Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Important » अर्ज सुरु!-फक्त जर्मन भाषा शिका, हजारो नोकऱ्या तुमची वाट बघत आहेत! – German language jobs for Maharashtra
Last Updated:

अर्ज सुरु!-फक्त जर्मन भाषा शिका, हजारो नोकऱ्या तुमची वाट बघत आहेत! – German language jobs for Maharashtra

German language jobs for Maharashtra – मित्रांनो जर आपले स्वप्न आहे कि आपल्याला युरोप मध्ये एखादी छानशी नोकरी करून जीवन जगायचे आहे तर आपल्याला समोर एक मोठ्ठी संधी सध्या उपलब्ध झाली आहे. आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना जर्मनी करार अंतर्गत मोठी संधी आहे!! जर्मनीमध्ये सध्याच दहा हजारांहून अधिक भारतीय नर्सेस काम करत आहेत. येत्या पाच वर्षात परिचारिकांना मोठी मागणी राहणार आहे. सध्याच येथे ५० हजार परिचारिकांची कमतरता आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिका आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवा, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारतीयांसाठी परदेशी नोकरीच्या अनेक संधी असल्याचे स्पष्ट केले. जर्मनीचा दौरा संपवून नेदरलँड्सकडे रवाना होण्यापूर्वी ते म्हणाले, हस्तकला, हातमाग, पाककला आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांत भारताला जागतिक नेतृत्वाची संधी तर आहेच, शिवाय आरोग्य क्षेत्रातील डायग्नोस्टिक्स, लॅब टेक्निशियन आणि रेडिओलॉजी यांसारख्या क्षेत्रांतही मोठी मागणी आहे. येत्या पाच ते सहा वर्षात या क्षेत्रांमध्ये आणखी ५० ते ६० हजार कर्मचाऱ्यांची गरज जर्मनीला भासणार आहे.  मित्रांनो, जर्मनीमध्ये सध्या कुशल कामगार, अभियंते, तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची मोठी वानवा भासत आहे. लोकसंख्येच्या वृद्धत्वामुळे आणि उद्योग क्षेत्राच्या प्रचंड विस्तारामुळे जर्मनीला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे. मात्र, तेथील कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जर्मन भाषेचे (A1 ते C1 लेव्हल) ज्ञान असणे अनिवार्य असते. हीच गरज लक्षात घेऊन आज महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये जर्मन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील युवकांना थेट परदेशात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने जर्मनीसोबत महत्त्वपूर्ण करार केले आहेत. तांत्रिक शिक्षण घेतलेले आयटीआय (ITI), पदविकाधारक तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना विशेष जर्मन भाषा प्रशिक्षण देऊन थेट जर्मनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये नर्सिंग, आरोग्यसेवा, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, हॉस्पिटॅलिटी आणि माहिती तंत्रज्ञान (IT German language jobs for Maharashtra) या क्षेत्रातील तरुणांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.  चला तर या बबद्दल पूर्ण माहिती आनी अर्ज प्रक्रिया समजून घेऊया.

German language jobs for Maharashtra

त्यामुळे भारतासाठी हे एक महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते. जर्मनीतील साठ वर्षे वयापेक्षा जास्त लोकांची संख्या ३१ टक्क्यांपेक्षाही पुढे गेली आहे. त्याचा भारताला कसा उपयोग होणार? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, भारताला अमाप संधी आहेत. कुशल तरुण, तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ, केअरगिव्हर्स आणि नर्सेस यांच्यासाठी जर्मनीत संधी उपलब्ध आहेत. मात्र, असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मन जर्मनीत काम करण्याची इच्छा भाषा आणि संस्कृती शिकावी, असेही त्यांनी सांगितले. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी रोजगारावर परिणाम होणाऱ्या व्यवसायांची ओळख करण्याचे काम वाणिज्य मंत्रालयाने सुरू केले आहे. एआयचा वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्हावा, मात्र मानवी मनुष्यबळाची जागा घेण्याची गरज भासू नये, अशा क्षेत्रांवर भारताचा भर असेल, असे गोयल यांनी सांगितले.

Advertisement

भारत सर्वात पसंतीचा देश
२०२४ मध्ये जर्मनीने कुशल, अर्धकुशल व्यावसायिकांच्या स्थलांतरासाठी भारताला सर्वाधिक पसंतीचा भागीदार देश जाहीर केले, असे सांगून भारतीय राजदूत अमेय गुप्ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत जर्मनीतील भारतीय समुदायाची संख्या दरवर्षी सुमारे ६० हजारांनी वाढत आहे. आज जर्मनीत भारतीय नागरिकांची संख्या सुमारे ३.३२ लाख आहे. आता ही संख्या ४ लाखांपर्यंत जाईल. जर्मनीतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी विविध देशांतून नर्सेस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा त्यासाठी महत्त्वाचा मनुष्यबळ पुरवठादार ठरू शकतो. त्यासाठी अर्थातच आपल्या लोकांकडे संबंधित शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असण्याबरोबरच जर्मन भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी योग्य व्यवस्था व प्रशिक्षणाची चौकट तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मित्रांनो जर्मनीमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा, याची सविस्तर माहिती आणि पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत: (How to Apply For Germany Jobs, Application & Visa Process in Marathi)

१. जर्मन भाषा प्राविण्य मिळवणे (Language Proficiency)
जर्मनीमधील कंपन्यांमध्ये अर्ज करण्यासाठी किमान B1 किंवा B2 लेव्हलपर्यंत जर्मन भाषा येणे बंधनकारक असते. यासाठी पुणे, मुंबई किंवा ऑनलाइन माध्यमातून Goethe-Zertifikat किंवा TELC सारख्या अधिकृत परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र मिळवा.

२. सीव्ही (CV) आणि कव्हर लेटर जर्मन युनिव्हर्सल फॉरमॅटमध्ये तयार करणे
जर्मन पद्धतीनुसार तुमचा बायोडाटा (Lebenslauf) तयार करा. यामध्ये तुमचा पासपोर्ट साईझ फोटो, जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रतेची अचूक माहिती असावी. तसेच तुमच्या कौशल्यांचे वर्णन करणारे जर्मन भाषेतील कव्हर लेटर (Anschreiben) तयार करा.

Advertisement

३. कागदपत्रांचे भाषांतर आणि प्रमाण-पडताळणी (Document Verification)
तुमच्या शैक्षणिक पदव्या, गुणपत्रिका आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रांचे जर्मन भाषेत अधिकृत भाषांतर करून घ्या. तसेच कागदपत्रे जर्मनीच्या निकषांनुसार योग्य असल्याची खात्री करा.

व्हिसा प्रक्रिया (Visa Application For Jobs in Germany) – नोकरीची ऑफर मिळाल्यानंतर किंवा नोकरी शोधण्यासाठीचा व्हिसा (Job Seeker Visa / Skilled Immigration Act अंतर्गत) मिळवण्यासाठी मुंबईतील जर्मन दूतावास (German Consulate General) किंवा व्हीएफएस ग्लोबल (VFS Global) द्वारे अर्ज करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

त्यामुळे भारतासाठी हे एक महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते. जर्मनीतील साठ वर्षे वयापेक्षा जास्त लोकांची संख्या ३१ टक्क्यांपेक्षाही पुढे गेली आहे. त्याचा भारताला कसा उपयोग होणार?

असा प्रश्न केला असता ते म्हणाले, भारताला अमाप संधी आहेत. कुशल तरुण, तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ, केअरगिव्हर्स आणि नर्सेस यांच्यासाठी जर्मनीत संधी उपलब्ध आहेत. मात्र, असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मन जर्मनीत काम करण्याची इच्छा भाषा आणि संस्कृती शिकावी, असेही त्यांनी सांगितले. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी रोजगारावर परिणाम होणाऱ्या व्यवसायांची ओळख करण्याचे काम वाणिज्य मंत्रालयाने सुरू केले आहे. एआयचा वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्हावा, मात्र मानवी मनुष्यबळाची जागा घेण्याची गरज भासू नये, अशा क्षेत्रांवर भारताचा भर असेल, असे गोयल यांनी सांगितले.