Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » कुटुंब न्यायालयात २६ टक्के पदे रिक्त, नवीन पदभरती केव्हा सुरु होणार!! – Family Court Bharti 2026
Last Updated:

कुटुंब न्यायालयात २६ टक्के पदे रिक्त, नवीन पदभरती केव्हा सुरु होणार!! – Family Court Bharti 2026

Family Court Bharti 2026

घटस्फोट, मुलांचा ताबा आणि पोटगी यांसारख्या संवेदनशील प्रकरणांचा निपटारा करणाऱ्या नागपूरच्या कुटुंब न्यायालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २६ टक्के पदे रिक्त आहेत. मंजूर ८३ पदांपैकी २२ पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कामकाजाचा भार पडत आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाचे कामकाज प्रभावीपणे कसे चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे आवश्यक आहे.

Family Court Bharti 2026

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर कुटुंब न्यायालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ८३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ६१ कर्मचारी कार्यरत असून, २२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये प्रथम श्रेणी स्टेनोग्राफरची ४, तृतीय श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफरची २, उपव्यवस्थापकाचे १, शिरस्तेदाराची २, कनिष्ठ शिपायाची ४ आणि सफाई कामगाराची २ पदे आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहिती मागवली होती. कुटुंब न्यायालयात दरवर्षी घटस्फोट, मुलांचा ताबा आणि पोटगी यांसह विविध कौटुंबिक वादांशी संबंधित मोठ्या संख्येने प्रकरणे दाखल होतात. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये ५ हजार ५३२, २०२५ मध्ये ३ हजार ४३३, तर २०२६ मध्ये १५ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार ५१२ प्रकरणे दाखल झाली आहेत.
प्रकरणांची मोठी संख्या आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे यामुळे न्यायालयीन कामकाजाचा ताण वाढतच आहे.

Advertisement

Salary Details For Family Court Mumbai Notification

पदाचे नाव वेतनश्रेणी
सफाईगार १५,६१०/-

How To Apply For Family Court Application

  • या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Advertisement
✅ अधिकृत वेबसाईट https://districts.ecourts.gov.in/