यास, आयोगाने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पद्धतीने हरकत (Kamgar Ayuktalay Answer Key Objection) नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अश्याच अधिकृत माहितीसाठी MahaBharti.in ला भेट देत राहा.
कोणत्या पदांसाठी परीक्षा झाली होती?
या भरती प्रक्रियेमध्ये खालील गट-क पदांचा समावेश होता:
- लेखापाल (Accountant)
- निरीक्षक (Inspector)
- लघुटंकलेखक (Stenographer)
ही परीक्षा 29 आणि 30 जुलै 2026 रोजी ऑनलाइन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात आली होती. परीक्षेचे आयोजन दररोज तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये करण्यात आले होते.
Kamgar Ayukta Answer Key 2026
उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी?
उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून उत्तरतालिका पाहू शकतात.
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://mahakamgar.maharashtra.gov.in/home/index.
- “Kamgar Ayukta Group-C Recruitment 2026 Answer Key” किंवा संबंधित लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक (Kamgar Ayukta Registration Number) आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉगिन करा.
- आपल्या शिफ्टची उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.
- उत्तरतालिका डाउनलोड करून आपल्या उत्तरांची पडताळणी करा.
हरकत (Objection) कशी नोंदवावी?
जर कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराबाबत उमेदवारांना शंका किंवा आक्षेप असेल, तर अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून निर्धारित कालावधीत ऑनलाइन हरकत नोंदवता येईल. मुदत संपल्यानंतर कोणतीही हरकत स्वीकारली जाणार नाही.
उत्तरतालिकेवरील हरकतींची छाननी पूर्ण झाल्यानंतर अंतिम उत्तरतालिका (Kamgar Ayukta Final Answer Key) प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर परीक्षेचा निकाल (Result) जाहीर होईल. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सर्व सूचना नियमितपणे तपासत राहाव्यात.
महत्त्वाची सूचना: सर्व उमेदवारांनी उत्तरतालिका डाउनलोड करून आपले संभाव्य गुण तपासावेत आणि आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत हरकत नोंदवावी.