जीएमसीतील १०१ रिक्त पदांची भरती लवकरच; उमेदवारांसाठी मोठी अपडेट! । GMC Akola Bharti 2026
GMC Akola Bharti 2026
GMC Akola Bharti 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरीची प्रतीक्षा संपणार! वर्ग ४ संवर्गातील १०१ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि संलग्न सर्वोपचार रुग्णालयातील वर्ग ४ संवर्गाची बिंदूनामावली शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही आस्थापनांमधील विविध रिक्त पदे भरण्याचा मार्ग खुला झाला असून, एकूण १०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
या भरतीमध्ये सेवक, आरोग्यसेवक, आया, कक्षसेवक, परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर आदी पदांचा समावेश आहे. बिंदूनामावलीला मंजुरी मिळाल्याने आता या पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे लक्ष भरतीच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
मनुष्यबळाच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला आता मोठा दिलासा मिळणार आहे! नियमित कामकाजावर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी वर्ग ४ संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या भरतीचे नियोजन केले जात असून, संपूर्ण पदभरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे.शासनाने मंजूर केलेल्या बिंदूनामावलीनुसार विविध पदांचा भरतीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयातील सेवक, कक्षसेवक, आया, आरोग्यसेवक, परिचर आणि शिपाई, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर व इतर संबंधित पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांमुळे निर्माण होणारा मनुष्यबळाचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे.