Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » सुवर्णसंधी-विदेशात कायमस्वरूपी रोजगार; दरमहा १ लाखापेक्षा जास्त पगार!! – Germany Jobs for Indian
Last Updated:

सुवर्णसंधी-विदेशात कायमस्वरूपी रोजगार; दरमहा १ लाखापेक्षा जास्त पगार!! – Germany Jobs for Indian

Germany Job Opening For Indians

भारतातील होतकरू आणि कुशल तरुणांना जागतिक व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ‘मॅजिक बिलियन’ ही सरकारमान्य आंतरराष्ट्रीय टॅलेंट मोबिलिटी संस्था अग्रगण्य भूमिका बजावत आहे. सध्या या संस्थेमार्फत जर्मनीमध्ये विविध तांत्रिक आणि सेवा क्षेत्रांत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने नर्सिंग, फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिक्स, प्लंबिंग, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि एचव्हीएसी (एअर कंडिशनिंग) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

Germany Jobs for Indian

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना थेट नोकरी न देता, प्रथम तीन वर्षांचे उच्च दर्जाचे सवेतन व्यावसायिक प्रशिक्षण (ज्याला जर्मनीमध्ये ‘ऑसबिल्डुंग’ म्हटले जाते) दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्येच कायमस्वरूपी नोकरीची खात्री दिली जाते, ज्यामुळे त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. अर्जदार उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांना समान संधी उपलब्ध आहे.

Advertisement

शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, नर्सिंग क्षेत्रासाठी एएनएम (एएनएम) पदवी अनिवार्य आहे, तर मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लंबिंग यांसारख्या तांत्रिक क्षेत्रांसाठी १२ वी (गणित विषयासह उत्तीर्ण) किंवा १० वी नंतर दोन वर्षांचा आयटीआय (आयटीआय) अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचे आहे. इतर क्षेत्रांसाठी किमान १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे भाषेचे ज्ञान आहे. जर्मनीमध्ये काम करण्यासाठी उमेदवाराला जर्मन भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असून, त्यासाठी गोएथे संस्थेचे ‘बी१’ स्तरावरील प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आर्थिक लाभांच्या दृष्टीने ही संधी अत्यंत आकर्षक आहे. तीन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा विद्यावेतन दिले जाते. पहिल्या वर्षी १,०४८ युरो, दुसऱ्या वर्षी १,१०० युरो आणि तिसऱ्या वर्षी १,१५० युरो इतकी रक्कम मिळते. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम प्रति महिना सुमारे ९४,००० ते १ लाख 3 हजार रुपयांच्या घरात जाते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, जेव्हा उमेदवार पूर्णवेळ कामावर रुजू होतो, तेव्हा त्याला दरमहा २,२०० ते २,५०० युरो (सुमारे २ ते २.२५ लाख रुपये) इतका सुरुवातीचा पगार मिळतो. याशिवाय, संस्थेमार्फत उमेदवारांना विमानाचे तिकीट विनामूल्य दिले जाते आणि जर्मनीतील वास्तव्यासाठी सवलतीच्या दरात निवासाची सोयही उपलब्ध करून दिली जाते.

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. अर्जदार उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांना समान संधी उपलब्ध आहे.


जर्मनीमध्ये परिचारिकांसाठी रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याची माहिती भारतीय महिला विकास नर्सिंग प्रशिक्षण व तलहा कॉलेज ऑफ नर्सिंग (जीएनएम)चे अध्यक्ष डॉ. हनीफ शेख यांनी दिली. पिपरी मेघे येथील तलहा नर्सिंग कॉलेज तसेच भारतीय महिला विकास नर्सिंग शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

या वेळी त्यांनी सांगितले की, वैद्यकीय विभागाच्या आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रसंगी वैद्यकीय विभागाचे सचिव धीरजकुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, वरिष्ठ अधिकारी अर्चना बडे, धीरेंद्र रामटेके तसेच आरोग्य मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते.

कार्यक्रमाला समाजसेवी अनिल नरेडी, प्राचार्य एन. पी. रॉय, शिक्षिका समीक्षा गोडबोले, शिक्षिका खुशी अक्रम खान, भावना कुर्जेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय परिचारिकांना परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाल्यामुळे रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध होऊन नर्सिंग क्षेत्रात भारतीय परिचारिकांची मागणी वाढणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल रिठे, राहुल तडस, हिमांशु डडमल तसेच इतर सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.


Germany Job Opening For Indians

महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीमध्ये प्रशिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांच्या उपस्थितीत संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त डॉ. अनिल भंडारी, संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसचिव डॉ. सुवर्णा खरात तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी आणि जर्मनीच्या सामाजिक व्यवहार, आरोग्य व एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते.
या करारानुसार नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी भाषा प्रशिक्षण, प्रगत कौशल्यविकास, प्रमाणपत्र मान्यतेच्या प्रक्रिया सुलभ करणे यांसह जर्मनीत नोकरी स्वीकारणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेसाठी प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळ तयार करणे हा या सहकार्याचा मुख्य उद्देश आहे. दोन राज्यांतील नर्सिंग महाविद्यालये, विद्यापीठे आणि प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थी-प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
बाडेन-वुटेमबर्गचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सांगितले की, नर्सिंग आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. कौशल्याधारित आरोग्यसेवा, संशोधनाला चालना आणि विद्यार्थ्यांसाठी परदेशी रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या सहकार्यामुळे युवकांसाठी विदेशातील करिअरचे दरवाजे उघडणार असून प्रशिक्षित आरोग्यसेवा मनुष्यबळ तयार होण्यास मोठी मदत होणार आहे.


Germany Job Updates

Germany Jobs for Indian : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी राज्यातील ३१,००० युवकांनी नोंदणी केली आहे, परंतु अद्याप जर्मन भाषा प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले नाही. तरीही, हा प्रकल्प निश्चितपणे राबविण्यात येईल, असा विश्वास राज्य सरकारने दिला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

प्रकल्पासाठी पात्र उमेदवारांनी पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली.

२५ फेब्रुवारी २०२४ रोजी, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जर्मनीतील बाडेन-उटेनबर्ग या राज्यासोबत सामंजस्य करार केला होता. या करारानुसार, महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ जर्मनीतील कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जर्मनीला भेट देऊन तेथील कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळाच्या प्रकाराबाबत चर्चा केली होती.

एकूण ३२ प्रकारच्या नोकऱ्यांची निश्चिती करण्यात आली. त्यासाठी आवश्यक होते ते जर्मन भाषेचे प्रशिक्षण शालेय शिक्षण विभागाने त्यासाठीची जबाबदारी उचलली. प्रशिक्षण देण्यासाठी शाळांची निवड केली. मात्र, अद्याप जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरू होऊ शकलेले नाही. या उपक्रमाअंतर्गत १० हजार युवक-युवतींना जर्मनीमध्ये नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यात नर्स, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजी असिस्टंट, डेन्टल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, वेटर, रिसेप्शनिस्ट, हॉटेल मॅनेजर, अकाउंटट, इलेक्ट्रिशियन, आदींचा समावेश आहे.

जर्मनीतील नोकऱ्यांसंदर्भात कार्यवाही गतीने सुरू आहे. आम्ही सातत्याने बाडेन-उटेनबर्गमधील प्रशासनाशी व्हीसीद्वारे चर्चा करत आहोत. लवकरच याबाबतचा अंतिम करारदेखील होईल. प्रकल्प कुठेही थांबलेला नाही, तो नक्कीच पूर्णत्वाला नेला जाईल – राहुल रेखावार,संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद


Germany Job Opening For Indians

Germany Jobs for Indian : विदेशात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंददायी संधी आहे. जर तुम्हाला तुमच्या करिअरला वाव देण्यासाठी देशाबाहेर काम करण्याची इच्छा असेल, तर या संधीचा उपयोग करणे तुम्हाला नक्कीच हवे आहे. विशेषतः, ही संधी लोको पायलटच्या पदासाठी उपलब्ध आहे. लोको पायलट म्हणून काम करण्याची आवड असलेल्या किंवा याच क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

भारताबाहेर काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना संधी !! भारतीयांसाठी स्पेशल व्हॅकन्सी; अर्ज करता येणार

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘डॉयचे बान’ ही जर्मन रेल्वे कंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठी रेल्वे कंपनी म्हणून ओळखली जाते. युरोपात जर्मनी हा एक अग्रगण्य देश आहे, जो अनेक कंपन्यांचा गाडा उभा करणारा आहे. तथापि, जर्मनीमध्ये मानवी श्रमाची कमतरता भासत आहे, त्यामुळे त्यांनी देशभरातून मानवी संसाधनांची भरती सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करत आहेत.

लोको पायलटच्या पदासाठी मनुष्यबळाची कमतरता भासल्यामुळे जर्मनीने जगभरात उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. जर्मन सरकारने भारतीयांसाठी 90,000 वीजा जाहीर केले आहेत, ज्यावरून स्पष्ट आहे की प्राथमिकता भारतीयांना दिली जात आहे. DB ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे कंपन्यांपैकी एक आहे, आणि या कंपनीसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना जगभरात कुठेही नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

असे चर्चित आहे की DB या जर्मन रेल कंपनीचा मुख्य उद्देश भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करणे आहे. यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील आहे, कारण भारतात रेल्वे संबंधित अनेक मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे, विशेषतः मेट्रोच्या कामात वेग आला आहे. त्यामुळे DB या रेल्वे कंपनीला भारतीय बाजारपेठेकडे आकर्षण असणे साहजिक आहे. DB चे CEO, निको वारबैनॉफ, म्हणतात की, “जर्मनीमध्ये ट्रेन ड्रायव्हर्सची कमतरता आहे, आणि आम्हाला आमच्या जागतिक प्रकल्पांसाठी भारतीय कामगारांच्या कौशल्याचा लाभ घ्यायचा आहे.” एकूणच, जागतिक स्तरावर व्यापाराचे वर्चस्व मिळवण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे.

डॉयचे बानकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी एकूण 100 भारतीय उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या भरतीमध्ये सामील करण्यात आलेल्या उमेदवारांचा 17% हिस्सा मूळचा भारतीय आहे. DB या रेल्वे कंपनीचे CEO निको वारबैनॉफ म्हणतात, “आम्ही उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या आसपासच्या भागातील कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे आणि त्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.”

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी db.jobs/en-en या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी या लिंकवर भेट देण्याची विनंती केली आहे.


“युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची टंचाई आहे. त्या तुलनेत भारतामधून इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. त्याच हेतूने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे चार लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात दिली. माळेगाव (ता. बारामती) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारत फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅब करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

अजित पवार म्हणाले, “औद्योगिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी कुशल मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. त्याकामी शासनस्तरावर होणाऱ्या प्रयत्नाला नामांकित कंपन्या मदत करत असल्याचे समाधान वाटते.” यावेळी पवार यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बाबा कल्याणी यांचे अभिनंदन केले. लीना देशपांडे म्हणाल्या, “भारत फोर्जच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा सीएसआर फंड हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरत आहे.” प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण भाषाचे मर्यादा आणि संवाद कौशल्य नसल्यामुळे तरुण-तरुणी नोकरीसाठी परेशात जाऊ शकत नाहीत. पण आता जर्मनीत सध्या एकूण चार लाख वाहनचालकांची गरज आहे.  त्यामुलेच भारतातील एकूण चार राज्यांतील चालकांना जर्मन भाषा शिकवून तसेच योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना थेट जर्मनीत पाठवले जाणार आहे. मुळात जर्मनीमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची वनवा आहे. त्यामुळे येथे मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे. या देशात वाहनचालकांचीही कमी आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना थेट जर्मनीत जाऊन वाहनचालक होण्याची नामी संधी आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या चार राज्यांतील तरुणांना वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तशी योजना आहे. त्यामुळे तरुणांना भविष्यात थेट परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.