जेईई-अॅडव्हान्स्डची संधी वाढणार; दोनऐवजी तीन प्रयत्नांची मागणी !! | JEE Advanced 2026
JEE Advanced 2026
JEE Advanced 2026 : . Aspirants seeking admission to prestigious institutions like the IITs have demanded that the number of attempts allowed for the ‘Joint Entrance Examination (JEE)-Advanced’ be increased from two to three.
आयआयटी प्रवेशासाठी ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’च्या संधी वाढविण्याची मागणी आता देशभरातील इच्छुक उमेदवारांकडून जोर धरू लागली आहे. प्रतिष्ठित आयआयटींसह देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई)-अॅडव्हान्स्ड’ देण्याची संधी सध्याच्या दोन प्रयत्नांवरून तीन वेळा करण्याची मागणी केली आहे.
Advertisementया निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जेईई-अॅडव्हान्स्डच्या प्रयत्नांची मर्यादा वाढविण्याच्या मागणीला आता देशभरातील विद्यार्थ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. सध्या परीक्षार्थींना सलग दोन वर्षांत जास्तीत जास्त दोन वेळा परीक्षा देण्याची मुभा असून, पहिला प्रयत्न बारावी उत्तीर्ण झालेल्या वर्षी, तर दुसरा प्रयत्न त्यानंतरच्या सलग वर्षात करणे बंधनकारक आहे. या नियमात बदल करण्यासाठी १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्रालय, आयआयटी परिषद आणि जॉइंट अॅडमिशन बोर्डाकडे विनंती याचिका दाखल केली आहे. परीक्षेच्या प्रयत्नांची संख्या तीन करावी किंवा सलग तीन वर्षांत दोन वेळा परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
जेईई-अॅडव्हान्स्डच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी जेईई-मेनच्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा रंगत असते. जेईई-मेन परीक्षा दिलेल्या सुमारे २.५ लाख उमेदवारांना गुणानुक्रमानुसार जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्याची संधी दिली जाते. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झालेल्या वर्षापासून सुरू होणाऱ्या सलग तीन वर्षांत जेईई-मेन परीक्षा सहा वेळा देण्याची मुभा आहे.