खुशखबर! आता ग्राम रोजगार सहायकांना आता दरमहा आठ हजार! – Gramin Rojgar Sahayak Latest Salary
ग्राम रोजगार सहायकांना आता दरमहा आठ हजार – Gramin Rojgar Sahayak Latest Salary ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगार सहायकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन, वर्षाला किमान ६ हजार मनुष्य दिवसनिर्मितीचे लक्ष्य आणि १० हजारांपेक्षा अधिक मनुष्य दिवस निर्माण करणाऱ्यांना २ टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत नवीन नियमावली शासनाने जाहीर केली आहे. मृद व जलसंधारण (रोहयो) विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांनी ग्राम रोजगार सहायकांच्या मानधन आणि सेवा अटींबाबत पाठपुरावा केला होता. नवीन निकषांनुसार प्रत्येक ग्राम रोजगार सहायकाला वर्षभरात किमान ६ हजार मनुष्य दिवसनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत किमान ३ हजार मनुष्य दिवसनिर्मिती अपेक्षित आहे.
प्रवासभत्ता आणि डेटा पॅकही – वर्षभरात १० हजारांपेक्षा अधिक मनुष्य दिवसांची निर्मिती करणाऱ्या सहायकांना २ टक्के प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. त्यासोबत प्रवासभत्ता आणि डेटा पॅकची सुविधाही स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.