शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज: व्ही.आर.डी.एल. विभाग मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांची लेखी परीक्षा जाहीर ! – GMC Miraj Admit Card Download
GMC Miraj Admit Card
GMC Sangli Miraj Recruitment Exam Date : The offline written examination for the contract-based Multi Tasking Staff (MTS) positions at the VRDL Department, Government Medical College, Miraj, is scheduled for September 1, 2026, from 3:00 PM to 4:00 PM. Candidates must report to the Anatomy Department Lecture Hall at 2:00 PM along with their application receipt and original Aadhaar or PAN card.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील व्ही.आर.डी.एल. (VRDL) विभागातील मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठीची ऑफलाइन लेखी परीक्षा ०१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी शरीररचनाशास्त्र विभागातील व्याख्यान गृहात दुपारी २:०० वाजता मूळ आधार/पॅन कार्ड आणि अर्जाच्या पोहचपावतीसह उपस्थित राहावे.
Advertisement
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तांसगाव या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) सवंर्गातील रिक्त पदे सरळसेवेन भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षेच्या प्रवेशपत्रकामध्ये विविध पदांचे पोस्ट कोड (Post Code) प्रसिध्द करण्यात येत आहे.
ऑनलाईन परिक्षेच्या प्रवेशपत्रकामध्ये विविध पदांचे पोस्ट कोड (Post Code) प्रसिध्द
GMC Sangli Miraj Recruitment Exam Date – An advertisement was published inviting applications from eligible candidates, exclusively through online mode, for filling various vacant Group D (Class 4) posts in the establishment through direct recruitment. Following this advertisement, online applications were received from candidates, and the examination for this direct recruitment process will be conducted online on December 31, 2025, at various examination centers in Maharashtra. The admit cards (Hall Tickets) for this examination will be available to candidates on the IBPS website from December 23, 2025. The examination will be conducted in a single session using the online (computer-based) method, and all candidates are required to be present at the examination centers at the stipulated time as per the instructions mentioned in their admit cards (Hall Tickets).
GMC मिरज आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणेकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनसुरुन उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज भरुन घेण्यात आलेले असून सदरच्या सरळसेवा भरती प्रक्रियेची परिक्षा दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेबाबतचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना IBPS संकेतस्थळावर दि. २३ डिसेंबर, २०२५ रोजी पासून उपलब्ध होतील. एकाच सत्रांमध्ये ऑनलाईन (Computer Based) पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार असून सर्व परिक्षार्थी यांनी प्रवेश पत्रामधील (Hall Ticket) नमूद सूचनांनुसार विहीत वेळेत परिक्षा केंद्रांवर उपस्थित राहावयाचे आहे.