Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर! इस्रायलमध्ये ३५००पदांची भरती… दरमहा दोन लाख रुपये पगार, महिलांना विशेष प्राधान्य!! – Israel jobs for Maharashtra
Last Updated:

खुशखबर! इस्रायलमध्ये ३५००पदांची भरती… दरमहा दोन लाख रुपये पगार, महिलांना विशेष प्राधान्य!! – Israel jobs for Maharashtra

Israel jobs for Maharashtra

इस्रायलमध्ये घरगुती काळजीवाहक (होम बेस्ड केअरगिव्हर) पदाच्या तब्बल ३५०० जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, भारतातील पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) समन्वयातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, तर निवड इस्रायली नियोक्त्यांकडून केली जाणार आहे. या माध्यमातून आकर्षक वेतन, मोफत निवास, वैद्यकीय सुविधा आणि दीर्घकालीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे १ लाख ९९ हजार ७७० रुपये वेतन मिळणार असून त्यासोबत निवास, अन्न व वैद्यकीय विम्याची सुविधाही नियोक्त्याकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांना आठवड्यातून सहा दिवस ‘लाईव्ह-इन केअरगिव्हर’ म्हणून काम करावे लागेल. वृद्ध, अपंग तसेच विशेष गरजा असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. कामाच्या स्वरूपात रुग्णांना आंघोळ घालणे, कपडे बदलणे, औषधे देणे, स्वयंपाक करणे, साफसफाई, खरेदी तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मदत करणे या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. उमेदवारांना दरवर्षी १६ दिवसांची रजा आणि ९ धार्मिक व राष्ट्रीय सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. कराराचा कालावधी दोन वर्षांचा असून तो पुढे नूतनीकरणीय राहणार आहे.

खुशखबर! इस्रायलमध्ये ३५००पदांची भरती… दरमहा दोन लाख रुपये पगार, महिलांना विशेष प्राधान्य!! – Israel jobs for Maharashtra
घरगुती काळजीवाहक भरतीमध्ये महिलांना ९० टक्के, तर पुरुषांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अर्जदारांचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून उमेदवाराची उंची किमान १.५ मीटर व वजन किमान ४५ किलो असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून इंग्रजी भाषेचे मध्यम ज्ञान अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ज्या उमेदवारांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी परदेशात वास्तव्य केले आहे, त्यांना संबंधित देशातील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. निवड प्रक्रिया ऑनलाइन आणि व्हिडिओ चित्रीत मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. अंतिम निवड इस्रायली नियोक्त्यांकडून केली जाणार आहे.

Advertisement

महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे पती किंवा पत्नी, पालक अथवा मुले सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास किंवा नोकरीत नसावीत, अशी अट घालण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी उमेदवारांना नोंदणी शुल्क, वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी, व्हिडिओ मुलाखत शुल्क, व्हिसा प्रक्रिया आणि विमान प्रवासाचा खर्च स्वतः करावा लागणार आहे. उमेदवारांकडे केअरगिव्हर प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ‘ऑन जॉब ट्रेनिंग’सह किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. याशिवाय परिचारिका, भौतिकोपचार किंवा सुईणकाम संबंधित मान्यताप्राप्त डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदाराकडे किमान तीन वर्षे वैध असलेला पासपोर्ट असणेही आवश्यक आहे. प्रारंभिक खर्च सुमारे १.४७ लाख रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी maharashtrainternational.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच जळगाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.


कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत इस्रायलमध्ये गृहआधारित काळजीवाहक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींसाठी परदेशात रोजगाराची उत्तम संधी निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश उगले यांनी केले आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात झालेल्या करारानुसार भारतीय व्यावसायिक काळजीवाहकांना मोठी मागणी निर्माण झाली असून इस्रायलमध्ये सुमारे २ हजार ५०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इस्रायलमधील युद्धग्रस्त नसलेल्या भागात गृहआधारित काळजीवाहक म्हणून नोकरीसाठी २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र ठरणार आहेत.

उमेदवारांना इंग्रजी भाषेचे ज्ञान तसेच सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. संबंधित सेवेसाठी उमेदवारांनी भारतीय नियामक प्राधिकरणाने मान्यताप्राप्त किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. कार्यस्थळी प्रशिक्षणासह प्रमाणपत्र असणे आवश्यक असून नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स सहाय्यक किंवा प्रसूती परिचर्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध होणार आहे. तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंग आदी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारही अर्जासाठी पात्र राहतील. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातून निवड प्रक्रिया, आरोग्य तपासणी, व्हिसा व पासपोर्ट प्रक्रियेसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून करण्यात येणार आहे.

Advertisement

निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा तसेच राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून भारतीय चलनानुसार दरमहा सुमारे दोन लाख रुपये वेतन मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल अधिकृत संकेतस्थळ येथे ऑनलाईन नोंदणी करून या रोजगारसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष अथवा ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


Israel jobs for Maharashtra

इस्रायलमध्ये बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रात भरती होणार आहे. बांधकाम विभागात ८ हजार तर नर्सिंग क्षेत्रात १,५०० जागा उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण व इंग्रजीचे ज्ञान असणाऱ्यांनी माहिती, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधल्यास त्यांना परदेशातील नोकरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्रायल देशात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्र. सहायक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.

तरुणांना इस्रायलमध्ये नोकरीची संधी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व इस्त्रायल सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील तरुणांना परदेशात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमांतर्गत कुशल व अर्धकुशल कामागारांना काम मिळणार असून, भरघोस पगार ही मिळणार आहे. कोणत्या क्षेत्रात किती पदांवर भरती सध्या प्रामुख्याने बांधकाम व नर्सिंग क्षेत्रात भरती प्रक्रिया सुरू आहे. बांधकाम क्षेत्रात ८,००० तर नर्सिंग क्षेत्रात १,५०० पेक्षा अधिक जागांसाठी निवड केली जाणार आहे. किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक बांधकाम क्षेत्रातील नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. नर्सिंग क्षेत्रासाठी मात्र आवश्यक प्रशिक्षण घेतलेले असावे. इंग्रजी बोलता येणे अनिवार्य इस्रायलमध्ये काम करताना संवाद साधण्यासाठी उमेदवाराला इंग्रजी भाषा बोलता येणे अनिवार्य आहे. एकूणच ही भाषा बोलता येणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षण व भाषेची अट अनिवार्य केली आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे २,६०० युवक-युवतींना इस्रायलमधील नॉन-वॉर झोनमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान, वय २५ ते ५० वर्षे आणि किमान १० वी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव, तसेच नूतनीकरण, स्ट्रक्चरल पुनर्वसन, जतन आणि अपग्रेडिंग कामाचे तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया, नियुक्ती, आरोग्य तपासणी, व्हिसा व पासपोर्ट मार्गदर्शन ही सर्व कार्ये महाराष्ट्रातच पार पाडली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांसाठी राहण्याची, जेवणाची आणि मेडिकल विम्याची सोय करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना मासिक १ लाख ६२ हजार ५०० रुपयेपर्यंत वेतन मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन अर्ज करावा लागणार – या नोकरीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. शासनाच्या कौशल्य विकास पोर्टलवर जाऊन अर्ज भरण्याची सूचना केली आहे.

किमान तीन वर्षांचा अनुभव हवा
अर्जदाराकडे संबंधित कामाच्या (उदा. बांधकाम, नर्सिंग) क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या अनुभवामुळे उमेदवारांना इस्त्रायलमध्ये त्वरित काम उपलब्ध होणार आहे.
इतर निकष आणि पात्रता काय ?
उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे. तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेले व शारीरिक श्रम करण्याची तयारी असलेले उमेदवार परदेशातील नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. अटी, शर्थीची पूर्तता करणाऱ्यांना परदेशात कामाची संधी मिळणार आहे.


महाराष्ट्रातील कुशल तरुण-तरुणींसाठी परदेशात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाच्या पुढाकारातून आणि भारत सरकार व इस्रायल सरकार यांच्यातील कराराअंतर्गत इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ या क्षेत्रातील तब्बल ५ हजार पदांसाठी भरती सुरू झाली आहे.

या सर्व नोकऱ्या इस्रायलच्या नॉन-वॉर झोन भागांमध्ये उपलब्ध होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख ३१ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.

इच्छुक उमेदवारांनी www.maharashtrainternational.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान शासनाकडून सुविधा
महाराष्ट्र शासन उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया, आरोग्य तपासणी, पासपोर्ट व व्हिसा प्रक्रिया, मेडिकल विमा, तसेच राहण्याची व जेवणाची सोय यासह इस्रायलमधील सुरुवातीच्या काळात आवश्यक सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे

असे आहेत पात्रता निकष

  • घरगुती सहायक सेवांमध्ये कौशल्य असणे गरजेचे

  • किमान ९९० तासांचा मान्यताप्राप्त प्रशिक्षण कोर्स (ओजेटी सहित) पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक

  • मिडवाइफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी किंवा नर्स असिस्टंट मध्ये प्रशिक्षण घेतलेले असणे अपेक्षित

  • जीडीए, एएनएम, जीएनएम, बी.एस्सी. नर्सिंग व पोस्ट बी.एस्सी. नर्सिंग धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार


Israel jobs for Maharashtra – रोजगाराच्या विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्याकरिता भारत आणि इस्रायल देशांतर्गत करार करण्यात आला आहे. त्यानुसार इस्रायल येथे होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स नॉन वॉर क्षेत्रातील आरोग्य विभागात ५ हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याकरिता या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवार २५ ते ४५ वयोगटातील असावा, त्याला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असावे, उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असावे.

भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यता प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग, पोस्ट बीएस्सी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती संकेतस्थळावरील लेटेस्ट जॉब या मथळ्याखाली उपलब्ध आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज तसेच आरोग्य विषयात काम करणाऱ्या संस्थांनी रोजगाराच्या संधीबाबत अधिकाधिक उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.


तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल आणि भारताबाहेर संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर हजारो कुशल कारागीर मिळावेत म्हणून इस्रायल सरकारने भारताशी संपर्क साधला आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (NCDC) सांगितले की, इस्रायल सरकारने दोन्ही देशांमधील करारानुसार 10,000 बांधकाम कामगार भारतातून भरती करण्याची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणामधील 10,000 हून अधिक भारतीयांची बांधकाम कामगार म्हणून निवड करण्यात आली. भरतीचा दुसरा टप्पा महाराष्ट्रात होणार आहे. ज्यामध्ये फ्रेमवर्क, लोखंडी बेंडिंग, प्लास्टरिंग आणि सिरॅमिक टाइलिंगच्या कारागिरांना काम दिले जाईल. यासोबतच त्यांना अनुभवाच्या आधारे लाखोंमध्ये पगारही मिळणार आहे.

लवकरच भरती मोहीम सुरू होणार आहे

500 हून अधिक भारतीय कामगारांकडे आवश्यक कौशल्ये नसल्याच्या कारणावरून इस्रायलमधून हद्दपार करण्यात आल्याच्या वृत्तांदरम्यान ही बातमी समोर आली आहे. ऑक्टोबरमध्ये गाझावरील इस्रायलचे युद्ध सुरू झाल्यानंतर ज्यांचे कामाचे परवाने रद्द करण्यात आले होते अशा पॅलेस्टिनींना बदलण्यासाठी भारतीय कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. इस्रायल कामासाठी अपात्र झालेल्या सुमारे 90,000 पॅलेस्टिनींना बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. नोव्हेंबरमध्ये, भरती मोहिम राबवण्यासाठी इस्रायलने भारताशी द्विपक्षीय करार केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये भारताच्या वित्त मंत्रालयाने स्थापन केलेल्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (NCDC) एप्रिलमध्ये एका करारानुसार सुमारे 2,600 कामगार पश्चिम आशियाई देशात पाठवले होते.