Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » रत्नागिरी जिल्ह्यातील २५० NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; थेट शासन निर्णय जारी! | Goa GIDC Bharti 2026
Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यातील २५० NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; थेट शासन निर्णय जारी! | Goa GIDC Bharti 2026

Goa GIDC Bharti 2026

Ratnagiri: Contractual employees working across the state under the National Health Mission (NHM) are set to have their services regularized. This landmark decision brings immense relief to nearly 250 contractual employees in Ratnagiri district alone, while clearing the path for the service assimilation of over 15,000 contractual workers across Maharashtra. According to the government’s latest mandate, supernumerary posts matching equivalent pay scales will be created to grant permanent appointments to those who have completed 10 or more years of service . District Health Officer Dr. Aniruddha Athalye stated that these positions are being formulated after receiving mandatory clearance from the Finance Department, directly strengthening the local health department. Following a cabinet meeting decision on June 29, the official Government Resolution (GR) was issued on June 30. However, these supernumerary posts are person-specific, meaning the posts will automatically lapse upon the employee’s retirement, resignation, or termination, with no option for new recruitment on those seats. Additionally, the government has explicitly clarified that compassionate ground appointments will not be applicable to the legal heirs of these regularized employees.
Goa GIDC Bharti 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) राज्यभरात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा आता कायम केल्या जाणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यातील एकूण १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केली आहे, त्यांच्यासाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाणार आहे. वित्त विभागाच्या आवश्यक मान्यतेनंतर ही पदे तयार केली जात असून, रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाला याचा थेट फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.
या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करताना त्यांचे कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, शैक्षणिक पात्रता, सेवा प्रवेश नियम आणि सातव्या वेतन आयोगानुसार असलेली वेतनश्रेणी यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार ३० जून रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. मात्र, ही अधिसंख्य पदे व्यक्तीसापेक्ष असून संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे सेवा संपुष्टात आल्यानंतर ही पदे आपोआप रद्द होतील , त्यामुळे त्या पदावर नवीन नियुक्ती करता येणार नाही. तसेच, या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळणार नाही , असेही शासनाने स्पष्ट केले आहे.