Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » GMC लातूर परीक्षेची उत्तरतालिका PDF जाहीर, डाउनलोड लिंक- GMC Latur Result Answer Key
Last Updated:

GMC लातूर परीक्षेची उत्तरतालिका PDF जाहीर, डाउनलोड लिंक- GMC Latur Result Answer Key

GMC Latur Result Answer Key – संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अतंर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदे सरळसेवेने भरण्याबाबत टि. सी. एस. कंपनिकडून दिनांक १२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वस्तुनिष्ठ स्वरुपाची ऑनलाईन परिक्षा घेण्यात आलेली आहे. सदरील परिक्षाची उत्तर तालिका उदेवारांच्या लॉगीनवर टि. सी. एस. कंपनिकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. उमेवारांनी उत्तरतालिका तपासून घ्यावी तसेच Objection Form दिनांक १९/१०/२०२६ रोजी (प्रसिध्द) LIVE करण्यात येत आहे.कक्षसेवक, बाहयरुग्णविभाग सेवक, शिपाई, माळी, स्वयंपाकी, क्ष-किरण सेवक, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघातविभाग सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, न्हावी, धोबी या पदांच्या ऑनलाईन परिक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती/आक्षेप असल्यास दिनांक २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह Objection Form भरुन पाठविण्यात यावा. प्रत्येकी एका हरकत/आक्षेपाकरिता रु २००/- शुल्क आकारण्यात येईल. सदरचे शुल्क उमदेवाराने UPI, इंटरनेट बँकींग, क्रेडिट कार्ड किंवा डेबीट कार्डद्वारे भरावे. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप यांची दखल घेतली जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

GMC Latur Result Answer Key

Download Answer Key PDF

Advertisement