न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांमध्ये ३७४ पदे रिक्त, गुन्हे तपासाचा महत्त्वाचा आधारच कमकुवत !! | Forensic Science Laboratory Bharti 2026
Forensic Science Laboratory Bharti 2026
Forensic Science Laboratory Bharti 2026 : राज्यातील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांची यंत्रणाच आता ‘फॉरेन्सिक रिपोर्ट’च्या ढिगाऱ्याखाली दबली आहे. गुन्हेगारांना वेळेत शिक्षा मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणांना महत्त्वपूर्ण मदत करणाऱ्या या प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. मंजूर पदांपैकी तब्बल ३७४ पदे रिक्त असल्याने फॉरेन्सिक अहवाल वेळेत देणे प्रयोगशाळांना अवघड झाले असून, १ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यभरातील तब्बल ५६ हजार ८१९ प्रकरणांचे अहवाल प्रलंबित आहेत. वरिष्ठ तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे नमुन्यांचा मोठा अनुशेष निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम पोलीस तपासापासून न्यायालयीन कामकाजापर्यंत होत असल्याचे समोर आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांमधील मनुष्यबळाची कमतरता आता गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे समोर आले आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, विभागातील एकूण १ हजार ४८६ मंजूर पदांपैकी १ हजार ११२ पदे भरलेली, तर तब्बल ३७४ पदे रिक्त आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे तांत्रिक अहवालांची तपासणी करून अंतिम निष्कर्ष नोंदविण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या वर्ग-१ मधील १११ पदांपैकी तब्बल ४२ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या कमतरतेचा थेट परिणाम महत्त्वाच्या फॉरेन्सिक अहवालांच्या तपासणी आणि निष्कर्ष प्रक्रियेवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.