Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » आयटीआय प्रवेशासाठी शेवटची संधी; संस्थास्तरीय फेरीत मिळणार प्रवेश !! – ITI Admission 2026
Last Updated:

आयटीआय प्रवेशासाठी शेवटची संधी; संस्थास्तरीय फेरीत मिळणार प्रवेश !! – ITI Admission 2026

ITI Admission 2026

ITI Admissions – जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध व्यवसायांच्या रिक्त जागांवर आता संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही काही जागा रिक्त राहिल्याने, पूर्वनोंदणी करूनही अद्याप प्रवेश न मिळालेल्या पात्र उमेदवारांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्याची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

DVET ITI Admission 

संस्थांमध्ये उपलब्ध रिक्त जागांची माहिती घेऊन उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार संबंधित व्यवसायाची निवड करून मुदतीपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पूर्वनोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन रिक्त जागांवर प्रवेश घेता येणार असल्याने, इच्छुक उमेदवारांनी संबंधित आयटीआयशी तातडीने संपर्क साधावा.

Advertisement

जिल्ह्यातील आयटीआयमध्ये २ हजार ७१६ प्रवेश क्षमता

जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत असून, पहिल्या चार फेऱ्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १७ शासकीय व खासगी आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या २,७१६ प्रवेश क्षमतेपैकी २,५०६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, काही जागा अद्याप रिक्त असल्याने त्या भरण्यासाठी आता अंतिम संस्थास्तरीय प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. आयटीआय प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता, रिक्त जागांची संख्या तुलनेने कमी असून इच्छुक पात्र उमेदवारांसाठी ही प्रवेशाची महत्त्वाची संधी ठरणार आहे.

२४ ऑगस्टपर्यंत संस्थास्तरीय प्रवेश

प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना २४ ऑगस्टपर्यंत संबंधित आयटीआयमध्ये थेट अर्ज करता येणार आहे. प्राप्त अर्जाची गुणवत्ता यादी संस्थेच्या फलकावर प्रसिद्ध केली जाईल. गुणवत्तेनुसार थेट प्रवेश निश्चित केले जातील. विशेष म्हणजे, मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement