Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » महिलांसाठी विमा क्षेत्रात मोठी संधी; २० हजार महिलांची होणार भरती !! | ICICI life Insuranace Bharti
Last Updated:

महिलांसाठी विमा क्षेत्रात मोठी संधी; २० हजार महिलांची होणार भरती !! | ICICI life Insuranace Bharti

ICICI life Insuranace Bharti

ICICI life Insuranace Bharti  -महिलांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देत आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्सने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कंपनीने ‘नारीशक्ती’ या उपक्रमांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात २० हजार महिला विमा सल्लागारांची भरती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने कंपनीने ही घोषणा केली.

दरम्यान, कंपनीच्या विमा प्रतिनिधींमार्फत मिळणाऱ्या एकूण व्यवसायापैकी ४५ टक्के व्यवसाय महिला विमा सल्लागारांकडून मिळत असल्याची माहिती कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी अमिश बँकर यांनी दिली. त्यामुळे विमा क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित होत असून, ‘नारीशक्ती’ उपक्रमातून अधिक महिलांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

ICICI life Insuranace Bharti