जिल्हा न्यायालय, कोल्हापूर अंतर्गत ४९५ रिक्त पदांची भरती लवकरच सुरू होणार! | District Court Kolhapur Bharti 2026
District Court Kolhapur Bharti 2026
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. खंडपीठासाठी ४९५ कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात रविवारी सकाळी कोल्हापूर सर्किट बेंच वर्षपूर्ती सोहळ्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई होते. यावेळी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती एस. जी. चपळगांवकर, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती वृषाली जोशी, न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासह महाधिवक्ता मिलिंद साठ्ये, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिलसिंग, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम उपस्थित होते.
न्यायमूर्ती घुगे म्हणाले, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर सर्किट बेंचचा ठाम निर्णय घेतला. एक महिन्यात काम पूर्ण करून तो निर्णय पूर्णत्वास नेण्याचे काम न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांनी केले. या दोघांमुळेच सर्किट बेंच स्थापन झाले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक म्हणाले, सरकार व न्यायव्यवस्था यांनी एखादा निर्णय पूर्ण करण्याचे ठरविले तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंच आहे. १० जुलै २०२५ मध्ये जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंच स्थापन होऊ शकते, याबाबतचा अहवाल दिल्यानंतर सर्किट बेंच उभारणीला वेग आला. एक महिन्यात ४० वर्षांच्या लढ्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख म्हणाल्या, कोल्हापूरला १४७ वर्षांची न्यायदानाची उज्ज्वल परंपरा आहे. न्याय मिळणे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून कोल्हापूर सर्किट बेंचमुळे पक्षकारांना हा अधिकार मिळाला आहे. आता लवकरच सर्किट बेंचचे रूपांतर खंडपीठात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. विवेक घाटगे यांनी रेंज आणी सव्र्व्हरडाऊनमुळे ई फायलिंगमध्ये अडथळे निर्माण होत असून याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र मंडलिक यांनी स्वागत तर बार कौन्सिल सदस्य संग्राम देसाई यांनी आभार मानले.
Salary Details For District Court Kolhapur Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| लघुलेखक (श्रेणी-3) | एस-14: (38600-122800) |
| कनिष्ठ लिपिक | एस-6 : (19900-63200) |
| शिपाई/हमाल | एस-1 : (15000-47600) |
How To Apply For District Court Kolhapur Notification 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.